७-स्वप्न तहानलेले-सखी मंद झाल्या तारका
७-स्वप्न तहानलेले-सखी मंद झाल्या तारका

७-स्वप्न तहानलेले-सखी मंद झाल्या तारका

स्वप्न तहानलेले
भाग-७

सखी मंद झाल्या तारका,

 

रात्रीचे जेवण झाल्यावर बराच वेळ दादा, वहिनी सोबत गप्पा सुरू होत्या.दादा शेतीचा विषय काढेल असे आंनदीला वाटत होते पण तसे काही झाले नाही.

मध्ये निरजा काॕफी घेऊन आली.

वहिनी तुम्ही कधी जाणार माहेरी.मुलांना सुट्टी आहे म्हणून विचारले.

आंनदी विचारत होती. निरजाचे डोळे पाणावले.अंधारात तिचे ते अश्रूने डबडबलेले डोळे बघून आंनदीला धस्स झाले. या विषयावर बोलू उद्या असा विचार करून ती शांत राहिली.दादाकडून तर आडकाठी नसेल वहिनीला.

तेवढ्यात धवलचा फोन आला.मुले झोपली होती.बाहेर सुंदर शितल चांदणे दिसत होते.आंनदी पुन्हा झोपाळ्यावर बसली.

उद्या दीपाकडे जायचे आहे.तीची जिवाभावाची मैत्रीण. लहानपणापासून दोघी एकत्र वाढल्या.वाड्याजवळ घर असल्याने तिच्याकडे रोज जाणे ठरलेले असायचे.तिला घेऊन खेळायला वाड्यात घेऊन जायचे आणि कनक सोबत खेळायचे हा दिनक्रम ठरलेला होता.

आईचा स्वयंपाक होईपर्यंत खेळत राहायचे ते तिघे.आक्काची मुलगी आराधना कनक पेक्षा सहा महिन्यांनी लहान.स्वभावाने लाघवी होती. पण आक्काच्या समोर दीपा,आंनदी सोबत जास्त जवळीक साधण्याची तिला मनाई होती.

आराधना आपण नेहमी आपल्या बरोबरीच्या लोकासोबत वावरायचे कळले का?
पण आई कनक तर दिवसभर आंनदी सोबत असतो. मला कनक सोबत खेळायला आवडते.

आराधना चिडायची.
तुला माहीत आहे नं त्याला आई नाही म्हणून. मी त्याला आईसारखे जपले आहे. मी त्याची आत्या आहे. माझ्या शब्दापलीकडे नाही तो.लहान आहे अजून. नंतर हे सारे बंद करेल . आयुष्यभर त्याच्या सोबतच खेळायचे आहे तुला.

अग पण तेव्हा तर आम्ही मोठे होऊ नं मग कसे खेळणार
आराधना बालिशपणे विचारायची.

आक्का तेव्हा वेगळीच हसायची.

दिवस उजाडाला. जेवण होईपर्यंत दुपार झालीच.
दीपा वाट बघत असेल. आंनदी उठली.आधी दररोज दिपाच्या घरी जाणारी आनंदी आज कितीतरी वर्षांनी दिपाच्या घरी जात होती,

आज तिला कनक कुठे आहे हे कळणार होते.तिच्या घराच्या रस्त्यावर वाडा होता. त्या रस्त्यावर आयुष्यात कधी पावले वळवायची नाहीत हे तिने ठरवले होते.

नियतीने कनकला वाड्यापासून दुर केले.त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. या सर्व गोष्टींमध्ये मी कुठेतरी जबाबदार आहे. मी धवलसोबत सुखी आहे पण कनक आजही त्या दुःखाला कवटाळून आहे.

कुठे असेल तो? त्याला शोधून त्याची नवीन आयुष्याची सुरुवात करायला हवी.लहानपणी माझ्या प्रत्येक इच्छेत खूष असणारा कनक आता माझे ऐकेल का?

असे कितीतरी प्रश्न घेऊन आंनदी पावले पुढे टाकत होती. दुरुनच वाडा दिसला.भकास आणि उदास दिसत होता.

आंनदीचे पावले क्षणभर थबकले. वाडा सामसूम दिसत होता.वाड्यात स्वयंपाक करणारी मावशी आणि आराधना राहते असे कळले होते.वाड्याचे वैभव कनक सोबत निघून गेले होते.

आक्काच्या नजरेला कनकचे सुख कधी उमजलेच नाही. वैभवाच्या पोकळ आणि व्यर्थ गोष्टीत कोमेजून गेले ते.मी माझ्या मनास सावरले. धवलच्या प्रेमाने लवकरच जिंकून घेतले मला. कनकला असे कुणी मिळाले असेल का? त्याच्या आयुष्यात सुगंधाने भरलेली नवी पहाट कधी उगवणार?

दीपाचे घर आले. काळानुसार बदल दिसत होता. दीपा धावतच आली.आंनदीला बघताच डोळे भरून आले तिचे.आनंदीला घट्ट मिठी मारली तिने.

आंनदी सुंदर दिसत आहे ग. तुझ्या चेहऱ्यावर दिसणारे तेज खूप काही सांगत आहे.

तुझे सुख तुझ्याकडे बघितल्यावर दिसत आहे.का,ग इतकी निष्ठूर बनली? माहेर सोडून दिले.

फोन नंबर नाही दिला. दादाला मागण्याचा प्रयत्न केला पण त्याने देण्याचे टाळले. दीपा तू इथे काय करते. मुले किती आहेत? दीपा रडायला लागली.

लग्नानंतर दोन वर्षांतच आमचा घटस्फोट झाला. सुखी संसाराची कल्पना धुळीस मिळाली. तो लग्नानंतर काही दिवसांनी प्रेमात पडला. मला लवकर कळले ते.

जाब विचारला तर म्हणतो कसा.. मला आवडते ती. कसे शक्य आहे हे? मी काय निर्जीव वस्तू आहे का? विकत घेतली आणि घरात ठेवली.

काही दिवसात आमचा घटस्फोट झाला. आता तो पुन्हा तिसऱ्यांदा प्रेमात पडला असे कुणीतरी सांगत होते. दीपा जोरात हसली. तिच्या चेहऱ्यावरील वेदना आंनदीला स्पष्ट दिसत होत्या.

आंनदी,संध्याकाळ होत आहे.गार वारा सुटला. चल, आपण नदीवर फिरायला जाऊ. आजकाल मी नदीवर जाण्याचे टाळते. बाया उगाच कुजबुजतात.करतात. पुर्वीसारखी गर्दी नसते नदीवर.
चल, जुन्या आठवणी ताज्या करु.

दोघी नदीवर पोहचल्या. जागोजागी आंनदीला कनक दिसत होता.

आनंदी आपण नदीवर यायचो तेव्हा कनक एक गाणे गायचा ग.
हो दीपा

सखी मंद झाल्या तारका,
आता तरी येशील का ?

आनंदी तू विसरली का ग कनकला?

क्रमशः

ज्योती रामटेके

कथामालिका कशी वाटत आहे?
Comment मधून अवश्य कळवा.

Next Part

https://marathi.shabdaparna.in/८-स्वप्न-तहानलेले

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!