७-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-By-ज्योती रामटेके
दिवस उजाडला. बाबा फिरायला गेले. नेहमीप्रमाणे अपर्णा झोपलेली.चंदना रोज रांगोळी काढणार,हे रोजचे ठरलेले.
आई- चंदना,अपर्णाला जागे कर जरा, किती बेजबाबदार आहे ही मुलगी. आज तिला काढायला लाव रांगोळी. या पोरीचे कसे होईल देव जाणे…
लहान आहे अपर्णा, करु दे तिच्या मनाने.चंदनाने नेहमीप्रमाणे बहिणीची बाजू घेतली.
तुझ्या पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे ती. तू मात्र लहानपणापासून मोठी झाली. बाबा फिरुन आले.
चंदना चहा घेऊन आली. बाबांनी आईला आवाज दिला.
बाबा-उद्या सुमनताई कडे जायचे का? चंदना बस. चंदना तुला आवडले नं ते लोक. शेवटचा निर्णय तुझाच राहणार.
चंदना-बाबा तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य राहील.
बाबा-चंदना तू याच शहरात राहते म्हटल्यावर आम्हाला काळजी नाही. तुलाही आमचा आधार राहणार. तू डोळ्यासमोर राहशील. नौकरी केली तर आमची मदत होईल तुला.
प्रेमापोटी आम्ही स्वार्थी बनलो आहोत. नाहीतर नौकरी असणारे मुले विचारत आहेत.पियूषला काही कमी नाही.
मेहनती आहे. शेती करतो. नौकरी लागेलच.
चंदना-हो,बाबा तुमचे बरोबर आहे. मला पण तुम्हाला सोडून दूर नाही जायचे आहे.तुमच्या छत्रछायेखाली राहायचे आहे मला.तुमच्या आशीर्वादाने माझी प्रगती होईल
बाबा-चंदना .. माझ्यानंतर शोभा झाली, माझी खूप लाडकी.
आई दिवसभर शेतात राबायची. शोभाची जबाबदारी माझ्यावर आली. माझा संपूर्ण दिवस तिच्या अवतीभवती
राहण्यात जायचा. नंतर तिच्या सोबत खेळने, जेवण करणे
तिला कथा सांगून झोपी घालणे माझ्याकडे आले. आम्ही मोठे होत गेलो. ती मामाकडे दोन दिवसाला जरी गेली तरी मला करमायचे नाही.
आई म्हणायची, अरे सवय कर आता.
थोड्याच दिवसात लग्न करायचे आहे तिचे.
मी घाबरायचो. मला तर वाटायचे तिला गावातला मुलगा मिळायला हवा.तसे काही झाले नाही. ती लांब गेली.
तो काळ वेगळा होता. मुली माहेरी कमी येत होत्या. ती लांब असल्यामुळे वर्षातून एकदा येत होती.मी जायचे ठरवले तर पैशाची चणचण.नंतर लग्न झाले. तू आली.
घर कसे फुलून गेले. आता तर आत्या थकली. चार वर्षांपूर्वी आली होती.
अहो, जरा जाण्याचे ठरवू .
आई बोलली. त्यांना फोन करून सांगितले तर बरे होईल.
बाबा- हो..हो,सांगून दे त्यांना. या रविवारी येणार म्हणून.
रविवार उजाडला. आई,बाबा, मावशी, घर बघायला गेले.
पियूषचे घर बरे होते. घरात सामान कमी,अडगळ जास्त होती.साफसफाई कुठेच दिसत नव्हती.चंदनाला तर स्वच्छ, टापटीप हवे सर्व. आईच्या मनात आले.
घरी आई, बाबा होते. भाऊ नव्हते. मधली वहिनी होती.
एका भावाची नुकतीच त्याच शहरात बदली झाली होती.
तो त्या गडबडीत होता. वहिनी बोलकी वाटली. आई नेहमीप्रमाणे शांत बसून होती. विचारण्यासारखे काही नव्हते.पियूषचे कौतुक सुमनताई सांगत होत्या. लवकरच नौकरी लागणार आहे हे ठासून सांगत होत्या.
दोन्हीं बाजूंनी पसंती झाली,आता समोरचे ठरवायचे का?
पियूषचे बाबा बोलले.
लग्न लवकर करु. या पंधरा दिवसात आटोपून टाकू. सुमनताई बोलल्या.
पंधरा दिवसा म्हणजे फारच लवकर होईल.आमच्या घरचे पहिले कार्य आहे.चंदनाच्या लग्नात सगळ्यांना यायचे आहे.सर्व तयारी करायला एक महिना तरी लागेलच.
बाबा बोलले.पियूषचे आई-वडील तयार झाले.
आई,बाबा, मावशी घरी आले. लग्नाची तारीख माहिन्यानंतर काढली. तयारी सुरू झाली. घरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
क्रमशः
पुढील भागाची लिंक
https://marathi.shabdaparna.in/८-सुन्
याआधीचा भाग वाचण्यासाठी लिंक
https://marathi.shabdaparna.in/६-सुन्या
कथामालिका आवडत असल्यास नक्की कळवा.
प्रिय वाचक, तुम्हीही शब्दपर्णवर लिखाण पाठवू शकता.







सुंदर कथानक
वा ! चला चंदनाच्या लग्नाला.
सुरेख कथा