भाग-1-हरवलेल्या मित्राची गोष्ट(सत्यकथा)
भाग-1-हरवलेल्या मित्राची गोष्ट(सत्यकथा)

भाग-1-हरवलेल्या मित्राची गोष्ट(सत्यकथा)

भाग-1-हरवलेल्या मित्राची गोष्ट(सत्यकथा)

 

दुपारची वेळ….उन्हाळ्याचे दिवस…ऊन मी म्हणत होते,अंगाची लाही लाही…घामाच्या धारा न संपणाऱ्या….एवढ्यात मोबाईल चा गजर…. unknown number वरून call… सर्वांच्या झोपेचे खोबरे झाले….मी फोन उचलून ओपचारिक ता दर्शवली,”हॅलो,कोण बोलता?”
समोरून आवाज आला,
“हॅलो, देशपांडे का नंबर है ना ये। मैं आपके husband का friend बात कर रहा हूँ। हम लोग बालमित्र थे। मैं 1 घंटे मे आपके घर पहुच राहा हूँ। ok, bye”
एका दमात त्याने सारा msg देऊन फोन बंद पण केला….
हं…नाव मात्र सांगितले होते जयू.
पण मी तर हे नाव पण कधी ऐकले नव्हते 20 वर्षात….मी प्रचंड अस्वस्थ झाले…खूप आठवण्याचा प्रयत्न करत होते,पण छे.
मग मात्र सासूबाईंनी या जयू ची पुसटशी कल्पना मला दिली,आणि जीव भांड्यात पडला…नाही तर हल्ली असे चुकीचे call खूपदा येतात ना,म्हणून मी काळजीत होते….
घरातली आवरा आवर केली एवढ्यात हा जयू घरात अवतरला….घरात पाऊल टाकताच श्री ना त्याने जी मिठी मारली…..ही गळाभेट मी कृष्णसुदामच्या रूपात अनुभवली जणू.
किती मित्र प्रेम !
श्री चा हा ४५ वर्षांपूर्वी हरवलेला मित्र …याची एक विलक्षण कहाणी….त्याने सांगितली ती मी शब्दातीत केली आहे….इतकेच….!!
४५ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला हा
जयू उर्फ जयंता.
आज अचानक परत आला होता. आई तर अक्षरशः वेडी होऊन त्याला गोंजारत बसली होती…पोटचा गोळा तो…नऊ महीने त्रासदायक यातना सहन करून वाढवला होता….त्याला पाहताच तिला जणू आकाश ठेंगणे झाले होते….तो घरातून गेल्यापासून साऱ्यांची अवस्था वाईट झाली होती….बरेच दिवस गेल्यानंतर पोरं आता काही परत यायचे नाही म्हणून सार्यांनी आशाच सोडून दिली होती….दहावी ला नापास झाल्याचं निमित्त ….पण पोरानं एवढा मनावर घेतलं की आई बाबा रागावले म्हणून जे घर सोडले,ते महाशय आता अवतरले होते…मधल्या काळात नशिबाचे खेळ ,आणि त्याचा प्रवास तर असा झाला की कल्पनेच्या बाहेर सारे काही….
या भेटीत त्याने जे सांगितले…ते अंगावर शहारा आणणारे.
जयंता ,…सारे त्याला जयूच म्हणायचे.
जयू, आमचे हे,शेळकेचा जगू, यांची जोडी प्रसिद्ध…नामांकित घरातील उनाड पोरं होती ही..असा शिक्का होता यांना… सर लोकही बोलताण दबकायचे….वयाचा अन् संधीचा फायदा घेतला अन् पोरांचे नुकसान झाले,असं सारे म्हणायचे.दहावीचा result हातात पडला अन् जयुला पक्के ठाऊक होते…घरी गेलेत म्हणजे आता आपली खैर नाही…तोवर चिरंजीवांनी लावलेले दिवे घरी पेटलेच होते…वार्ता घरी पोहोचली ,आणि जे व्हायचे तेच झाले होते….घरी जाताच बाबा कडाडले,….आई नाराज नव्हे पुरती खचली होती…त्या दिवशी बाबाचा राग मनात धरून कुठलाही विचार न करता जयू ने घर सोडले,ते कायमचेच.
पुढे त्याच्या आयुष्यात जे घडले ते मात्र अगदीच फिल्मी…कल्पनेच्या पलीकडचे.नशीब इतकं बदलू शकतं…. आणि जे घडलं ते इतकं विलक्षण.मी मात्र त्याला पाहून आणि एकूण निःशब्दच .

क्रमशः….

https://marathi.shabdaparna.in/भाग-2-हरवलेल्या

प्रिया देशपांडे

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!