Marathi story-पश्चात्ताप
नोकरीत बढती मिळाल्यामुळे योगेशची सर्व मित्रमंडळी त्याच्या घरी पार्टीसाठी जमली होती.
.पण..योगेश चे वडीलजगदीशराव मात्र रोजच्यासारखे
आपल्या खोलीत बसून फोटोतील अर्ध्यावर सोबत सोडून गेलेल्या.. सुमती शी बोलत होते. बाहेरुन गप्पागोष्टी, पाहुण्यांचे हसणे खिदळणे, मंद-मंद आवाजातील गाणी
खोलीत त्यांना ऐकू येत होती. पदार्थांचा खमंग दरवळ घरभर पसरला होता. सुमती गेल्यापासून…..जगदीशराव एकाकी पडले.
घरात…फक्त चारच माणसे..
पण योगशला घरातील व्यक्ती..बाबासोबत बोलायलाही .. वेळ नव्हता. आसावरी(सून) घरकामात व्यस्त.. सौम्यचा (नातवाचा) आपल्या आजोबावर फार जीव. आताही आजोबांना खोलीत एकटे जेवायला बसलेले पाहून त्यांना बाहेर न्यायला आला. पण जगदीशराव त्याला नकार देत म्हणाले..
घरात पाहुणे आहेत…. सौम्य मी बाहेर त्यांच्या समोर आलो तर …तुझ्या…बाबाला आवडणार नाही.
चला तुम्ही …आजोबा माझ्यासोबत ..तुम्हाला कोणी काहीच बोलणार नाही.
असे म्हणत सौम्यने आजोबाला हाताला धरून बाहेर आणून खुर्चीवर बसवले …
आणि त्यांच्यासोबतच जेवायला बसला… (त्यांना बघताच योगेश च्या चेहऱ्यावर नाराजी पसरली) योगेश त्यांना खोलीबाहेर आलेले पाहून कपाळावर आठ्या पाडत जवळ येत म्हणाला,
बाबा.. तुम्हाला किती वेळा सांगितले घरी पाहुणे आले असताना त्यांच्या समोर जेवायला बसत जाऊ नका म्हणून..
मुलाचे बोलणे ऐकून जगदीशरावच्या
डोळ्यात टचकन् पाणी आले. आणि त्यांच्या हातून पाण्याचा पेला निसटला. त्या आवाजाने सर्व पाहुणे मंडळींच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. योगेश हळूच बाबाला म्हणाला,
पहा..काय अवतार केला. अंगावर सर्व खरकटे सांडले. मित्रांसमोर मान खाली घालाव लागते बाबा बरे दिसते का ?
बाबांना बोलून निघून गेला. सौम्यला त्यांनी असे आजोबाला रागावणे मुळीच आवडत नव्हते.
योगेश असा चिडलेला पाहून आसावरी पटकन बाबाजवळ आली त्यांच्या अंगावर सांडलेले खरकटे साफ केले.
नजरेने खुणवत सौम्यला आजोबाला त्यांच्या खोलीत नेण्यासाठी सांगितले. आई गेल्यावर बाबा उतारवयात एकटे पडले. त्यांना आता
ह्या क्षणी आपल्या सहानुभूतीची , प्रेमाची नितांत गरज आहे . ही साधी गोष्ट योगेशला त्यांचा मुलगा असून ही समजत नाही. आपली इज्जत,प्रतिष्ठा जपण्यासाठी तो इतका अंधाधूंध झाला की..आपल्या अशा वागणुकीचा भविष्यात सौम्यवर काय परिणाम होईल . याचे सुद्धा साधे भान त्याला असू नाही. आसावरीला आता कुटुंबाची काळजी वाटत होती. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. सौम्य आता कॉलेजला जाऊ लागला. योगेशला पण नोकरीतून निवृत्ती होण्यासाठी अवघी काही वर्षे उरली . . वयोमानानुसार तब्येतीच्या तक्रारी हळूहळू डोके वर काढू लागल्या ..आजोबाने तर जसे स्वतः ला आपल्या खोलीत कोंडून घेतले होते.सौम्य एम् बी ए मध्ये कॉलेजमधून चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन पहिला आला.. त्यामुळे त्याने घरी वर्गातील मित्रांसाठी छोटीशी पार्टी आयोजित केली . तेव्हा तो आपल्या बाबाला म्हणाला,
बाबा .. उद्या माझे काही मित्र घरी येणार आहेत. त्यांच्यासमोर येऊ नका.. मला लाज वाटेल…
हे ऐकून योगेश चा पारा चढला..का नको?
तू आपल्याच वडिलांशी असा उद्धटपणे वागतो..आम्ही कुठे कमी…पडलो तुला हेच शिकवले?
आजोबाही तुमचे वडीलच ना? मग तुम्ही त्यांच्याशी असेच वागत होता. मी हे सर्व तुमच्याकडून शिकलो. .
योगेशच्या तर तळपायाखालची जमीन सरकली. त्याला स्वतः च्या वागणूकीची लाज वाटू लागली .. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले.
खर आहे. तू बोलतो ते माझे चुकले माझ्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आज माझा खरा चेहरा तू मला दाखवून दिला .
माझ्या वागणुकीचा माझ्या मुलावर काय परिणाम होईल …याचा कधी विचारच केला नाही.
अजुनही वेळ गेली नाही बाबा. .तुम्ही जा ..आणि आजोबाला माफी मागा ते मोठ्या मनाने तुम्हाला माफ करतील..
योगेश चे पाऊल बाबाच्या खोलीकडे वळले..त्याने बाबाचे पाय धरून माफी मागितली. बाबांनी त्याला मोठ्या मनाने माफ करून मिठी मारली.सौम्यमुळे आज पूर्ण परिवार आज खऱ्या अर्थाने एकत्र आला होता कमी होती ती फक्त योगेशच्या आईची..सुमतीची…
.. सौ. दर्शना ओम भुरे हिंगोली..
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा







सुरेख कथा
जशास तसे उत्तर मिळाले , छान कथा
खुप छान कथा
खुप छान कथा
अप्रतिम 👌
Khup chan 🌹🌹🌹