व-हाडी कथा – घोटभर चहा
व-हाडी कथा – घोटभर चहा

व-हाडी कथा – घोटभर चहा

झोपली काव गंगा? रामभाऊन आवाज दिला…
नाही वंआमासिक बसली होती
मले त वाटल ढाराढुर झोपली आहेस…
बापा..बापा माया नसीबात कुठं आहे झोप? लगन झाल्यापासुन नीरा हाल आहे मायावाले .ऐक दिवस सुखाचा नाही.
सांग आता , तु लयच पराचा कावळा करत..मी न तुले असच विचारल बापा
अव त मले तुमचे टोमने टामने लय ओयखीचे झाले..माय नसीबच फुटक त्याले कोन काय करन…माय बापान तुमच्या गयात दिल माय बांधून
आता माय नसीब

ते तरी बर झाल , देवाले मायी लय कायजी दगडावानी बनवल त्याने मले. त्याले माहित होत न मले कसा नवरा भेटनार आहे त
ऐका दमडीचा मायावाला तुमाले घोर नाही .काय बी दुखो आंगावर काढतो बापा नाही त मंग घेतो झाडपाल्याचा काढा

काय करत व गंगा सखारामन आवाज दिला.जरास आंग टाकल होत बापा. मले त वाटल चांगली ढाराढूर झोपली तू
माया नसिबात कुठं झोप आहे बापा जरास आंग टाकत नाही त झाले टोमने सुरू
सांग आता , मी नं सहजच विचारल बापा तुले
अव त लगन झाल्यापासून मी पाउन रायली ना तुमचे टोमने
मले सबन समजते ना , पन काय करु मायं नसीबच फुटकं
आहे न बापा , तरी बर झाल माय मायावाला सुया , गोयाचा
तरास नाही , काई दुखल तरी बी दवाखान्यात जात नाही
घरीच झाडाझुडपाचा काढा करतो अन पिऊन टाकतो.
देवाले बी मायी कायजी होती .त्याले माहीत होत न बापा मले कसा नवरा भेटनार आहे त.त्यान बी मले दगडासायखं बनवल.
लगन झाल तस निरा या मानसानं मले कामात घातल.
घरच बी करा अन वावरातल बी करा.वरुन बुढीचा बी धाक
बेजा हाल केले मायावाले.मी होती म्हनुशान टिकली ईथ
दुसरी असती न बापा त कईची गेली असती.
माय बापान निरा या मानसाच्या गयात बांधुन दिल मले
गरीब गाईवानी संसार करुन रायली बापा.
” अव त गंगा आमासीक मुकाटयान रायन वं.
तुय लयच झिलप्या झाडत बापा गोट पायली कोनती अन तु लावत काय.मले त चांगल बोलाची बी उजागरी नाई रायली
तुया त मले भेवच वाटते .नीरा भसकन आंगावर येत बापा
माया जीव लयच काची पडला तुले
” बर बापा …आता बसतो गुमान .मी जरासिक हासली , बोलली की तुमाले सुद नाही दिसत.नीरा काम करत
रायली कि तुमाले बर वाटते

अरे देवा , भगवनता..तु लयच अरथाचा अनरथ करता बापा
बर ते समद जाऊ दे.
मायासाठी उलिकसा च्या माडंत काय व ? कवाची तलफ आली मले , पन तुया धाकान मुगाच बसुन आहो तवाचा

” बापा बापा लयच भेता तुमी त मले.लगन झाल्यापासुन पाउनच रायली मी .लगन झाल त्या वकताले मले बोलाची उजागरी नोती .तोडांतुन सबद काढाले नाही जमे
नीरा , भिउ भिउ रहा लागे मले .बुढीन बी कमी तरास नाही दीला ”

” अव त मायमाजे , तुयवाल महाभारत आमास बंद कर
उलीकसा च्या ठेव
बर बापा , ठेवतो न , आमासा धीर धरत जा
” कवाचा धीर ठेउन आहो बापा घोटभर च्या साठी

” अव त कायला धीर ठुता .उठाच अन मांडाच च्या
ऐकानद्या वकताले केला च्या त काय बिघडते
मले बी घोटभर द्याचा.मले बी बर वाटन

अव त गंगा केला असता न , पन तुयासारखी चव थोडी आहे माया हाताले

चढवा मले हरबऱ्याच्या झाडावर.तुमचा त रग , रग ओळखतो मी.बसा बर आता मुकाट्यान च्या आनतो मी
” गंगा काय करुन रायली व ”
” ये..बस आमासी तुया भाउजीसाठी च्या ठुन रायली
” बापा आता ही अवदसा कायला आली , गंगीले हीच बया
लय भडकवते .नीरा तीचे कान फुकत रायते

कस आहे वैनी पीक , पानी?
भाउजी मले पीकाच कायीबी माहित नसते.मी समद घरच काम करतो
मायाच्यान ऐवढ नाही होत बापा .गंगा कसी करते
समद कशी सबांयते , मले त नवलच वाटते
ही बया आता आगलावुन जाते वाटते ”
” अव या च्या प्याले , कवाचे च्या मागुन रायले
” हो बापा आता जेवाच्या वकताले मले च्या भेटला
भेटला ना प्या आता मुकाट्यान

ही विनोदी,वऱ्हाडी कथा आवडल्यास कृपया शब्दपर्णच्या YOU TUBE CHANNEL ला भेट दया

https://youtu.be/pu6w-USrVDo

ज्योती रामटेके

11 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!