शब्दपर्ण
Blog
Featured

गणित आणि मी 

मी पाचवीत असताना घडलेला हा किस्सा आजही मला पोट धरून हसवतो.

खरं सांगायचं तर गणिताचा आणि माझा पहिल्यापासूनच छत्तीसचा आकडा होता. ‘गणित’ हा विषय ऐकला की माझ्या डोक्यात कळ उठायची. वरून गणित सोडवायला वही उघडली की सहा, सात, आठच्या पाढ्यांचे आकडे माझ्या वहीत नाचायला लागायचे. तेव्हा मला सतत वाटायचं—

“देवा, हे गणित नाही, काहीतरी जादूचं कोडंच आहे!”

 

एके दिवशी आमच्या वर्गशिक्षिकेने नेहमीप्रमाणे अवघड-अवघड गणिते सोडवायला दिली. मी वही उघडली खरी, पण पहिल्याच उदाहरणात माझं डोकं गरगरायला लागलं. काहीच कळेना. आजूबाजूला नजर टाकली तर सगळी मुलं शांतपणे वहीत काहीतरी खरडत होती. कुणी बाकाखाली वाकून लिहीत होतं, कुणी मान वर न करता आकड्यांशी झुंज देत होतं.

 

खिडकीजवळ बसलेली गीता तर बूट काढून अगदी आरामात बसली होती—म्हणजे तिचं गणि जवळजवळत पूर्ण झालं होतं. हे पाहून माझी घालमेल आणखीनच वाढली. इथे माझा जीव मात्र गळ्यापाशी अडकून बसला होता.

 

माझ्या समोर बसलेली सुषमा पटापट गणिते सोडवत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून मला वाटलं, “हिला तर सगळं येत असणार!”

मी थोडीशी पुढे झुकून तिच्या वहीत डोकावायला सुरुवात केली.

 

ती पेन्सिल फिरवते—मीही.

ती वही उंचावते—मीही.

ती डोकं हलवते—मीही!

 

इतकंच काय, जर तिने शिंकली असती तर मीही शिंकले असते बहुतेक! कारण तिच्या लक्षात यायला नको की मी तिचंच गणित उतरवत आहे. अक्षरशः तिच्या हालचालींची नक्कल करत मी माझी वही भरत होते.

 

शेवटी सगळी गणिते लिहून झाली. मनातल्या मनात मी खुश झाले—

“आज मॅडम नक्की शाबासकी देतील! पहिल्यांदाच माझं गणित वेळेवर झालंय!”

 

थोड्याच वेळात तपासणीसाठी रांग लागली. माझ्या पुढेच सुषमा उभी होती. मॅडमने तिची वही हातात घेतली आणि पाहताक्षणीच तिच्या पाठीवर जोरात धपाटा दिला.

“अरे, हे काय?”

 

मी जागेवरच थिजले.

“इतक्या आत्मविश्वासाने लिहीत होती, मग एवढा राग का?”

 

भीतीने माझ्या हातातलं पेन थरथरत होतं. माझा नंबर आला. मी जणू देवाच्या दारी जावं तशी वही डोळे घट्ट मिटून मॅडमसमोर धरली. मॅडमने वहीवर नजर टाकली आणि मला काही कळायच्या आतच माझा कान धरून पिळायला सुरुवात केली.

 

“अग बाई, ही तर तिचीच मावशी! अगदी तशीच गणितं!”

 

मी घाबरून लगेच म्हणाले,

“नाही नाही, मी तिची मावशी नाही!”

 

माझं बोलणं ऐकून मॅडम खळखळून हसल्या आणि म्हणाल्या,

“अगं मुर्ख मुली! दोघींची उत्तरं सारखीच आहेत… आणि दोन्ही चुकली आहेत!”

 

त्या क्षणी मला सगळं समजलं.

समोरचा पटापट लिहितोय म्हणजे तो बरोबरच करतो असं नसतं.

