तिचे निर्णयस्वातंत्र्य-मराठी स्त्री कथा
तिचे निर्णयस्वातंत्र्य-मराठी स्त्री कथा

तिचे निर्णयस्वातंत्र्य-मराठी स्त्री कथा

तिचे निर्णयस्वातंत्र्य-मराठी स्त्री कथा

 

आई..कमाल आहे तुझी.. अग तुझ्या लग्नाला सत्तावीस वर्ष झाली तरी तुझे तेच… थांबा बाबांच्या कानावर घालावे लागेल..नंतर किती गोंधळ करतात ते माझ्या मागे..आणि त्यांना विचारले तर काय बिघडते?

अग आई… किती बिनकामाच्या गोष्टी विचारते त्यांना ..आता कालचीच गोष्ट बघ नं काही गरज होती का विचारायची..रूही बोलत होती..
काय विचारले मी… मला तर आठवत नाही.कावेरी बोलली
अग प्रत्येक गोष्टीत बाबाचा सल्ला घेशील तर कसे आठवेल तुला..पूर्ण परावलंबी झाली ..त्यांचे ऐकून …ऐकून
अग कालची कुकरची गोष्ट घे ना… दोन महिने झाले कुकर बिघडले आहे .. फटकन नविन आणायचा तर ते पण बाबाला विचारायचे.. तुला त्रासदायक होते नं सर्व…बाबांना या गोष्टी नाही कळत ..ते त्यांच्या कामात व्यस्त असतात..अशावेळी… आवश्यक गोष्टी आणायला नको का? अग किती विचारून करते सर्व ..माहेरी जाऊ का..? इथे.. जाऊ का?तिथे जाऊ का.. भाजी काय करू..? साडी आणू का..?कितीतरी आहेत अशा गोष्टी.अग साधी रद्दी सुध्दा विकत नाही ..रविवारी बाबा घरी असले तेव्हा विकते.. काय म्हणाव बाई तुला ? अग एकमेकांना सल्ला विचारून काही घेणे चांगले आहे पण भाजी काय करू?
हे करू का .. ते करू का फारच नवल वाटते मला.रूही बोलत होती.
अरे बाळा.. लग्न झाले तेव्हा वय लहान.. अल्हड स्वभाव.
व्यक्तिस्वातंत्र्य ही संकल्पना नावालाही नव्हती.माझी आई आजी यांना सतत दबावाखाली बघण्याची सवय. आई आजीची तिच शिकवण ..

घरात पुरूष मंडळीचे एकच सांगणे… बाया..माणसाने घरातल्या व्यवहारात नाक खूपसायचे नाही.. घरात बसून मिळते सर्व ..खाणे.. पीने.. चोळी बांगडी.. दाग ..दागिने..मग कशाला मध्ये .. मध्ये करायचे? अग घरातील एकही निर्णयात सहभाग नसायचा तिचा. संसारात राहून एकाकी अलिप्त राहण्यासाठी असायची स्त्री …
मी पण तेच बघत आली.. मनावर त्या गोष्टी ठसत गेल्या.पण माझा काळ त्यांच्या पेक्षा सुधारित आहे.मुली शिकायला लागल्या.. आईवडील मुलीकडे व्यक्ती म्हणून बघू लागले.. मी कमीतकमी बाबांना विचारू तर शकते. आता काळ बदलला.. माझाही लाजरा.. बूजरा स्वभाव काळाप्रमाने बदलत आहे. मी पण बदलविण्याचा प्रयत्न करत आहे.. काळाच्या प्रवाहात मलाही पोहायला आवडेलच ग.. थोडा वेळ तर लागेलच ..
तुझे लहानपण.. माझे लहानपण यात भरपूर फरक आहे..
तुम्हाला मोकळे बोलण्याची मुभा घरात आणि शाळेत पण मिळाली..मोकळा श्वास घेता आला.. आम्हाला सततची बंधने लादलेली.. आपणही एखादा निर्णय घेऊ शकतो.. .ही कल्पना कधी मनाला शिवलीच नाही.

