शब्दपर्ण
विशेषांक

संपादकिय
ती च्याबद्दल थोडे
 ‘ती’ ला पुढे नेण्यात,तिचे अस्तित्व निर्माण करण्यात  समाजाच्या विरोधात जाऊन ज्या समाजसुधारकांनी प्रयत्न केले त्यांना सर्वप्रथम वंदन.
शब्दपर्ण टीमचा हा पहिलवहिला स्त्री विशेषांक वाचकांना सुपुर्द करतांना मनस्वी आनंद होत आहे,
‘ती ‘काळानुरुप बदलत गेली.नव्या जबाबदाऱ्या पेलू लागली.अर्थात यासाठी तिला सुधारणावादी स्त्रियांबरोबर समतेचा पुरस्कार करणाऱ्या पुरुषांचीही साथ मिळाली.
शरीराने, मनाने नाजूक आहे असे म्हणता म्हणता पंखात बळ भरुन गगनी झेप घेणारी ‘ती’
अन्याय,अत्याचार सहन करत कित्येक पिढ्यानंतर स्वत्वाची जाणीव झालेली ‘ती’
कधी कधी अजूनही चाचपडतेय स्वतःचा आब,मान,सन्मान राखण्यासाठी ‘ती’
‘ती’ च्या घरट्याच्या आतच ‘ती’ चे अस्तित्व ,
चुल आणि  मुल सांभाळण्यातच ‘ती’ च्या आयुष्याचे सार्थक…या वर्षानुवर्षाच्या समजाला छेद देत उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलेली ‘ती’ आता प्रत्येक  क्षेत्रात जाऊन पोहचली…..
विविध क्षेत्र तिने  स्वकर्तृत्वाच्या जोरावर काबीज केले आहेत,
किरण बेदी, कल्पना चावला, इंदिरा गांधी, पी.टी. उषा, मेरी कोम, लतादीदी, आशाताई…
पण तिच्या कतृत्वाकडे दुर्लक्ष करत आजही ‘ती’ नको ‘तो’च हवा असा हट्ट धरणाऱ्या काही समाजात जन्म होण्याआधीच तिला संपवण्यात येते. 
‘ती’ ने प्रेमाला नकार दिला म्हणून ‘ती’ च्यावर अॕसिड टाकण्यात येते, 
स्वतःच्या सुखासाठी ‘ती’ च्यावर अत्याचार केला जातो.आजही समाज त्याच्याशिवाय ‘ती’ चे अस्तित्व मानायला  तयार नाही…अजूनही ती पूर्ण मुक्त आहे कि मुक्ततेच्या वाटेवर आहे कि इथेच मुक्त होण्याचा प्रवास थांबलाय….अशाअनेक प्रश्नांची आवर्तने  तिच्याभोवती आहेत.
घराबाहेर कर्तबगार असलेली ,मान मिळवणारी ‘ती’ उंबरठ्याच्या आतही तेवढाच मान मिळवते कि जुनी मानसिकता आजही तिच्यावर हल्ले चढवते….असे एक ना अनेक अनुत्तरीत प्रश्न….अजूनही ‘ती’ उत्तरे शोधत आहे.
तिमिरातून तेजाकडे ,प्रगतीपथावर एकेक पाऊल टाकत नेटाने पुढे  जाणाऱ्या ‘ ती’ला  शब्दपर्णकडून अनेक शुभेच्छा
‘ती ‘….शब्दपर्ण टीमने प्रकाशित केलेल्या स्त्री विशेषांकात ती च्यावर आधारीत कविता,लेख ,कथा,वाचा.
आवडल्यास दुसऱ्यांनाही वाचायला सांगा
धन्यवाद
प्रिती गजभिये
सफर बहोत है कठीन मगर
 नही रहनेवाली ये मुश्किले, 
के है अगले मोडपें मंजिले
शब्दपर्णचा हा सर्वांगसुंदर स्त्री  विशेषांक वाचण्यासाठी खालील चित्रावरील डाव्या बाजूला असलेला arrow click करा.

स्री विशेषांक (ती) (2022)
शब्दपर्ण विशेषांक

 

आमचा हा विशेषांक तुम्हाला कसा वाटला…अवश्य कळवा

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

error: Content is protected !!