स्वयंसिद्धा – भाग ४
संसार सारीपाट
सुप्रियाचे शुभमंगल पार पडताना एक समस्या सोडवली की दुसरी हजर. काय पर्याय काढतील तिच्या सासरचे लोक ?
वाचा पुढे …
माधव सुप्रिया च्या लग्नाचं पुढे कसं ठरवायचं ? हे बोलायला सासरची ज्येष्ठ मंडळी त्यांच्याकडे आली आणि
सासर्यांनी लग्न अजिबात मोडणार नाही याचा दिलासा दिला.
तसे सगळ्यांनाच हायसे वाटले. सुप्रियाला आम्ही आमची सूनच समजतो. त्यांनी खात्री दिली. आजीचे डोळे डबडबले.
पुढे दहा दिवस विरह लांबला.
मग सिंहस्थ होते, तिकडे तर नवरदेव बोहल्यावरच वाट पाहत होता. मग काय सर्वानुमते बासर या तीर्थक्षेत्री विवाह संपन्न झाला . आर्थिक मानसिक शारीरिक सगळाच त्रास. 18 डिसेंबरच्या सकाळी सरस्वती देवीच्या दरबारात त्यांनी एकमेकांना वरमाला घातल्या .
काय योग बघा, साहित्याची आवड आणि वारसा लाभलेल्या सुप्रियाचा विवाह साक्षात सरस्वती देवीच्या सानिध्यात पार पडला.
ना सनईचे सुर ना बँड बाजा. बस पुढची समस्या येण्याआधी उरकायचे पडले होते. समस्यांवर पर्याय काढता काढता सगळ्यांचीच भंबेरी उडाली.
लग्न होईपर्यंत माधवची लातूरच्या शाखेत बदली झाली होती. आणि सासरे नोकरीतून निवृत्त झाले होते. सासरे त्याकाळी डेप्युटी कलेक्टर होते पण पगारा व्यतिरिक्त इतर माया जमवणे किंवा आपल्या हुद्द्याचा जवळच्यांना काही लाभ करून देणे हे त्यांच्या तत्वात बसत नव्हते. गावाकडे थोडी ओलीताची जमीन होती.
सुप्रियाचे नव्याचे दिवस म्हणजे नवलाईचे, आनंदाचे, कोड कौतुकाचे, थोड्या तोऱ्याचे, पहिल्या वहिल्या सणांचे , हिंडायचे मौजेचे, नातलगाच्या ओळखी करण्याचे , घरच्यांच्या स्वभावाशी जुळून घेण्याचे असे आणि साधारण घरोघरी असतात तसेच.
घरात सासू-सासरे दीर -जाऊ आणि हे दोघे. त्यामुळे सुप्रिया माधवला तसा एकांत कमीच मिळत असे. शिवाय सासरे निवृत्त झाले असल्याने त्यांच्याकडे कोणीतरी आलेले असायचे. इमाने इतबारे नोकरी करताना त्यांना इतरांना तेवढा वेळ देता यायचा नाही, ती उणीव राहू नये म्हणून .
सासऱ्यांचा सासूबाई वर फार जीव होता. त्या काळातील लव बर्ड्स म्हटले तरी चालेल . प्रेमापोटी सासरे सासूबाईंना स्वयंपाक घरात खूप मदत करायचे. सुप्रिया माधवला म्हणायची सुद्धा ‘ बघा ! या वयातही किती प्रेम काळजी करतात हा वारसा तुम्ही चालवा ‘ चेष्टेने ती म्हणायची.
सुप्रियाचे माहेर म्हणजे पुजा अर्चा नैवेद्य आरत्या श्लोक पाठ सणवार . तिला हे सगळं अंगवळणी पडलेलं होतं.
इकडे आल्यावर सगळी जबाबदारी तिने स्वखुशीने स्वीकारली तिला त्यात आनंद वाटायचा. देवधर्म तिचा आवडीचा.
दोन-तीन महिने सासू-सासर्यांजवळ राहून माधव प्रियाने त्यांचे बिऱ्हाड लातूरला थाटलं.
माधवची नोकरी धावपळीची होती. कंपनीच्या कामासाठी कधी दुसऱ्या गावीही जावे लागे. मेहनतीच्या मानाने पगार कमीच होता . त्यांचा नवीन संसार असल्याने सासू-सासरे क्वचितच तिकडे येत . शिवाय दीर जाऊ त्यांच्या सोबतीला घरातच होते. घरचे मोठे देव सासरी असल्याने पहिल्या पहिल्या सगळ्या सणवारांना सुप्रियाला त्यांच्याकडे अधून मधून जावे लागायचे.
हळूहळू सुप्रिया घरातले लोक आणि माधवचा स्वभाव समजू लागली आणि त्यात …….
‘ लग्न झाल्यावर दिवस कसे जातात ते कळतच नाही ‘. सुप्रियानी गोड बातमी जरा लवकरच दिली. सगळ्यांना खूप आनंद झाला . सुप्रियाच्या जावेला दोन मुली आहेत त्यानंतर येणार हे पहिलेच बाळ . माधव सुप्रियाला खूप जपू लागला. नुकतेच माधव प्रिया एकमेकांना समजू लागले होते तोच नवीन जबाबदारी आली. सुप्रियाचे सासू-सासर्याकडे जाणे साहजिकच कमी झाले कारण एसटी बसचा प्रवास असायचा .
बातमी सांगितली त्यावेळेस ती सासू-सासर्याजवळ होती त्यामुळे लगेच ते लातूरला पाठवायला तयार नव्हते.
श्रावण महिना आला, सुप्रिया ची पहिली मंगळागौर अर्थातच माहेरी. पण तोपर्यंत नववा महिना लागला होता. मंगळागौर पूजेची दगदग, थोडा उत्साह . ज्याविषयी काळजी होती तेच झाले . सुप्रियाला ऍडमिट करायची वेळ थोडी आधीच आली. गर्भाशयात पाणी कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं . बाळ खूप कोरडे पडलं होतं जगेल की नाही शाश्वती नव्हती. मला कासावीस होताना पाहून आईच्या डोळ्याला धारा लागल्या. नशिबात असेल तर बाळ हातात येईल अशी वेळ होती.
कोणाचा जीव वाचेल ? सुप्रिया की तिचं बाळ?
वाचा पुढील भागात.
https://marathi.shabdaparna.in/स्वयंसिद्धा-
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
……. मोहिनी पाटनुरकर राजे
Interesting story
Khup chhan katha …
Khup chhan katha …
Heart touching 💞