आता काळ बदलला.. स्त्री मुक्तपणे वावरताना दिसते.. तिच्या इच्छा अपेक्षा व्यक्त करते.. हे पाहून डोळ्यासमोर आई आजीचे व्याकूळ चेहरे डोळ्यासमोर येतात.. काय कमी होते त्यांच्यात..पण त्या काळाच्या ओघात नाही सांगू शकल्या काही. तो काळच तसा होता.काय करणार?.किबंहूना त्यांच ऐकायला कुणाला वेळ नव्हता .. चूल आणि मुलं या पलिकडे स्वतः साठी कधी जगल्याच नाही त्या.. अतृप्त इच्छा अपेक्षा वेदना घेऊन निघून गेल्या.त्यांच्या मनाचा विचार कधी कुणी केलाच नाही. त्या काळात फोन नाही.. शिक्षण नाही..कधीमधी माहेरचा निरोप कळायचा..दिवाळीला कुणीतरी घ्यायला पाठविले तरच माहेरी जायला मिळायचे. आता खूप काही बदलत चालले आहे.. काही वाईट तर काही चांगले..स्वातंत्र्याचा नावाखाली स्वैराचार वाढला.. लग्नानंतर काही दिवसात घटस्फोट दिसत आहे..अग निसर्गाने स्त्री आणि पुरूषाला वेगवेगळे बनविले आहे.. स्त्रीला तर त्याने मातृत्वाचे वरदान दिले आहे.. सहनशक्ती … प्रेम .. माया.. जिव्हाळा.. तिच्यात ठासून भरला.. आहे .. खरे म्हणजे.. तिच्या त्यागावर घराचे चार खांब उभे असतात..
पुरूषांना निसर्गाने धीर.. गंभीर
बनविले आहे ..तो आपल्या कर्तव्यात कसूर नाही करत..तोही आपल्या कुटुंबावर तेवढेच प्रेम करतो.. जेवढी स्त्री .. पण तो व्यक्त होत नाही.. दोघेही संसार रथाचे दोन चाके आहेत .. आयुष्यभर सोबत करायची एकमेकांची कावेरी सांगत होती.

खरेच आजकालची मुले खूप हुशार आहेत..मनातील गोष्टी किती छान प्रकारे मांडू शकतात. नाहीतर माझे बघा विचारल्यावरच समोर जाते मी..नाहीतर पाय तिथेच थबकतात.. पण आता नाही… जे जमेल ते मनासारखे करायचे.. कावेरी स्वतःशी बोलत होती.

खरे आहे तुझे.. रूही.. काळाप्रमाने बदलायला हवे..काळाची गरज आहे ती…
चल बरे आपण कुकर घ्यायला जाऊ.
अग बाबांना फोन करून विचार तरी…रूही हसली…
नाही… आता फक्त महत्त्वाचेच बाबांना विचारायचे..
अग पण बाबा रागावतील ना…
जाऊ दे… ग.. मला पण तुमच्या प्रवाहात पोहायचे आहे बाई आता..
दोघी किती तरी वेळ खळखळून हसत होत्या..

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
विविध साहित्य   वाचण्यासाठी खालील लिंक बघा.

https://marathi.shabdaparna.in/सिनेमा

https://marathi.shabdaparna.in/अद्भुत

ज्योती रामटेके

8 Comments

  1. SmitaA

    निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले की, निर्णय क्षमता हा गुण विकसित होते.

  2. Darshana1972

    खूप सुंदर.. घरातील इतर सदस्यांनी तिच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करावे..

  3. प्रमोद चव्हाण

    स्री आणि तिचे जग, तसेच त्या जगात, वावर ताना, स्री, निर्यण स्वतंत्र व त्याबाबत, तिला पडनारी प्रश्न, आणि वास्तविकता याची साधा , सरळ , सोप्या भाषेत , एक उत्कृष्ट मांडणी. खुप छान …👍👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!