विनोदी कथा
विनोदी कथा

पाणीपुरी

  पाणीपुरी समीर घाई..घाईने घरी आला. फाटकातून राॕकी बघतच होता. आल्याबरोबर त्याचा गोंधळ सुरु झाला. म्हणजे  तो रोजचाच कार्यक्रम असे. चला लवकर फिरायला  जणू तो …

थंडी आणि मी..

थंडी आणि मी.. थंडीची सकाळ होती. नेहमीप्रमाणे भल्या पहाटे जाग आली; पण गरमगरम रजईतून बाहेर पडावं असं मुळीच वाटत नव्हतं. रजई मला सोडायला तयार नव्हती, …

Featured

गणित आणि मी 

मी पाचवीत असताना घडलेला हा किस्सा आजही मला पोट धरून हसवतो.

खरं सांगायचं तर गणिताचा आणि माझा पहिल्यापासूनच छत्तीसचा आकडा होता. ‘गणित’ हा विषय ऐकला की माझ्या डोक्यात कळ उठायची. वरून गणित सोडवायला वही उघडली की सहा, सात, आठच्या पाढ्यांचे आकडे माझ्या वहीत नाचायला लागायचे. तेव्हा मला सतत वाटायचं—

“देवा, हे गणित नाही, काहीतरी जादूचं कोडंच आहे!”

 

एके दिवशी आमच्या वर्गशिक्षिकेने नेहमीप्रमाणे अवघड-अवघड गणिते सोडवायला दिली. मी वही उघडली खरी, पण पहिल्याच उदाहरणात माझं डोकं गरगरायला लागलं. काहीच कळेना. आजूबाजूला नजर टाकली तर सगळी मुलं शांतपणे वहीत काहीतरी खरडत होती. कुणी बाकाखाली वाकून लिहीत होतं, कुणी मान वर न करता आकड्यांशी झुंज देत होतं.

 

खिडकीजवळ बसलेली गीता तर बूट काढून अगदी आरामात बसली होती—म्हणजे तिचं गणि जवळजवळत पूर्ण झालं होतं. हे पाहून माझी घालमेल आणखीनच वाढली. इथे माझा जीव मात्र गळ्यापाशी अडकून बसला होता.

 

माझ्या समोर बसलेली सुषमा पटापट गणिते सोडवत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून मला वाटलं, “हिला तर सगळं येत असणार!”

मी थोडीशी पुढे झुकून तिच्या वहीत डोकावायला सुरुवात केली.

 

ती पेन्सिल फिरवते—मीही.

ती वही उंचावते—मीही.

ती डोकं हलवते—मीही!

 

इतकंच काय, जर तिने शिंकली असती तर मीही शिंकले असते बहुतेक! कारण तिच्या लक्षात यायला नको की मी तिचंच गणित उतरवत आहे. अक्षरशः तिच्या हालचालींची नक्कल करत मी माझी वही भरत होते.

 

शेवटी सगळी गणिते लिहून झाली. मनातल्या मनात मी खुश झाले—

“आज मॅडम नक्की शाबासकी देतील! पहिल्यांदाच माझं गणित वेळेवर झालंय!”

 

थोड्याच वेळात तपासणीसाठी रांग लागली. माझ्या पुढेच सुषमा उभी होती. मॅडमने तिची वही हातात घेतली आणि पाहताक्षणीच तिच्या पाठीवर जोरात धपाटा दिला.

“अरे, हे काय?”

 

मी जागेवरच थिजले.

“इतक्या आत्मविश्वासाने लिहीत होती, मग एवढा राग का?”

 

भीतीने माझ्या हातातलं पेन थरथरत होतं. माझा नंबर आला. मी जणू देवाच्या दारी जावं तशी वही डोळे घट्ट मिटून मॅडमसमोर धरली. मॅडमने वहीवर नजर टाकली आणि मला काही कळायच्या आतच माझा कान धरून पिळायला सुरुवात केली.

 

“अग बाई, ही तर तिचीच मावशी! अगदी तशीच गणितं!”

 

मी घाबरून लगेच म्हणाले,

“नाही नाही, मी तिची मावशी नाही!”

 

माझं बोलणं ऐकून मॅडम खळखळून हसल्या आणि म्हणाल्या,

“अगं मुर्ख मुली! दोघींची उत्तरं सारखीच आहेत… आणि दोन्ही चुकली आहेत!”

 

त्या क्षणी मला सगळं समजलं.

समोरचा पटापट लिहितोय म्हणजे तो बरोबरच करतो असं नसतं.

आणि नक्कल करून काहीच फायदा नसतो—उलट दोघींनाही सारखाच दणका बसतो!

 

त्या दिवसानंतर मी एक गोष्ट कायमची ठरवली—

गणित अवघड असलं तरी चालेल,

उत्तर चुकलं तरी चालेल,

पण करायचं मात्र स्वतःच्या डोक्यानेच.

 

आजही कुणी मला विचारलं,

“तुझं गणित कसं आहे?”

तर मी हसून उत्तर देते—

“गणित ठीक आहे…

पण शेजाऱ्याची वही आजही मी लांबच ठेवते!”

 

आणि म्हणूनच हा किस्सा आजही मला हसवतो.

त्या दिवशी गणित चुकलं खरं…

पण नक्कल न करण्याचा धडा

आणि जीवनाचा हिशोब

मात्र अगदी तंतोतंत कळला.

 

लेखिका.. ‌सौ दर्शना ओमकुमार भुरे हिंगोली

चहा पोहे

चहा पोहे संदीप जवळ जवळ सुरेश काकांच्या घरून पळूनच आला. धापा टाकत स्वयंपाक घरात आईच्या समोर येऊन उभा राहिला. आनंदून जावे की पळून जावे? तो …

varhadi katha – आनलाईन वर्ग 4

बसा रे पोट्टेहो… कालचा अभ्यास करून आले काय? हो गुरूजी…गन्यान दफ्तरातुन वही काढली. परशा..तुयी वही काढ बाबु दाखव आमाशी काया दिवे लावले त..तसाबी तुले लय …

नवऱ्यांची आयडिया- विनोदी कथा

नवऱ्यांची आयडिया- विनोदी कथा ही विनोदी कथा काल्पनिक आहे पण पात्र खरी आहेत.कथेतील चार पात्रांपैकी लेखिका एकाच पात्राला भेटली.तीन पात्रांना ती कधी भेटली नाही.बस् अंदाजाने …

नागपंचमी-varhadi katha

  कोन होय …..कोन पायजे….. दुध…. दुध ….माय कोन आल व ….इतल्या पायटी … इकुन त कुनीच नाई…..घटक्या भर थांबा ..तिकुन येऊन रायली …हत माय …

हासुन फारकत-varhadi katha

आजी… आजी.. नीलू धावत आली.. काय व नीलू… काऊन बोंबलुन रायली.. अव आजी तो सिनेमातला भुवन तुले माईत आहे न त्यान काय केल तुले माईत …

varhadi katha- रकमीची भाकर

varhadi katha- रकमीची भाकर   मी आमासीक गंगीकड जाउन येतो पटकन अन् मंग भाकरी बनवतो. कायले चालली व , नीरा उडांरत रायत काल त्या सखू …

व-हाडी कथा – घोटभर चहा

झोपली काव गंगा? रामभाऊन आवाज दिला… नाही वंआमासिक बसली होती मले त वाटल ढाराढुर झोपली आहेस… बापा..बापा माया नसीबात कुठं आहे झोप? लगन झाल्यापासुन नीरा …

error: Content is protected !!