अक्षम्य भाग-६

अक्षम्य
भाग-६
शलाकाने सासूबाईंना फोन लावला.
 दोघी इकडे आल्या की आई-बाबांना घरी मुळीच करमत नाही.
 आनंद म्हणाला
मुक्ता पण सतत आठवण काढत राहते.
लिलावतीताईंनी उत्तर दिले.
जेवण झाले.आनंदची नेहमीसारखी परतण्याची घाई सुरु झाली.
मुक्ता-बाबा आज मी तुमच्या जवळ झोपणार.
उद्या घरी आल्यावर झोप माझ्याजवळ.
नाही.मला आजच झोपायचे. मला गोष्ट ऐकायची परीची.
मुक्ता असा हट्ट नाही करायचा.
थांब ना आनंद मुक्ता एवढी म्हणतेय तर.
शलाका म्हणाली.
नाही ग.निघतो मी.आई-बाबा वाट बघत असतील.
आनंदची अस्वस्थता लक्षात येत होती तिच्या.
ती आनंदला अंगणापर्यंत सोडायला आली,
आनंद अरे कधीही तुला थांब म्हंटले कि तू अस्वस्थ का होतोस?
मुक्ताचे सगळे हट्ट पुरवणारा तू आज तिचेही ऐकले नाही.
अग, विशेष काही नाही.
पण मला घर सोडून राहायची सवय नाही ना.
आणि  तू माहेरी आहेस.मस्त माहेरपण उपभोग.
उद्या येतो मी.घरी जाऊ मग सोबतच.
असे म्हणत तो पुढे गेला सुद्धा.
ती घरात येत विचार करत होती.मागे महाबळेश्वरला गेलो तेव्हा चार दिवस तिथे मजेत होता हा. झोपायचाही व्यवस्थित.इथेच का अस्वस्थता येते याला? का थांबत नसेल आनंद इथे? काय कारण असेल?
आई आज तूच परीची गोष्ट सांग मला.
मुक्ताच्या आवाजाने शलाका भानावर आली.
बरं.सांगते हं.
एक परी होती ,आई-बाबांची खूप  लाडकी होती.एक दिवस एक राक्षस येतो……
आनंद संध्याकाळी दोघींना घ्यायला आला.
दोघीही तयारच होत्या.
चहा पिऊन तिघेही घरी परतले.
आजी आजोबा मुक्ताची वाटच बघत होते.
 बारावीचा निकाल लागला. नक्षत्रा चांगल्या मार्क्सनी पास झाली. आनंदने ठरवल्याप्रमाणे तिच्या  शिक्षणाची जबाबदारी आता त्याच्याकडे होती.
नक्षत्राला घेऊन तिचे वडील शलाकाच्या घरी आले.
मॕडम नक्षत्रा बारावी पास झाली.
आता पुढे  काय करायचे सांगा मॕडम तुम्हीच.
या आत.ये नक्षत्रा.
बसा इथे.
नक्षत्राला काय शिकायचे आहे? म्हणजे पुढे काय करायचे हे ठरवले का नक्षत्रा?
मॕडम मला तुमच्यासारखेच वकील बनायचे आहे.
नक्षत्रा  तू मला ताई म्हंटले तरी चालेल.
आनंदसर, काॕलेजमध्ये जायला निघाले होते.
नक्षत्रा इथे?
तिला बारावीनंतर काय शिकायला पाहिजे हे विचारायला आले.पुढे वकिल बनायचे म्हणते.
अरे वा! तुझा आदर्श घेतलेला दिसतो.
मग नक्षत्रा शलाकासारखेच आधी तू पण बी.ए. कर.मग Law.कर.
पण साहेब तिची राहण्याची सोय? बाकी खर्च?
नक्षत्राच्या वडिलांनी हात जोडत विचारले.
त्याची काही काळजी करु नका.
मी आज काॕलेजच्या होस्टेलची चौकशी करुन येतो.
Admisson चा
तुम्ही दोघे थांबा आज इथेच.
साहेब.तुमच्या घरी कसे थांबणार?
नक्षत्राचे वडील दबकत दबकत बोलले.
अहो थांबून जा आज इकडे. शलाका म्हणाली.
कसेबसे नक्षत्रा आणि  तिचे वडील थांबायला तयार झाले.
जेवणानंतर जरा वेळ गप्पा झाल्या.
आनंद झोपायला निघून गेला.
शलाका जरा वेळ  नक्षत्राजवळ बसली.
अजून नक्षत्रा तिच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हती.
नक्षत्रा आणि तिच्या वडिलांची झोपायची व्यवस्था करुन  शलाका झोपायला रुममध्ये आली.
आनंद काहीतरी लिहित होता.
काय लिहित आहेस आनंद.
अग blog वर टाकायला एक कविता लिहित आहो.
दाखव ना मला.
नको वाचूनच दाखव.तुझी कविता तुझ्या आवाजात ऐकायची मजा काही औरच असते.
बरं राणीसरकार.ऐका तर
कवितेचे नाव आहे स्वप्न
……स्वप्ने…..
   
 रात्रीला आग लागली
स्वप्ने सगळी भाजली
जीवाची झाली काहीली
चंद्राची साथ ना लाभली
चंद्र आता दुरावला 
गगनही अंधारला.
आठवतो ताऱ्यांचा फुलवा
डाचतो किती ह्दयाला 
ह्दय  आता भंगले.
प्रेमही नासले.
भावनांचे तरंग आता
एकएक विरले.
विरल्या एकएक भावना
जीर्ण झाले धागे
नाही विझवता आले
भाजलेल्या स्वप्नांना 
भाजलेली स्वप्ने 
आता सगळी संपले
आग लागली रात्रीला
तम जीवनी दाटले…
शलाका भान हरपून कविता ऐकत होती.
संपली मॕडम.
अरे काय एकेक शब्द आहे कवितेतील.
नक्षत्राच्या आयुष्याशी  मिळतीजुळती कविता.
आनंद माझ्या डोक्यात एक कल्पना आली.
बोल ना.
नक्षत्राला होस्टेलमध्ये ठेवण्यापेक्षा आईकडेच ठेवले तर.
आई तशीही एकटीच असते.तिला सोबत होईल आणि  नक्षत्राची राहण्याची सोय होईल. घरी राहल्यासारखे वाटेल तिला.
छान आयडिया आहे ही.
एकदा आईला विचारुन घे.
आई नाही म्हणणार नाहीच.पण एकदा विचारुन बघते.
बरं.
नक्षत्रा सावरली का ग?
नाही रे. विसरु शकत नाही आहे ती ते सगळे.
अग एवढ्या लवकर कसे विसरेल?
नाही रे.ही गोष्ट ती उशिराही नाही विसरणार.
कधीच नाही.तिच्या देहाची राख होईपर्यंत सोबतच राहणार तिच्या.
 पण शलाका तिची चूक नव्हतीच त्यात.
म्हणूनच ती विसरु शकणार नाही.कधीही नाही विसरु शकणार.
स्वतःची चूक एकदाचा माणूस विसरु शकेल पण दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतः भोगत राहणे भयंकर आहे.
आणि चुक अशाप्रकारची असेल तर  शिक्षा जास्त आहे,रोज रोज ओरबाडलेला देह घेऊन वावरतांना मन आक्रंदत असेल तिचे.
चल झोपू या शलाका आता…असे म्हणत आनंद झोपला.
क्रमशः
कथेची मुळ कल्पना-विशाल भोवते
पुढील भागाची लिंक

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!