आणि नक्कल करून काहीच फायदा नसतो—उलट दोघींनाही सारखाच दणका बसतो!

 

त्या दिवसानंतर मी एक गोष्ट कायमची ठरवली—

गणित अवघड असलं तरी चालेल,

उत्तर चुकलं तरी चालेल,

पण करायचं मात्र स्वतःच्या डोक्यानेच.

 

आजही कुणी मला विचारलं,

“तुझं गणित कसं आहे?”

तर मी हसून उत्तर देते—

“गणित ठीक आहे…

पण शेजाऱ्याची वही आजही मी लांबच ठेवते!”

 

आणि म्हणूनच हा किस्सा आजही मला हसवतो.

त्या दिवशी गणित चुकलं खरं…

पण नक्कल न करण्याचा धडा

आणि जीवनाचा हिशोब

मात्र अगदी तंतोतंत कळला.

 

लेखिका.. ‌सौ दर्शना ओमकुमार भुरे हिंगोली

पाणीपुरी

  पाणीपुरी समीर घाई..घाईने घरी आला. फाटकातून राॕकी बघतच होता. आल्याबरोबर त्याचा गोंधळ सुरु झाला. म्हणजे  तो रोजचाच कार्यक्रम असे. चला लवकर फिरायला  जणू तो …

तीनचा टोल

तीनचा टोल.. बाळाच्या रडण्याने सिमा दचकून जागी झाली. तिने हात पुढे केला… पण शेजारी बाळ नव्हतं. क्षणभर तिचा श्वासच अडला. तिने घड्याळाकडे पाहिलं— तीनचा टोल. …

सौभाग्यपोथ

सौभाग्यपोथ   लहानपणापासून सोन्याचे दागिने घालायची मला खूप हौस होती… कधी कधी मी आईचे दागिने सहजच घालून आरशात स्वतःला न्याहाळत बसायचे. त्या चमचमणाऱ्या दागिन्यांमध्ये मला …

माणुसकी हेच धन

विनायक च्या अचानक जाण्याने सुमतीवर आभाळ कोसळलं होतं. पदरात दोन लहान मुलं डोक्यावर घराचं कर्ज आणि विनायकने अर्धवट सोडलेली कामे . सुमतीने कंबर कसली आणि …

माझं छोटं वादळ..

माझं छोटं वादळ.. घरात एखादा दिवस शांत गेला तर मला स्वतःलाच काळजी वाटायची. कारण माझं बाळ घरात असलं की घरभर त्याच्या उड्या, खोड्या, बोबडे बोल …

थोडंसं आकाश

थोडंसं आकाश   शांतपणे मोठी होणारी माझी मुलगी मुली कधी मोठी होतात हे आईला कधी कळतच नाही. कालपरवाच हातात धरलेलं माझं चिमुकल  बाळ… कधी माझ्या …

ध्रुवतारा

एका जिद्दी, कलासक्त आणि ध्येयवेड्या मुलीची ही गोष्ट वाचताना डोळ्यासमोर तिचं उभं राहिलेलं व्यक्तिमत्व नक्कीच सर्वांना भारावून टाकेल. गोष्ट एका ‘ध्रुवताऱ्याची कलेकडून विज्ञानाकडे झेपावलेली माझी …

विश्वासघात

विश्वासघात   आत्या आज राजाची कथा विराजने हट्ट केला.   एक असतो राजा आणि एक असते राणी. राजाचे नावं  असते अजय आणि राणीचे नावं असते …

थंडी आणि मी..

थंडी आणि मी.. थंडीची सकाळ होती. नेहमीप्रमाणे भल्या पहाटे जाग आली; पण गरमगरम रजईतून बाहेर पडावं असं मुळीच वाटत नव्हतं. रजई मला सोडायला तयार नव्हती, …

शिक्षक साधारण नही हो सकता

शिक्षक साधारण नही हो सकता ” मी शिक्षक आहे मला साधारण राहून चालणार नाही राष्ट्र विकासाची मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे…. शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता …

error: Content is protected !!