चौकोन-चौकोनाची मराठी कथा
चौकोन-चौकोनाची मराठी कथा

चौकोन-चौकोनाची मराठी कथा

चौकोन-चौकोनाची मराठी कथा

अविनाश सकाळपासून सुमतीची लगबग बघून हसताहेत मनातल्या मनात.
मुले भेटायला येत आहेत आज.
उत्साह उतू चाललाय सुमतीचा.
बायका इतक्या क्षमाशील कशा राहू शकतात. अविनाश नवल करीत आरामखुर्चीत तसेच बसून राहीले
सुमतीशी काहीही बोलण्यात अर्थ नव्हता आता.
ती कधीचीच मुलांच्या जगात पोहचली.
आज तिचा वाढदिवस म्हणून येताहेत मुले भेटायला.
हे बरे आहे. वर्षातून एकदा केक घेऊन यायचे….अविनाशने आवंढा गिळला.
कितीही आठवणी दूर सारल्या तरी त्या नाही सोडत आपल्याला.

स्पंदन….पहीला मुलगा. आईच्या ह्दयाजवळचा म्हणून त्याचे नाव स्पंदन ठेवले तिने.
लगेच दोन वर्षानी स्पृहा आली.
चौकोनी कुटुंब- पूर्ण कुटूंब
सुमती आई बनल्यावर  किती बदलली.
संगोपन नीट व्हावे म्हणून नौकरी सोडली
मुलेच तिचे आयुष्य बनले. 
मुलांना अविनाशनेही रागवलेले तिला आवडायचे नाही.
सतत मुले ,त्यांची शाळा,त्यांचा अभ्यास,त्यांचे संस्कार…..यातच गुंतवून घेतले तिने
जरा मुले मोठी  झाली…मग त्यांना वेगवेगळे classes, शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव
छोट्या छोटया  गोष्टींसाठी मन मारणे,रिक्षाचे १५ रु. 
वाचवण्यासाठी पायी पायी चालणे…. दोघांमध्ये भेदभाव होऊ नये म्हणून जीवापाड प्रयत्न करणे
तिच्या मैत्रीणी छान enjoy करत असतांना ही मात्र  मुलांमध्येच गुरफाटून राहायची
वेळ पुढे पुढे जात राहिला.
मुलगा,मुलगी मोठी झालीत.
चौघांचा चौकोन मोडून बाहेर पडली.
स्वतःचे वेगळे वेगळे घरटे बांधले,चौकौन तयार केले
त्या चौकोनात या दोघांना जागा नाहीय.
मुलीला संपत्तीचा हिस्सा दिला म्हणून मुलगा रुसलेला
दादाच तुझा लाडका,तो मुलगा आहे नं ….म्हणून मुलगी नाराज
दोघांनीही आईवडीलांची जबाबादारी झटकायची म्हणून तकलादू कारणे पुढे  केली
सुमती-अविनाश….
आज मुले वृद्धाश्रमात येत आहेत केक घेऊन. 
 
 
 
 
 
 
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
 
Email
whatsapp no,
9867408400
 
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
 
 

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

 
 
 
 
 

One comment

Comments are closed.

error: Content is protected !!