२- सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-
Written by- ज्योती रामटेके
सुमन काकु अधुनमधून येत राहायच्या. आल्यावर चंदनाचे खूप कौतुक करायच्या. जेवण केल्याशिवाय जायच्या नाही. अपर्णाला नाही आवडायचे ते.
चंदना तिला रागवायची, समजवून सांगायची.
अपर्णा भुकेल्या माणसाला जेवू घालणे पुण्याचे काम आहे.
अपर्णा -अग पण ताई.. कधीतरी त्यांनीही आपल्याला जेवायला बोलवायचे नं. आणि वरुन म्हणतात कशा मला बाई तुमच्यासारखा स्वयंपाक येत नाही.
चंदना- अपर्णा..गप बस
आई-नसेल त्यांना सवय स्वयंपाक करायची. लहानपण वसतिगृहात गेले, त्यामुळे नसेल जमत.
अपर्णा ..तु जरा शांत राहत जा बरे.. चंदना कडून शिक काही.
दोन दिवसांनी सुमन काकु आल्या.आपल्या मुलांचे कौतुक सांगू लागल्या. त्यांच्या दोन मुलांची लग्ने झाली होती. आता तिसरा मुलगा पियूषचे लग्न करायचे होते. बोलता.. बोलता
त्यांनी चंदनाच्या लग्नाचा विषय काढला.पियूषचे गुण सांगू लागल्या.
सुमन काकु-बघा मग पियुषचा विचार करून. तुमची चंदना अगदी सुखात राहिलं आमच्याकडे. तिचे शिक्षण सुरु राहील.
पियुष काय करतो सध्या? आईने विचारले.
सुमनकाकु-अहो..विमलताई त्याला काही कमी नाही. घरी भरपूर शेतीवाडी आहे. वडील अधिकारी आहेत.. माझी पण थोडीफार कमाई सुरू असते. मोठे भाऊ चांगल्या पदावर आहेत. पियूषलाही नोकरी लागणार आहेच. मेहनती आहे तो. नौकरी नाहीच लागली तर बिझनेस टाकून देऊ त्याला.
निर्व्यसनी आहे तो.बघा विचार करा.
त्या घरी निघून गेल्या.रात्री बाबा आले आईने विषय काढला. लोकं तर चांगली आहेत. शिकलेली.. सुशिक्षित आहेत.
बाबा-मी जास्त नाही ओळखत पण माझा मित्र राहत होता तिकडे. सध्या तो मुंबईत असतो. विमल तू
ओळखते नं सुमनताईला.
आई-हो.. मी ओळखते त्यांना,साधा सरळ स्वभाव आहे त्यांचा.
साधा.. सरळ.. अपर्णा हसायला लागली..आई तुला स्वभाव नाही ओळखता येत. किती हुशार आहेत त्या.
बाबा-अपर्णा.. तुला काय कळते ग? शांत रहा. आई चांगली ओळखते त्यांना. बरे, मुलगा काय करतो?
विमलताई-सध्या तरी काही नाही पण लवकरच नौकरी लागणार आहे.
शिक्षण चांगले आहे. घरी शेतीवाडी आहे. घरी काही कमी नाही. मुलगा निर्व्यसनी आहे. नौकरीचे नक्की असेल तर विचार करायला हरकत नाही बाबांनी आपले मत व्यक्त केले. नौकरी करणारे मुले सांगून येत आहेत चंदनाला.
काल निरोप आला एका मुलाचा. सरकारी नौकरी आहे,पण राजस्थान मध्ये आहे तो. बघू काय होते तर, शेवटी काय नशिबाचा खेळ.
उद्या करतो मी चौकशी.
दिवस निघाला. बाबांनी मित्राला फोन केला. चौकशी केली.
मित्र-अरे चांगले कुटुंब आहे ते. तसा माझा जास्त संबंध नाही आला मुलाशी पण त्याच्या भावांना चांगला ओळखतो मी.
आता बरीच वर्षे झाली ते शहर सोडून. तू मुलाची चौकशी कर..आजकाल शेजारी पण काही सांगत नाहीत. आता आधी सारखे जिव्हाळ्याचे नाते नसतात. येणे.. जाणे कमी असते. कधी.. कधी लोक खोटे पण सांगतात.
चल बघतो मी.. बाबांनी फोन ठेवला.
काय म्हणतोय तुमचा मित्र.. आईने विचारले.
बाबा- त्याला फारशी माहिती नाही. तो मुंबईत राहायला गेला आहे. त्यांच्या मोठ्या मुलांना ओळखते तो. ते मुले आता चांगल्या हुद्द्यावर आहेत. बरेच दिवसापासून त्यांचा संपर्क नाही.
चांगले सुशिक्षित घर आहे ते. तीस वर्षांपूर्वी या शहरात राहायला आलो मी. घरची जबाबदारी होतीच. इकडे.. तिकडे भटकायला वेळच नाही मिळाला. नोकरी आणि घर
काही दिवसांनी लग्न झाले. जबाबदाऱ्या वाढल्या. मुले झाल्यावर तर बांधूनच गेलो . तसेही मला विनाकारण भटकायला नाही आवडत. मित्र तर हसतात मला.जोरु का गुलाम म्हणतात मला. या स्वभावामुळे ओळख कमीच आहे माझी.पण विमल आता मुलींसाठी स्थळ शोधतांना ओळख्या असायला हव्या असे वाटते,
आई-होईल हो सर्व ठीक.तुम्ही काळजी करु नका आणि घाईही नको.
बाबा-हो ग.
क्रमशः
https://marathi.shabdaparna.in/३-सुन्या-सुन्या-मैफिलीत
https://marathi.shabdaparna.








खूप छान कथा
छान कौटुंबीक कथा, साधी सरळ भाषा.
उत्तम
सुंदर कथा
Wah सुंदरच