५आत्मचरीत्र-न लिहिलेले
५आत्मचरीत्र-न लिहिलेले

५आत्मचरीत्र-न लिहिलेले

५आत्मचरीत्र-न लिहिलेले
त्या वयातील प्रणयरम्य भावना शब्दात वर्णन्यापलिकडे होत्या.
सगळा प्रणयखेळ नजरेतून चालायचा.न बोलता आम्हाला एकमेकांचे मन उमजले.नजरेपेक्षा शब्द कमी महत्त्वाचे झाले होते. गुडघ्यावर बसून सुगंधाला प्रपोज केले नाही पण प्रेम खूप  केले.मनोमन तिनेही मला वरले होते…. शरद-सुगंधाची गोड प्रेमकथा काय वळण घेते……
भाग -५
मॕट्रीक झाल्यावर मामाने त्याला नागपूरला अॕडमिशन घ्यायला सांगितले.त्याशिवाय उपायही नव्हता.
नदीकाठचे आई ,सरु,सवंगडी असलेले सुंदर खेडे मागे सोडून शरद नागपूरला आला, त्याचे खेडे सुटले कायमचे.
 पण त्याच्या ह्दयात ते तसेच वसले होते.
 ती नदी,कौलारु मातीचे घर,शाळा,अन् त्याच्यावर माया करणारी त्याची आई. हे कायमच त्याच्यासोबत होते.मी यायच्या आठ दिवस आधीपासून आईच्या डोळ्यातून आसवे वाहायला लागली होती.पण तिने एकदाही मला जाऊ नको म्हंटले नाही.आसवेही माझ्या चोरुन गाळायची.
 काॕलेजमध्ये अॕडमिशन घेतली.आयुष्यातील रंगीत पर्व सुरु झाले.नवीन मित्र मिळाले.काही मित्रांची हुशारी बघून आपणही मेहनत करु असे निश्चय केले,काही मित्रांची श्रीमंती बघून दिपलो.शिक्षण घेतले की पैसे मिळणार हे समीकरण मनात बांधले.
आईच्या तुटपूंज्या मजूरीत शरदचे  शिक्षण होणे अशक्य होते.
शरदने सुट्टीच्या दिवशी मिळेल ते काम करायला सुरुवात केली.
थोडेफार पैसे मिळायचे.

काॕलेजला दिवाळीची सुट्टी मिळाली.गावी गेलो. आजी आता खूप  थकली होती.सरु नववीत होती.तिलाही मॕट्रीक झाल्यावर नागपूरला यायचे होते.
आठवडाभर गावी थांबलो आणि आजोळी गेलो.सुगंधाला भेटण्यासाठी.सुगंधा मॕट्रीकला होती.
आजीने सांगितले
सुगंधाचे वडील तिच्यासाठी मुले बघत आहेत.ह्दयात कळ उठली.लगेच सुगंधाला भेटलो.
तिचा हात हाती घेतला.तिच्या स्पर्शाने शहारलो.
तिला विचारले
,आजीने सांगितलेले खरे आहे का सुगंधा?
बाबा शोधत तर आहेत.
अग,मग तू सांग ना बाबांना माझ्यावर प्रेम आहे म्हणून.
मी?मी कशी सांगू?शरद तू बोल ना बाबांसोबत.
मी काहीच बोललो नाही.मला नौकरी नव्हती.
मी कसे विचारु त्यांना?
अरे विचारुन तर बघ.मी तुझ्या शिवाय कुणाशी लग्न नाही करु शकत.
मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत सुगंधा.
रोज तुच माझ्या स्वप्नात असतेस.माझा श्वास आहेस तू.बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी आले.
शरद,अरे किती घाबरला.तसे काही होणार नाही.
 मी मामाला सांगतो बाबांसोबत बोलायला.
 बरं.बाबा ऐकतील रे.
 शरदने मामाला त्याचे गुपित सांगितले.मामा सुगंधाच्या बाबांसोबत बोलला.शरदसाठी सुगंधाचे मॕट्रीक होईपर्यंत  थांबू असे सांगितले.पण नंतर नाही.

 खरे म्हणजे त्यांना सुगंधासाठी चांगले स्थळ हवे होते.आमची परिस्थिती त्यांना माहित होती.सुगंधा त्यांची एकुलती  एक लेक. माझ्यासोबत ती सुखात राहील असे त्यांना वाटत नव्हते.
 मी परत आलो.सुगंधाची पत्रे यायची. प्रत्येक पत्रावरुन तिचे माझ्यावरील प्रेम जाणवायचे.तिची ती सगळी पत्रे बरेच दिवस मी सांभाळून ठेवली होती.तिचे प्रेम,ती माझ्यासोबत आहे असे नेहमी वाटत आले.पण सुगंधा- ती नाही आली आयुष्यात.तिची आठवण कायम राहली वेदना बनून.
 माझे बी.ए.चे पहिले वर्ष संपले.सुगधाचे मॕट्रीक झाले.
 सुगंधाचे पत्र आले.
 प्रिय शरद,मॕट्रीकची परीक्षा झाली.बाबांसोबत बोल एकदा.
 लग्न करुन मीही येते नागपूरला.आपले दोघांचे घर….कल्पनेनेही तनमन शहारते.रोमांच येतात देहावर.किती रम्य दिवस असतील ते.तुझा-माझा खरा संसार. भातुकलीसाठी मी किती मागे लागायची तुझ्या .मला खोट्या खेळात सुद्धा तुच माझा नवरा हवा असे वाटायचे.
 मला माहीत आहे शरद भातुकलीत अनिच्छेने माझा नवरा बनायचास.आता मात्र तुला जोडीदारीण म्हणून मीच हवी आहे.
 ये शरद लवकर
 कायम तुझीच असणारी सुगंधा.
सुगंधाच्या आठवणीत शरदरावांचा डोळा कधी लागला त्यांनाही कळले नाही.
क्रमशः
शरदच्या आयुष्यात फक्त सुगंधाच्या आठवणी आहेत कि सुगंधाही आहे…..पुढील भाग
(प्रिय वाचक,तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर तुम्हीही लेख,कथा,कथामालिका ,रसग्रहण….marathi.shabdaparna.in वर पाठवू शकता)

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!