varhadi katha – आनलाईन वर्ग 4
varhadi katha – आनलाईन वर्ग 4

varhadi katha – आनलाईन वर्ग 4

बसा रे पोट्टेहो… कालचा अभ्यास करून आले काय?
हो गुरूजी…गन्यान दफ्तरातुन वही काढली.
परशा..तुयी वही काढ बाबु दाखव आमाशी काया दिवे लावले त..तसाबी तुले लय कटाया हाये अभ्यासाचा कस होईन या पोराच काय माईत बापा.. आजी म्हनते रातभर परशा अभ्यास करते मुबाईलवर..आजीले काय माईत हे पोरग काय कारभार करते त..
दफ्तराची पुजा करत कारे बाबा परशा.. काढ लवकर वही.
गुरूजी..काल मायीवाली वही वासरान खावून टाकली..
परशा ..अरे खर वाटन अस खोट बोलत जाय रे ..त्या वासरले तुयी वहीच दिसली काय.. अभ्यास कराचा कटाया करत..अन असा बायना बनवत लेका.
नाई गुरूजी माया काई गुन्हा नाई याच्यात.. म्या वही कोनाड्यात ठेवली हुती.. आजीन चुल पेटवाले कागद पायला..तिले वही दिसली.. तिले काय समजते .. माय नाव
तिले वाचता येत नाई .. वहिवर माय नाव हुत.. तिन कागद घेतला अन वही ठुवली खाली .वासरू आल तेवढयात ..त्यान वही तोंडात टाकली.. आजकालचे जनावर काईबी खात्यात.. तुमाले त माईत हाये गुरूजी.

बर पारू तु काल काऊन नाई आली हुती..घरातल्या घरात कटाया करता तुमी पोरी.. तयारी कराच काम नाई.. आन वेनी फनीच काम नाई तरीबी जिवावर आनता.
गुरूजी काल तिच्या घरी लय भांडण झाल.. तिची काकु रागानं माहेरी गेली ..गन्यान बातमी सांगतली.
गन्या चभरेपना केल्याबिगर तुय पोट नाई भरत का रे.. सार्या गावाच्या बातम्या तुले माईत रायत्यात.
सांग व पारू…हो गुरूजी मायी काकू भा़ंडन करून गेली माहेराले..अलग राहासाठी भांडन उकरून काढते ते.. मायी आई सबन काम आटपते तरी बी तिचा कांगावा चालु रायते.

पारू मले तुयाघरच सबन माईत हाये.. तुया आईच सबन गाव नाव काढते.समद्या घराले पिरमान बांधुन ठेवल तुया आईन.. मोठ्याचा मानदान..सबन गोष्टी राखल्या तीन. गरीबीत संसार सुखाचा केला.दोन एकराचे आठ एकर केले.
दीराले पोरासारख संभायल.. चांगल्या नोकरीवर लावल.
चांगली पोरगी पाऊन लगन केल..तीन चांगल बहीनीवानी राहाच त भांडन करते ते..

हो.. गुरूजी आई.. बाबा मनुन रायले काकाले अलग राय मनुन ..काका नाई मनत हाये..काई तरास नाई..समद चांगल हाये..तरी बी तीले नसन राहाच त रावु दे म्हनते माहेराले.. आजी त लय चीडुन हाये तिच्यावर.. अशी अवदसा नाई पाईजे म्हनते घरात.. माया पोराच दुसर लगीन करन देतो म्हनते..शिकेल तेवढी हुकेल हाये म्हनते लहान सुन..लय बडबड करत रायते..
आई..बाबा धीरान घेऊन रायले.. काकुले समजावासाठी तिच्या माहेराले ऊद्या बैठक हाये.काय तोडगा निंगते त माईत नाई..

हे पा पोट्टेहो.. घर तोडाचे काम करू नका..घर जोडा.. लोक जोडा.पिरमान राहा. हाताले हात असला की लय बरकत होते.. सुखा..दुखाले आधार रायते.तोडन लय सोप हाये.जोडन कठीन हाये.नाईच जमल त पिरमान अलग व्हा. अलग रहासाठी संसार नका तोडु बापा.आजकाल अलग राहाची लय फॕशन आली बापा.. त्या सिरेल पावुन लय डोक्से बिघडले लोकायचे..

बाबा.. बाबा..
काय रे पोट्टया… आज कुठ गेली तुयी माय.
किटी पार्टी हाये म्हने.. त्या शैलजाकाकुच्या वावरात..
बापा आता हे कोनत नविनच भुत होय ..किटी पार्टी..
या बायाच काई खर नाई बापा..सिरेलपायी सत्यानास करून रायल्या.
अव बाबा आई सैपाक करून गेली आपला..आपली सबन कायजी असते तिले.
हो.. रे बाबु.. तेच त खरी अन्नपूरना हाये घराची.. ते चांगल.. चुंगल खावु घालते मनुन त आपली मजा हाये..
तिच्या बगर घराले घरपन नाई..
उद्या या..रे..
पोट्टेहो…….

शब्दपर्ण साईटवरील इतर व-हाडी कथा वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा.

ज्योती रामटेके

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!