काही गुन्हे अक्षम्य असतात.
भाग-१२
अंतर्मनातील गुढ हे शिर्षक दिले कथेला. पण पुढे काय?
काही सुचत नव्हते.
आनंद परत उठून बाहेर आला.आई-बाबा उठले होते.
बाबांजवळ जाऊन बसला.
का रे? लवकर उठला.अस्वस्थ वाटत आहेस.
नाही बाबा.
बाबांच्या नजरेतून काही म्हणता काही सुटत नाही.
सेवानिवृत्त झाले तरी ती नजर शाबूत आहे बाबांची.
आई तिघांसाठी चहा घेऊन आली.
आई मस्त झाला ग चहा. शलाकाला शिकव ना असा चहा बनवायला.
शलाका खोलीतून बाहेर येतच होती.ती खोट्या रागाने
म्हणाली, ए रोज तर माझ्याच हातचा चहा लगतो.आज आईने दिला तर लगेच शलाकाला चहा नाही येत.
आनंद हसत म्हणाला,
अग तू आलं नाही टाकत ना.
तेवढ्यात आई शलाकासाठी चहा घेऊन आली.
आई खरचं तुमच्यासारखा चहा नाही बनत माझ्याकडून.
ते आलं टाकायलाच विसरते मी.
येईल ग.
कधी येईल पण?
आनंद बोलला.
गमतीजमतीत पहाट संपली.
आनंद काॕलेजमध्ये आणि मुक्ता शाळेत गेली.
शलाका
काय बाबा
आनंद आज पहाटे जरा अस्वस्थ वाटत होता.ठीक आहे ना सगळे?
हो.
कदाचित् माझ्या रात्रीच्या बोलण्याने अस्वस्थ झाला असेल.शलाकाच्या मनात आले.
आनंदची आई लगेच बोलली
तुम्ही पण ना.नेहमी पोलिसाची नजर घेऊन वावरता घरात.
अहो ठीक आहे तो.नंतर चहाही पिला आपल्यासोबत गप्पाही केल्या.
हो ग.पण मला जाणवत होती त्याची बेचैनी.
तुम्ही जास्त काळजी नका करत जाऊ.मोठा झाला आता आनंद.
लिलावतीताई शलाकाकडे वळून म्हणाल्या
शलाका अग,आनंदी येत आहे उद्या आठएक दिवसासाठी.
हो.मलाही आला होता फोन. बऱ्याच दिवसानंतर येत आहेत ताई.
हो ना.अग मुलांची शाळा,तिची नौकरी यामुळे नाही जमत.
तुम्ही दोघेही फिरत जा बाई मुक्ता लहान आहे तोवर.मग तुम्हीही अडकून राहणार.
आनंद पहाटेच एअरपोर्टवर जाऊन आनंदीला घेऊन आला.आनंदीसोबत जय आणि छोटी पूर्वाही आले.
दोघांना आजी-आजोबा,मामा-मामीसोबत राहायला आवडायचे. ते आले कि मुक्ताही खूष असायची.आठच दिवसांसाठी आली होती आनंदी.दिवस भुरकन जात होते.
आनंदीला शलाकाच्या आईने पाहूणचाराला बोलवले.सोबत शलाका आणि घरच्या सगळ्यांना बोलवले.
जेवणे झाली.सगळे घरी जायला निघाले पण पूर्वा अंगणातील झोपाळा सोडायला तयार नव्हती.
शेवटी पूर्वाच्या हट्टापायी शलाका,आनंदीने रात्रभर तिथेच राहायचे ठरवले.
आनंदच्याही मागे जय ,पूर्वा थांब ना मामा म्हणून मागे लागले.पण तो तिथे कधी थांबत नव्हताच. तो,आई-बाबा परत गेले.
मुले बराच वेळ बागेत खेळली.रात्र बरीच झाल्यावर सगळे झोपायला घरात आले.आनंदी मुलांना घेऊन नक्षत्राच्या खोलीत झोपणार होती.शलाकालाही तिथे झोपण्याचा आग्रह केला पण ती आणि आई हाॕलमध्ये झोपल्या.
मामी अग चल ना आमच्यासोबत झोपायला.शलाका त्या खोलीत झोपणे शक्य नव्हतेच.आनंदीलाही शलाकाच्या वागण्याचे आश्चर्य वाटले.
