स्वयंसिद्धा भाग १४
स्वयंसिद्धा भाग १४

स्वयंसिद्धा भाग १४

सगळं काही सुरळीत असताना नवरात्रातील घटना मनावर घेऊन सुप्रियाचे सासरे देवाघरी गेले. मानसिक आर्थिक पाठबळ कमी झालं.

स्वयंसिद्धा भाग १४
खडतर प्रवास

दरम्यानच्या काळात जी नवरात्रातील घटना डोक्यात ठेवून पंधरा दिवसात सुप्रियाचे सासरे अनंतात विलीन झाले. घरानी मानसिक आणि आर्थिक मुख्य आधार गमावला.

औरंगाबादहून आल्यानंतर नांदेडमध्ये चार-पाच वर्षे स्थिर गेले. सासऱ्यांच्या जाण्याने घडी पुन्हा विस्कळीत झाली. पण त्यांच्यावर तरी किती दिवस विसंबून राहायचे ? तिला पर्यायी विचार करणे आवश्यक होते . सासरे वयाने थकले होते. ही वेळ कधी ना कधीतरी येणारच होती. हे नक्कीच होते.

पंधरा दिवस पै-पाहुणे नातलग मित्रमंडळी माहेरची सासरचे सगळे भेटून गेले. तेरावा चौदावा आटोपलं सगळं. आता पुन्हा तिला हे मन ,हे घर खायला उठलं… उद्याचा प्रश्न आ वासून उभा

राहिला.

सासरे गेल्यानंतर हळूहळू नणंद , जाऊ -दिर यांच्यात घर, शेतीसंबंधी वाटणीची धुसफूस सुरू झाली. सुप्रिया कडून बोलणारं कोणीच नव्हतं , नव्हे खुद्द सुप्रियाच होती . माधवशी चर्चा करून काहीच उपयोगाचे नव्हतं . सगळं चाललेलं त्याच्या शक्तीच्या पलीकडचं होतं.

सुप्रिया एका चुलत भावाच्या मित्राच्या प्रा.कोत्तावार सर यांच्या ओळखीने नांदेड मधील एका नामांकित कोचिंग क्लासेस मध्ये नोकरीला लागली. तिथेच तिला माणुसकी असणारी माणसे भेटली. आणि भार्गव देशमुख नावाची ईश्वरी शक्ती तिच्या पाठीशी उभी राहिली, जणू देवदूत बनून तिच्या पाठीशी उभा राहिला होता. अगदी परमेश्वर रूपाने तो आला होता. ज्याच्या सावलीमुळे ती आजही कधी कोमेजली नाही की सुकली नाही, मानवी मनाचा स्वच्छ आरसा तिने इथे पहिला होता. तिच्या पदवी प्रमाणे तिला सुरुवातीस बऱ्यापैकी म्हणजे किमान घरखर्च भागेल इतपत पगाराची नोकरी इथे मिळाली होती. आपण स्वाभिमानाने जगण्याची सुरुवात करत आहोत याचा एक वेगळाच आनंद तिच्या चेहऱ्यावर मनोमन दिसे. त्यात जबाबदऱ्यांचं ओझं असलं तरी ती आता समर्थ पणे पेलण्यास सज्ज झाली होती. सकाळी 8 वाजता नोकरी वर रुजू व्हावं लागे.

त्यात सासुबाईंना मधुमेह होता, त्यांना सकाळची औषध देण्याची सोय तीने केली. चाळीस वर्षापासून त्यांचा एक डोळा निकामी झाला होता . शुगर चेक न करता डोळ्याचं ऑपरेशन करण्याचा परिणाम. त्यावेळेस त्यांना मधुमेह होता हे कळलच नाही . माधवच्या आजारपणापासून खचलेल्या सासूबाई सासरे जाण्याने जास्तच खचल्या. दोन वर्ष ठीक होत्या. नंतर त्यांनीही अंथरूण धरलं.

सुप्रिया सासऱ्यांच्या वचनात बांधली होती. जातांना सासऱ्यांनी ” माधव आणि सासुबाईची नीट काळजी घेईल ‘

असा शब्द तिच्याकडून घेतला. म्हणूनही नवऱ्यासोबत सासूबाईंची जबाबदारी महत्वाची होती. आता सुरू झाली होती सुप्रियाची पुन्हा एकदा नोकरी आणि घराची खरी कसरत आणि परीक्षा….!

ओझं दिसते कारण ते लादलेले असते, जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते.

सासुबाई आता अंथरुणातुन बिलकुल उठु शकत नव्हत्या.

सकाळी लवकर उठून त्यांचं सगळं करून, अर्धा स्वयंपाक, जातांना सासूबाईंच डायपर बदलणे हे सगळं आटपून सुप्रिया आठ वाजता नोकरीच्या ठिकाणी पोहचे. नंतर माधव देवपूजा करून, भाजी निवडून चिरून ठेवे . क्वचितवेळी कुकर पण गॅसवर चढवत असे.

सुप्रियाला कधी कधी वाईट वाटे की माधवला किचनमधे कामे करावी लागतात म्हणून आणि कधी कधी माधवला अभिमान वाटे की बायको कामासाठी बाहेर जाते तर आपली निदान तिला स्वयंपाकात मदत होते म्हणून.

मधल्या वेळात गरज वाटली तर आजीचं मुली करत. आता त्या आजी आणि बाबांकडे लक्ष देणे, त्यांची छोटी छोटी कामे करण्या इतपत मोठ्या झाल्या होत्या. सकाळचे सगळे कामं झाले की माधव दुकानात बसे, सूप्रियाची वाट बघत, वडिलांनी दिलेले धडे

गिरवत.

अशी एकंदरीत सूप्रियाच्या कुटुंबाची दिनचर्या होती.

असा खडतर प्रवास तिचा न संपणारा होता,

आता सासूबाई ची प्रकृती जास्त खालावत चालली होती, तशी तिची काळजी आणखी वाढली हाती. वरचेवर त्यांना हॉस्पिटल ला घेऊन जाणे, आणणे, औषधोपचार करणे, काळजी घेणे या शिवाय तिच्या हातात काहीच नव्हते.

सासूबाई मनोरुग्ण होत चालल्या होत्या, 83 वर्षाचे वय झाले होते. शारीरिक, मानसिक आजाराने त्रस्त होत्या, तशी सुप्रिया ची चिंता अधिक वाढत होती.

आता नोकरीला गेली तरी तिला घरची काळजी लागून राहत असे, घरी गेली की परत सासूबाईचा बेड change करणे, कपडे बदलणे, त्यांना खाऊ घालणे, गोळ्या देणे,हा नित्य नियम झाला होता. जीव आहे तोवर सेवा करणे, या व्यतिरिक्त तिच्या हातात काहीच राहिले नव्हते, माधवला हे सगळं करणे सुचत नव्हतं. त्याचं स्वतः च तो करतो हीच खूप मदत होती. डॉक्टर घरी येऊन सलाईन चढवे आणि बाकी परमेश्वरावर सोपवा, असा दिलासा देत असे, तसे तिला कापरे भरे.

सासूबाईची पेन्शन आणि सुप्रियचा अल्प पगार यातून साऱ्या गोष्टी बऱ्यापैकी सुरू होत्या, पण पुन्हा उद्याची भ्रांत होतीच….!

क्रमशः

काय होईल पुढे ? घर शेतीच्या वाटण्या ? सासूबाईंचा सहवास किती असेल ?

वाचा पुढील भागात .

……. मोहिनी पाटनुरकर राजे

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com

 

शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

 

 

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!