एक होता कार्व्हर-रसग्रहण
एक होता कार्व्हर-रसग्रहण

एक होता कार्व्हर-रसग्रहण

एक होता कार्व्हर-रसग्रहण

वैशाली जोशी खोडवे

विणा गवाणकर यांनी जाॅर्ज वाॅशिंग्टन कार्व्हर चे चरित्र ह्या पुस्तकातून मांडले आहे.
आत्ताच्या संदर्भात म्हणायचे झाले तर ” काय तो माणूस, काय ती मेहनत,काय ते जीवन…..सगळेच ओक्के!!!!!.

विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर, खरच हे मान्य करावे लागते की कार्व्हर हे एक असामान्य व्यक्तीमत्व होते. पण एक मात्र नक्कीच की जे प्रसिद्धीचे वलय,आईनस्टाईन, वगैरेंना लाभले ते कार्व्हर यांना लाभले नाही.
He always remained an unsung hero.
त्यांची ओळख ह्या पुस्तकात होते ती आपल्या सगळ्यांनाच खूप प्रेरणादायक आहे. मला तर खरेच असे वाटते की भली मोठी fees भरून positive thinking, व्यक्तीमत्व विकासाची….जे ….कर हर मैदान फत्ते….छाप seminar ला मुलं मुली जातात, त्याची काहीच गरज हे पुस्तक वाचल्यावर रहात नाही, इतके ते आपल्यावर प्रभाव टाकते. यात कोणताही उपदेश केलेला नाही, की पैसे कसे कमवायचे? जगायचे कसे? अशा what’s App वर फिरणाऱ्या शेंडाबुडुख
नसणाऱ्या गोष्टी ही नाहीत.
आहे ते फक्त कार्व्हर यांचे मन हेलावून सोडणारे अल्प चरित्र.

दोन वेळेच्या नाहीतर एका वेळेच्या खाण्याची भ्रांत असलेला मुलगा एका लाँड्रीत कामाला लागतो. त्यावेळेस शाईपेन वापरले जायचे, त्यामुळे शाईचे डाग हमखास शर्ट च्या खिशाला असायचे.त्यावेळची शाई ही तशी development stage मधे होती. त्यामुळेच ते डाग आजिबात निघायचे नाहीत. विचार करा लौकिकार्थाने शिक्षण ना के बराबर…, पण फक्त प्रश्नावर उत्तर शोधायचेच ह्या विजगिषू वृत्तीने ह्याने अनेक प्रयोग केले, अनुभवातून शिकत गेला, आणि शेवटी असा द्रव पदार्थ विकसित केला की त्यामुळे ते डाग नाहीसे होत आणि कापड ही खराब होत नसे.
त्या लाँड्री चा हा लौकिक पंचक्रोशीत पसरला आणि त्यांचा व्यवसाय अनेकपटीने वाढला.कोठून आली ही वृत्ती, ही बुद्धी?
असेच शेतीत मजूर म्हणून काम करताना त्यांनी पिके, फुले,फळे, यांच्या जाती,त्यावर पडणारे रोग, त्यावरील उपाय यावर ही अफाट काम केले.त्यातून त्याना आर्थिक, सामाजिक स्थैर्य लाभले,पण आपल्या कामात सतत व्यग्र असलेला हा माणूस आपला पगार घ्यायलाच कित्येक महिने विसरायचा.
नाताळची भेट म्हणून कोणीतरी मिठाई पाठवली, घरात आनंदाचे वातावरण होते, मिठाई चे पूडे सोडताना ह्यांचे लक्ष त्या दोऱ्या वर गेले…..झाले….लगेच ह्या माणसाच्या डोक्यात काय आले कोणास ठाऊक ते दोरे घेऊन तो जे काॅलेज च्या प्रयोगशाळेत गेला ते ८ -१५ दिवसानंतरच बाहेर आला…आला ते एका मोठ्या धोक्यापासून आमेरिकेची शेती वाचवण्याच्या उपायासहच….कोणाला सूतराम कल्पनाच नसलेला धोका त्यांना जाणवला तो त्या दोऱ्या वर दिसलेल्या विशिष्ट जातीच्या बूरशी मूळे.
अशी अनेक कामे खरेतर कारनामे त्यांनी आयुष्यात केले….
शिक्षण, पैसा, परिस्थिती, कशा कशाचा बागुलबूवा न करता, हा माणूस उद्योगी राहीला, प्रयोगशील राहीला, आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी न करता, समाजासाठी, देशासाठी करत राहीला.
त्यांच्या अशा वृत्तीमुळे, कामामुळे हे पुस्तक आपल्या विचार पद्धतीवर प्रभाव टाकतेच.
कोणाला भेट देण्यासाठी, मी तर म्हणते अगदी संक्रांतीच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रम त लुटण्यासाठी, इतर निरुपयोगी वस्तूंपेक्षा हे पुस्तक नक्कीच एक उत्तम पर्याय आहे.
भगवद्गगिता मी वाचली नाही. त्यामूळे त्याचा प्रभाव मी अनुभवला नाही. पण ह्या पुस्तकामूळे माझा mind set मात्र बदलून गेला आहे.
तुम्ही ही नक्की वाचा.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

 

16 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!