शरयु नी मोठ्या ने आवाज दिला…अहो अहो ते तुळसी वृंदावन व्यवस्थित ठेवायला लावा….किती प्रयत्नपूर्वक वाढवली आहे ती इतकी सुंदर डेरे दार .
समर्थ …मी तर न्यायचीच नाही म्हटले ,पण तू ऐकायला च तयार नाही.अरे गेल्या वर लाव न नवीन. नाही तरी सगळं नवीनच मांडायच आहे आता. बर तु बस शांत, मी करवून घेतो सर्व ,तू तुझ मन आवरल तरी मला मदत होईल ..त्या आराम खूर्चीवर जाऊन बस बर प्लीज .
शरयु आत आली रिकाम्या देव्हार्या जवळ येऊन हात जोडले ..,, डोळ्यांच्या कडा ओलावल्या.लखलख करणार देवघर ओस पडल होत.अखंड दिवा असे देवघरात ,कधी दिवा विझू दिला नव्हता तीने, आणि समर्थ ,ते सुद्धा लक्ष द्यायचे.,
“वास्तुदेवता आम्हाला तुमचे भरपूर आशीर्वाद लाभले.या पुढे ही असेच या वास्तुत सतत आनंद नांदु दे…”
तेथून निघून शरयु स्वयंपाक घरात आली. ओटा न्याहळत शरयु ला बारिक हसू फुटले
“ट्राॕली बसवून ओटा करा ,मला नाही आवडत उघडे कपाट”
समर्थांनी हट्ट पूरवीला होता, .सणा वाराचे पदार्थ ,व्रत वैकल्ले ,पूजा पाठा चे प्रसाद, अन्न पूर्णे च्या कृपेने अन्नदान दोन्ही हातानी केले गेले होते, या ओट्या वरुन,जमलेले ,फसलेले पदार्थ,किती तरी प्रयोगां चा साक्षीदार होता हा ओटा .अशीच बरकत राहू दे म्हणत शरयु ने हात जोडले.डायनिंगरूम च्या ग्रीलला डोक टेकवून विचार करत होती शरयु..लग्न होवून या ताल्लूक्या चा ठिकाणी आले एक चटई आणि काही भांडी .समर्थां नी सांगितले कि इथेच हयात काढायची.दोन खोल्यांच्या भाड्या च्या घरात चटई वर पाहिलेल्या स्वप्ना प्रमाणे संसार मांडला ..बहरत गेला .पियूष ,पर्वणी झाले ,आनंदा चा बहर बारोमासी झाला.कर्तव्ये ,प्रेम,काळजी, ह्या मूळे सुख भरभराटीस आले. हक्काची वास्तू झाली .. तेव्हा आई ने दिलेली तुळस (किती तरी बदल होऊन)अजुन हि जपतेंआहे .आई म्हणाली होती
“बेटा घरात तील सौख्य ,सम्रुद्धी अंगणात ल्या तुळशी ने लक्षात येते”
किती बदल झाले घरातल्या बागे मधे ,दारातील कुंड्यांन मधे ,पण तुळस आणि त्याच कमळ पाकळीच वृंदावन तसच जपलं .
पियूष दहावी नंतर पूण्याला गेला.मी तर कोसळलेच, तेव्हा समर्थ ही हळवे झाले होते
“पाखरं उडायला शिकू लागली शरयु आपली,त्यांच्या पंखात भरभक्कम बल येवो ,आपण मात्र मन खंबीर करायाला हवे शरयु”
पाच वर्षांनी पर्वणी पण गेली .तेव्हा समर्थांनी परत एकदा चटई अंथरली होती म्हणाले होते.
.“शरयु ये आज नको बेड ,या चटई वरच नीजू .या चटई वरच संसार सूरु केला होता ,बघ आज सगळ घर ओस पडलं .आपल दोघांना ही चटई पूरेल गं”
किती आठवणी…पियूषच्या लग्नाच्या अंगणातल्या गमतीजमती ,नवरात्रीच्या जेवणावळी दांडिया ,टेरेस वरची कोजागीरी, गार्डन मधली मैत्रीणींची धूम….कसा विसर पडावा…समर्थांच्या रिटायर मेंट नंतर एका दिवाळी ला पियूष बोलला
“आई बाबा आता इथे नाही रहायचं , आमच्या जवळ रहायचं.जसं तुम्ही आम्हाला वाढवलं ,काळजी घेतली तशी आम्ही पण घेऊ ,आता काय राहल आहे इथे .वयोमानानी तब्बेती चा कूरबूरी राहातील,त्या सगळ्या व्यवस्था तिकडे आहेत.”
समर्थ काही ही बोलले न्हवते ..नंतर लगेच रोज नवी नवी लोक येऊन घर पाहून जायला लागली तेव्हा पासूनच शरयु हळवी झाली होती एकाएकी तिचं मन गलबलून यायचं.प्रत्येक भावने खाली ओल असायची… समर्थां ना तिच्या मनस्थितीची जाणीव होती ,एकेदिवशी त्यांनी तिची समजूत काढली
“शरयु अगं आता काय राहील आपल ,हो मायेची माणस आहेत जमवलेली …पण मूले हक्काची आहेत न …आता आपण त्यांच्या सोयींचा विचार करावां नं ..आपण मूलांना एक व्यक्तिमत्व म्हणून वाढवल आहे नं ,आणि आपली मूले शहाणी आहेत चुकीचा कसा विचार करतीलं, इतक्या लांब, पूण्याहून ते खरच आपली काळजी नाही घेऊ शकत… जाऊया ,नवीन ठिकाणी नव्याने जगू,मला माहित आहे तुझा साठी हे नूसत घर नाही विश्व आहे ..पण लाडके निरोप तर घ्यावाच लागेल न या गावाचा,या वास्तू चा या इथल्या माणसांचां .नवीन काही करायच ,तर जुन्याला तिलांजली देणे गरजेच च नं ..तू म्हणशील तेव्हां घेऊन येईल न तुला मी इथे.. मग त झाल नं……
शरयु …..अगं चला आली गाडी,निघायच नं …(समर्थांनी आवाज दिला ..),शरयु भानावर आली, स्वतःला सावरल ,डोळे पुसले , बाहेर आली ,सामानानी भरलेला ट्रक आणि ती कार पाहून परत तिला हुंदका आवरता नाही आला ..निरोप घेण्याची वेळ येऊन पोचली होती .शरयु हूदके आवरत गाडीत जाऊन बसली ..,,सगळ हळू हळू मागे सूटणार होते ,ती माणस ज्यांच्याशी मनाचे नाते जूळले होते ,ते घर जे सुखदुःखा च साक्षीदार होतं ..सगळं सगळं .निरोप घेणे फार कष्टप्रद असतं .
पण जगाचा आणि जगण्याचा नियमच आहे …
“कि माणसा ने जास्त वेळ कुठेही रेंगाळू नये”
…कुठल गाव असो ,घर असो,कुणाच मन असो किंवा जीर्णस्त्र देह असो …,,वेळीच निरोप घेतलेला बरां.
..@$







खूप कठीण असतो निरोप देणं
छान कथा
Thanks mohini
खूपच छान 👌
शाश्वत सत्य
छान …लिखाण …
टायटल प्रमाणेच शाश्वत सत्य।
अप्रतिम
आभार
आपल्या सुखदुःखासोबत समरस झालेल्या वास्तूला सोडणे खूप कठीण असते.
Thanku everyone