काही गुन्हे अक्षम्य असतात.
अक्षम्य
अक्षम्य-भाग-१८
अंतिम भाग
शलाका….आनंदने आवाज दिला.
अग,उद्या मी काॕलेजच्या कामासाठी बाहेर चाललो,दोन दिवस लागतील परतायला.
लग्नानंतर आनंद पहिल्यांदाच एकटा कुठे चालला होता.
शलाकाला आश्चर्य वाटले.
काय काम आहे रे आनंद.
अग First year चे पेपरस् सेट करायला बोलवले.म्हणजे आधी मिटींग आहे त्यासंबंधी .
अच्छा.
चल तू पण सोबत.
नाही रे तू दिवसभर कामात राहशील.मी एकटी काय करणार तिथे?
आता पुढे वाचा…
आनंद गेला.शलाका ह्या घरात पहिल्यांदाच आनंदशिवाय राहली.
आनंदने दिवसभर कामे केली.रात्री हाॕटेलमध्ये राहावे लागणार होते.झोपायला बेडवर आडवा झाला.पण बेडवर येण्याआधी डोळ्यात असलेली झोप आता पार लांब गेली होती.डोळ्यासमोर ती रात्र उभी राहली.
आयुष्यातील सर्वच क्षण क्षणभंगूर नसतात.काही क्षण कायम पाठलाग करतात.
नेमके पाठलाग करणारे क्षण त्रासदायक ठरतात.
आनंदने आता मनात ठरवले,भूतकाळात घडलेले सगळे खोडून टाकायचे,आयुष्यातुन ते क्षणभंगूर नसलेले क्षण आता पार हद्दपार करायचे.आयुष्याची नव्याने सुरुवात करायची.फक्त मला माहित असलेले सत्य आता मी विसरायलाच हवे.
आनंद मनाशीपक्का निर्धार करत झोपी गेला.
पहाटेच त्याला जाग आली.आजचा सूर्य खऱ्या अर्थाने नवी पहाट घेऊन आला.आनंदला त्याचे मन निरभ्र,स्च्छ झाल्याचे जाणवले,मनावर पाच वर्ष लादलेले ओझे आजच्या सूर्योदयाने उतरवले होते.त्याने शलाकाला फोन केला.
आनंद येतो आहेस नं उद्या,?
हो ग.पण रात्रच होईल परतायला.
आईबाबा काय करत आहेत?
मुक्ता कुठे आहे? अशी विचारपूस करुन आनंदने फोन ठेवला.
शलाका आज दिवसभर फ्रीच असणार होती. नक्षत्राला दोन दिवस सुट्टी होती.गावी जाण्यापेक्षा ती काल शलाका,मुक्ताला भेटायला आली.नक्षत्रा आणि शलाका आईच्या घरी आल्या. तिथे छोटेसे होस्टेल बनवायची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. नक्षत्राची खोली बंद होती.तिचे जरा सामान होते त्या खोलीत.म्हणून ती खोलीत आली.तिची वाट बघत शलाका बागेत बसली. शिशिरातील पानगळ सुरु झाली होती.बागेत काही सुकलेली काही पिवळी पाने विखुरली होती.
नक्षत्रा तिचे सामान घेऊन आली.हातात एक प्लास्टिकची पिशवी होती. नक्षत्रा त्या खोलीत राहण्याआधी बहूतेक बाईने खोलीत पडलेले सामान तीत भरले होते.
दोघी ते सामान घेऊन परत आल्या. नक्षत्राला आजच परतायचे होते.ती तिचे सामान घेऊन परत गेली.
प्लास्टिकची छोटी बॕग शलाकाने हाॕलमध्येच टेबलवर ठेवली.
आजीसोबत बाहेर गेलेली मुक्ता घरी आली. ती छोटी बॕग बघून आत काय आहे म्हणून तिने ती टेबलवर उपडी केली.आजीचे मुक्ताकडे लक्ष होतेच.
निळ्या रंगाचे शर्टचे बटन त्यांना दिसले.
शलाका, हे कुठे मिळाले ग?
आई…शलाका पुढे बोलणार एवढ्यात सुमनताईच बोलल्या.
आनंदचा आवडता शर्ट होता निळ्या रंगाचा.त्याचे हे बटन आहे. हे बटन तुटल्यामुळे शर्ट तसाच राहला. घरात शोधले होते बटन मी.पण मिळाले नव्हते.आता पाच,सहा वर्षात शर्ट पण कुजला असेल.कुठे मिळाले ग तुला हे बटन?
आनंदचे काॕलेजचे काम संपले.आनंदाने तो वापस निघाला.निघण्याआधी त्याने शलाकाला फोन केला पण तिचा फोन बंद होता.बाबांना फोन करुन त्याने निघाल्याचे सांगितले.
आजपासून तो मनातून अपराधाची सल काढून आयुष्याची नवी सुरुवात करणार होता. येतांना शलाकासाठी तिच्या आवडीच्या हिरव्या रंगाची साडी घेतली.
काम लवकर संपल्यामुळे तो संध्याकाळीच घरी पोहचला.
घरी आईबाबा दोघेच दिसले.
शलाका आणि मुक्ता घरी नव्हत्या.
आई,शलाका कुठे आहे? अरे माहीत नाही.आम्ही दोघे देवळात गेलो होतो.आज शलाकाने मुक्ताला सोबत येऊ दिले नाही.
आम्ही देवळातून घरी आलो तर दार बाहेरुन बंद होते.तिला फोन करत आहोत तर उचलत नाही आहे.
असेल काही कामात असे म्हणत आनंद खोलीत गेला.तिथे त्याचा तो निळा शर्ट लटकवून होता.शर्ट बघून घाबरलेल्या आनंदने शर्ट कपाटात ठेवण्यासाठी हाती घेतला. खिशातून एक पेपर आणि बटन पडले.
पेपर तो वाचू लागला.
आनंद,तू कधीही तुझ्यावर संशय येवू दिला नाही.पण गुन्हा लपत नाही.आणि काही गुन्हे अक्षम्य असतात.
आनंदने फोन लावला,एकदा,दोनदा,तिनदा….नाही उचलला.
मोबाईलच्या स्क्रीनवर एक मैसेज झळकला.
‘आनंद तुझा गुन्हा अक्षम्य आहे’
समाप्त
अक्षम्य कथामालिका सुरुवातीपासून वाचण्यासाठी कथेचा पहिला भाग
अक्षम्य कथामालिका इथे संपली.
वाचकहो ,तुम्हाला काय वाटते…शलाकाने पश्चाताप झालेल्या आनंदला क्षमा करुन परत यावे कि आजवर शिक्षा भोगलेल्या त्याला पुन्हा शिक्षा करावी?
तुमचे मत आमच्यासाठी मौल्यवान आहे.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
छान कथा ,
आयुष्यातील सगळेच क्षण क्षणभंगुर नसतात.
खूप छान वाक्य.
🌟🌟🌟🌟🌟