आव धनी..मी आमासीक सेल मधी चालली.
बापा…जेल मधी कायले चालली व.
काय करू बाई ..या मानसाले नीरा कमी आयकू येते
दिसभर मले मोठ्यान बोबंला लागते.
अव मी जेल मधी कायला जाऊ..सेल मधी म्हनुन
रायली मी..
मले जेल आयकु आल न बापा.
मी कायले जाऊ जेलमधी.. मीन काय गुना केला.
कोणाले मारल का भांडन केल.
अव मायाशी किती वेळा भांडत बीचारे तु
हो..मी काय पागल झाली का.तुमी धडाच एक बोलन काणावर घेत नाई..येल मनल की बेल लावता.
नवतरनी होती तवा त बापा हु सहन नोते करत
नीरा मायचा पदर हातात राहे…बस मनल की बस
उठ मनल की ऊठ.
एका गोष्टीची उजागरी नोती मले.बुढी नीरा डाफरत राये.
अजुन बी तसीच आहे.
जाउ दे व आता मतारी झाली .उलीसा भाकर तुकडा खाते अण रायते पडुन.अव त पाच वरीस झाले खाटल्यावर आहे.
मले दोन दीस माहेराला जाले भेटत नाई.मांगल्या वरसाले
दिवाईले माया भाऊ साजरा घ्याले आला होता त बुढीच
कोन करन मनुन मले पाठवल नाई.मले बी दोन घास गरम
खाले भेटत हुते.मायची मया…न्हावु घालन..केसाले तेल लावुन देन..हे समद मायच करू शकते.माया आवडीची दोध घास माय खाउ घालते. नवाईच बांधुन देते.लय बर वाटते माहेराले.जुन्या मैत्रिणी भेटतात..सुखा..दुखाच्या चार गोष्टी होत्यात.
मले बी दोन दिसाच माहेर पाईजे ना..या घरासाठी राब..राब
राबुन काय भेटल मले.दीस निंगला का तेच जीवाची वनवन
अव तु गेली की मले गमत नाई..सार घर खाले ऊठते
दोन दीस बुढीच मी बी करतो.मी त बुढीचा बायना करतो.
खरी गोट सांगु काय तुले …तु नसली का माया जीव घरात
लागत नाई.मंग काय …पारावर बस त टपरीवर जाय..दिसभर खर्रा खाय.. अन रातच्याले जराशी …पीऊन
बी येतो.
अव तुमचे नाटक मले सांगू नका ..तीस वर्ष झाली लग्नाले.हे सबन नाटक मी असल्यावर बी करता..तुमाले
आयत ताट पायजे म्होर..
मी बरी सापडली..फुकटाची मोलकरीन.
दीस..रात राबा…माया कष्टाची घरात कोणाले किंमत नाही.अजुन तु दिसभर काय करत मनुन मलेच ईचारतात.
अव माउले..बस कर आता
जाय बर सेल मधी
तटीसा पाच सहा घंटे तुले आराम भेटन
अव आता काय फायदा.. लय वेळ झाला.आता उद्या सकाईच जातो.
अव सकु…तुया सारा टाईम मले भाषण सुनावल.किती टाईम गेला तुयावाला.
माई सारी जिंदगानी भाषन सुनावण्यात गेली माय
पण फायदा काडीचा नाई झाला.येरे माया मागल्या अस काम हाये तुमच.
बापा आता कुठं चालले ?
येतो जरासा पारावर बसतो…खर्रा भेटते काय त पायतो.
अरे माया कर्मा…
काय फायदा झाला भाषनाचा
पालथ्या घड्यावर पाणी…
अरे देवा..देवा.










मस्तच ग
सकुचं भासन …लईच बेस्ट ..झाकली मुठ सव्वा लाखाची मायमाझे …
वर्हाडी तडका खूपच छान वाटला. खूप दिवसांनी वर्हाडी वाचायला मिळाली.
वर्हाडी लई भारी