काही गुन्हे अक्षम्य असतात.
अक्षम्य-भाग-१३
मला काहीही करायला आडकाठी न घालता कायम मला समजून घेणारा माझा सखा बनला.
नेहमी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा प्रियकर बनला.
संकटकाळी हात न सोडणारा आधार बनला.
माझ्या मुक्ताचा बाबा बनला.
बाबा गेले तेव्हा मला,आईला दुःखातून बाहेर तूच काढले.
प्रत्येकात काही ना काही कमी असते म्हणतात.पण तुझ्यात शोधूनही कमतरता मला दिसली नाही.
मला पुढे Low करण्यासाठी प्रोत्साहन दिले,मी अधिकाधिक तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली दबत गेले.
आता तूच ठरव आनंद पुढे काय करायचे असे म्हणत तिने आनंदसमोर हात जोडले आणि आत जायला वळली.
आनंदने तिचे हात हातात घेतले
शलाका,वेडी आहेस का तू?
ज्यात तुझी चूक नाहीच आहे त्याची शिक्षा मी तुला देणार?
मी सोडू तुला?
कसा?
माझे जीवन आहेस तू आणि मुक्ता- ती तर श्वास आहे माझा.
तुम्हाला सोडून मी जिवंत तरी राहू शकणार का?
पण आनंद मुक्ता तुझी….
पुरे.यानंतर आपल्या घरात हा विषय बंद.आणि तुझ्या मनातून पण काढून टाक हे सर्व.
आणि मुक्ताचा बाबा मीच आहे हे लक्षात ठेव.
अरे पण…
शलाका तू माझी हीच पारख केली?
तुझी चूक नसतांना मी तुला झिडकारु?
उलट आपल्या हातून नकळत काही चुका झाल्या तर आपण एकमेकांना माफ करायला हवे.
आनंद चुकले मी असे म्हणत शलाका आनंदच्या मिठीत आली.
त्यादिवसानंतर शलाकाला मनावरचे ओझे उतरले.सगळे स्वच्छ झाल्यासारखे वाटू लागले.
आधीपेक्षा ती आता अधिक मोकळी झाली.
आनंदपासून दुरावण्याची भीती संपली.
आणि त्याच्याबद्दलचा अभिमान अजून वाढला.
आनंदसारखा मनुष्य खरेच जगात दुसरा कोणी नसेल याची तिला खात्रीच पटली जणू.
शलाका बऱ्याच दिवसात आईला भेटायला गेली नव्हती.पण आता मनातला आनंद व्यक्त करायला आईच हवी होती.तिच्या मनात असलेल्या जखमेची आई साक्षीदार होती.शलाकाचे दुःख आई म्हणून तिलाही अनुभवावे लागले.
आई
शलाका,खूप दिवसांनी आईची आठवण झाली पोरीला.
अग फोनवर बोलतोच कि रोज.
हो ग बाई.मी गंमत केली.
बोल.
नक्षत्रा काॕलेजमध्ये असेल ना?
हो ग.
आई तुला काहीतरी सांगायला आले मी.
जे फोनवर सांगू शकत नव्हते.
काय ग?
आई,तू नाही म्हणत होती पण मी नंतर अधीर मनाला नाही सांभाळू शकली.आनंदला मी सांगितले सगळे.
काsssय?
हो ग.त्याच्या पासून सगळे लपवून ठेवणे फार वेदनादायी वाटत राहायचे मला.
कायम एक दडपण वाटत राहायचे.
आनंदला माहित झाले तर….ही भीतीही वाटत राहायची.
अग पण त्याला माहीत झालेच नसते.फक्त आपल्या दोघींना माहित होते ते.
हो ग.पण मुक्ताचा प्रश्न होताच ग.
जी त्याची मुलगी नाही तिला त्याने जन्मभर मुलगी समजत राहणे ही फार मोठी फसवणूक होती त्याची.
मग काय म्हणाले आनंदराव?
आई आनंदसारखे कोणी नसणार या जगात.
मी एवढे सांगितले पण माझ्यावरचे आणि मुक्तावरचे त्याचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही.
आई खूप चांगला आहे ग तो.
हो शलाका पुरुष स्त्री ची ही गोष्ट कधीही सहन नाही करु शकणार.
खरच लाखात एक जावई मिळाला मला.
ताई तुम्ही कधी आलात?
नक्षत्राच्या आवाजाने दोघींच्या संवादात खंड पडला.
आताच आले.
खूप दिवसांनी आलात.
हो ना.
बोल.तू कशी आहेस?
बरी आहे ताई.
अभ्यास सुरु आहे ना व्यवस्थित.
हो. पुढील आठवड्यात परीक्षा सुरु होत आहेत.
मागच्यासारखाच निकाल आणला पाहिजे.
हो ताई.प्रयत्न तर सुरु आहे.
आणि कल्याणी,तिच्या घरचे कसे आहेत?
बरे आहेत आता.तिचा भाऊ,वहिनी वेगळे राहतात.तिला सासु सासऱ्यांची जबाबदारी नको होती.
शलाका घरी आली.आनंद आणि मुक्ता लपाछपी खेळत होते.शलाकाही त्यांच्यात सामील झाली.
मुक्ता शाळेतून घरी आली की घर आनंदाने बागडायला लागायचे.
आनंद आणि मुक्ता दोघे घरी असल्यावर तर गोंधळच राहायचा घरात,
बाबांनी आनंदचे नाव योग्यच ठेवले.सगळ्यांना आनंद देत राहतो.शलाकाच्या मनात सध्यातरी फक्त आनंदच असायचा.
शलाकाने आनंदला सांगितल्यापासून ती मोकळी झाली होती आता आनंदबद्दल तिचा आदर वाढला.
शलाकाच्या नजरेत पण जावयाबद्दलचे कौतुक वाढले होते.
आनंदच्या लक्षात यायचे ते.
ते लक्षात आले कि त्याची अस्वस्थता वाढायची.नको वाटायचे सगळे.
सगळे खोटे आहे. असे ओरडून सांगावेसे वाटायचे त्याला.
क्रमशः
सगळे खोटे आहे तर खरे काय असेल….वाचा अक्षम्यचा पुढील भाग
पुढील भागाची लिंक
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.










छान
पुन्हा गूढ वाढले.