marathi katha-जरा विसावू
marathi katha-जरा विसावू

marathi katha-जरा विसावू

सदाभाऊ जरा नाराजीतच पंलगावर बसून  होते चेहऱ्यावर चिंतेच सावट दिसून  येत होते .
” काय हो , काय  झालं?
रमाने किचन मधून  येतांना विचारलं .
काही नाही  ग 
सदाभाऊने विषय  टाळण्याचा प्रयत्न  केला
अग आज सागरचा फोन  आला होता.पुन्हा  त्याने 
पैशाचा  विषय काढला .मी पुन्हा  टाळला तो विषय
 आता आपल्याजवळ  आहेच काय.
रिटायर झाल्यावर जो पैसा  मिळाला तो असाच  खर्च  
केला तर आपल्याकडे  काय राहील 
” अग त्या पेंशन मध्ये  काय होत ?सुख आहे दुःख  आहे
पैसा नको का जवळ?
” तुमच खरे  आहे हो , पण  मुलांना  मदत नको का करायला
” मी काय म्हणते सागरला फ्लॅट  घ्यायचा आहे न
आपण  देऊ  नं  पैसे होईलच कसेबसे आपले
दोघांना  लागतोच किती  पैसा.
सार आयुष्य  काटकसर करण्यात  गेले , सवय आहे मला.
 
” अग रमा मला थोडा  आराम  करू दे.पलंगावर  पडताच सदाभाऊ भूतकाळात  हरवून  गेले .
आई लहानपणीच
देवाघरी निघून  गेली.लहान  बहिण भावाची  जबाबदारी
नकळतच अंगावर  पडली.काही  दिवसांनी  बाबांनी  दुसरे
लग्न  केले.पण  परिस्थिती  फारशी  नाही  बदलली.बहिण
भावाचा अभ्यास , शाळेची  तयारी  सर्व  बघावे  लागायचे
काही  दिवसांनी  घरात  एक  नवीन  भाऊ आला. घरातील  वातावरण  आणखीनच  बदलले.कामात मदत करावी  लागायची.बाबा दिवसभर कामासाठी  बाहेर राहायचे.घरामध्ये काय सुरू  असते हे त्यांना  कळायचे नाही.दिवस  जात होते आणि  जबाबदाऱ्या  वाढत होत्या
 बहीण..भावाचा अभ्यास  घेताघेता  अभ्यासाकडे दुर्लक्ष  होत होते.तरीही  सदा मन लावून  अभ्यास  करायचा
यंदा सदाच दहावीच वर्ष  होते .मन लावून  अभ्यास  सुरू  होता पण अचानक  बांबाची तब्येत बिघडली.सदा बिचारा
अजूनच हादरून गेला.तरीही  छान  मार्क्सने  तो पास झाला होता
कमी वयात  भरपूर  जबाबदाऱ्या  आल्या  होत्या  सदावर
हसणे , बागडणे तर तो पार विसरून  गेला होता.
जबाबदारीच्या ओझ्याने लहानपण केव्हाच  निघून  गेले
होते .कमी वयात  मोठा  झाला होता तो.इच्छा , अपेक्षा  यांना तर आयुष्यात  जागाच उरली  नव्हती.भावाच , बहीणीच शिक्षण  सुरू  होते .बाबांची तब्येत आजकाल
चांगली  नसायची.सदावर एक , एक  जबाबदारी  वाढतच
चालली  होती .सर्वात  लहान  भाऊ शाळेत  जायला लागला  होता.बाबांच आजारपण  चांगलच लांबल होत

घरातील  खर्च  वाढला होता . सदाला नोकरी करणे  जरूरी  होते.इच्छा  अस

One comment

Comments are closed.

error: Content is protected !!