आठ दिवस कसे संपले कळलेही नाही.आनंदी मुलांना घेऊन परत गेली.
आनंदसरांना पी.एच.डी. मिळाली.
आज सत्कारसमारंभ. आनंद सोबत घरचे सगळे आणि शलाकाची आईही गेले.
सगळ्यांसाठीच अभिमानाचा क्षण होता.
दुसऱ्या दिवशी काॕलेजमध्ये पण हर्षोत्सवाचे वातावरण होते. तिथेही आनंदच्या सहकाऱ्यांनी सरांचा सत्कार ठेवला.
आनंदसर शलाकाला घेऊन आले.
आनंदचे एवढे कौतुक,सगळ्यांकडून त्याला मिळणारा मान बघून शलाकाला गहिवरुन आले.
शलाका-आनंदचा लग्नाचा वाढदिवस.
पाचवा वाढदिवस.त्यांनी घरीच साजरा करण्याचे ठरवले.
बाबांनी केक आणला heartshape चा.
आज सगळे आटोपले कि आनंदला सांगायचेच असा शलाकाने निर्धार केला.पूरे झाली फसवणूक.
आनंदच्या डोळ्यावरची पट्टी काढायलाच हवी.
मुक्तावर किती प्रेम आहे त्याचे.
मी सांगितलेले तो सहन करुन शकेल?
मुक्ता तर त्याचा जीव कि प्राण.
पण तरीही खरे जाणून घेण्याचा अधिकार त्याला आहेच.
रात्र झाली.
शलाका एकमेकांच्या सोबतीत पाच वर्ष कसे गेले समजले नाही.
हो ना.आनंद तुला काहीतरी सांगायचे आहे रे.
सांग ना.
हिंमत गोळा करतेय.मी सांगणार आहे ते ऐकून तूझी कशी प्रतिक्रिया होईल माहित नाही.पण तुझ्यापासून अजून लपवून ठेवू शकेन असे वाटत नाही.
मी सांगितल्यावर तू मुक्ता आणि मला सोडूही शकतोस.
पण तू आम्हाला सोडण्यापेक्षाही तुझ्यासारख्या सच्छिल माणसाला फसवत राहण्याची वेदना जास्त जीवघेणी आहे.
आनंद चूपचाप सर्व ऐकत होता.
आनंद मी सांगितल्यानंतर आपण सोबत राहायचे कि नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल.तू कुठलाही निर्णय घेशील तो मला मंजूर राहील.
अग पुढे बोल ना.
मुक्ता….आनंद मुक्ता तुझी मुलगी नाही.
म्हणजे? मी समजलो नाही.
ती त्या नराधमाची मुलगी आहे.
कुणाची? आनंद,अरे कसे सांगू तुला.आपल्या लग्नाच्या एखाद महिन्याआधी माझ्यासोबत होऊ नये ते झाले.
कोणीतरी घरी मी एकटी असण्याचा आणि अंधाराचा फायदा घेऊन माझ्याशी अतिप्रसंग केला.
तो दिसला नाही तुला?
नाही ना.दिसला असता तर त्याचा जीव नसता का घेतला मी.
आनंद ते सगळे झाले माझ्यासोबत आणि आयुष्यच बदलले रे माझे. चैतन्य हरवले आयुष्यातुन.
महिनाभरात आपले लग्न झाले. लग्नानंतर मी ते सगळे विसरण्याचा खूप प्रयत्न केला.पण तुझा चांगुलपणा बघितला कि आतला सल अजून बोचायचा.
लग्न झाले तुझ्यासारखा माझ्यावर अमाप प्रेम करणारा जोडीदार मिळाला.नवरा कमी मित्र जास्त राहलास तू कायम.
मला काहीही करायला आडकाठी न घालता कायम मला समजून घेणारा माझा सखा बनला.
नेहमी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा प्रियकर बनला.
संकटकाळी हात न सोडणारा आधार बनला.माझ्या मुक्ताचा बाबा बनला.
बाबा गेले तेव्हा मला,आईला दुःखातून बाहेर तूच काढले.
प्रत्येकात काही ना काही कमी असते म्हणतात.पण तुझ्यात शोधूनही कमतरता मला दिसली नाही.
क्रमशः
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.






विचित्र वळण कथेला .
छान कथा
छान कथा