अं……बयना….अ कामने..
अव थाम थाम , थाम वं जराशी.
थाम तं खरी जराशी ! काय निर अकातल्यावानी झुइ झप चालु रायली वं .
अं कामिने .अवं आयकु येत नाई काय वं तुले ?
आमाशीक संग संग चाल नं बयना.
.कावुन अशी करतं .
मी पायली तं हेकळी तेकळी .
तुले का हायं . सबन धंधा पळेल हाय घरी .
..पायटी पायटी बजार केला का मोकयं ..मंग दिस आपलाचं. सकावुनचं सबन नीरंपीरं केलं असतं !अन नींघली असती मायं बयना .पन काय काय करावं ? यक होते अन यक सुटते . रांधाव तं भांडे कुंडे उटाचे रायतेत . च्या पानी उरके लोग कवा दिस वदरं येते समजतचं नाई .मानसाचं बरं ,नुसतीचं ऑर्डर सोळा .
अव तुयं सबन बरबर हाय, पन मले नाई ना झुइ झप चालता येतं .ह्या चिकनगुनियानं माले हाल हाल करुन टाकले . तुले तं मालुमचं हाय . सदाई तुया पुळेच रायत जावो .याद भुल्ली का काव ?पन या बीमारीपाई हारली बाई .
असं जानोते का किलोकिलोचे गोटे पायाले देले बांधुन .सारं आंग भारी बद पडते.मेडीकलची गोई घेतली का बरं वाटते .नाई तं ईयभर हेकोड वाकोड चालत चालत घरातले काम उरका लागतेतं..राबा लागते.
कोनाले सांगावं . नाई असं कोनी आपल . बर कुनाले सांगाव तं ,बयना आपलं कोन आईकते ?
हक्काचा धनी हाय म्हनाले ,पन त्याईले बी फीकीर नाई आपली.असली तं इच्यारतीन ना .
.आजचीच गोठ घेनं
म्हनते कसे….
आव सुरसुते ..हे पाय हं ! जरा बीगी बीगी बजारातं जाय .
अन मंग सांजच्याले मस्त तिखट तिखट चुनोड्याची भाजी , अन नरमलचकं पोया कर .लय दिवस झालेतं खावुन . चुनोड्याची भाजी बेज्या साजरी करतं तु.
म्या त्याईले बया बयाचं म्हनल . हो करतो जी.
त्यायले नाई समजत आपल दुख ,नाई आपली फीकीर करतं.
धनी रातच्याले सट्ट जेवले अन झपी गेले . मी बसली सबन आवरा सावर करतं ! बिछान्यावर दिसली नाई म्हनुन धन्यानं देलाचं अवाज .
ओ सरसुते.
निंजली कायं ? जराशेक पाय दाब बर. लय दुखुन रायले , म्या मनात म्हनल, धन्याले तोंडावर म्हनाची आपली काय टाप ? मोठा दरारा हाय बापा धन्याचा .
चिकनगुनिया मले झाला आन पाय दुखु रायले याइचे !
दाबले बयना पाय .
तं म्हत्येत कसे जोर लाव नं . असं वाटे पाया संग गच्ची पन द्याव दाबून .
पाय दाबता दाबता धनी निजले . अन माया पन डोया लागला .तं धन्याचा अवाज आला !(लांबुआल्या वानी,जरसाक डोया लागला होता)
सरसोते,, झपली काय ,,बिन गोइ घ्याची ? दिस भर राबराब राबत ,आन रातच्या ले बिगर गोई घ्याची झपत .
हे घे गोइ .
पायतो तं धनी यका हाती गिलास अन य़का हाती गोइ घेवुन बिछान्या पाशी उभे.
आत्ता माय,,
मले लय म्हंज्ये लय हरीक झाला .
पाय म्हनल ,आपुन उगं धन्याले काईबाई बोलतो ! पन आपल्यात त्याईचा लय जीव हाय, नाई तं आजच्या जमान्यात ,एरी कोन कोनाले जीव लावते . अतीसाकं तं झपेल धनी आपल्याले गोइ द्या ले उठते गोई देते ,पानी देते ,,का व्हय हे?
पेरेम नाई तं काय म्हनावं ..
हे सबन पावुन जीव लयचं हरीकला .
एरी जराशी पन मया दाखोत नाई .
..डोयाले पानीच आल….
मनात म्हनल ! हाव का नाई आपुन आपल्या राजाची रानी . राजान आपलमती आपल्याले इतला जीव लावला ,, अन पेरेम केल,,, तं चिकनगुनिया च काय….अरे हुट्ट ,,,,,बाप्पा हा चिकनगुनिया का लावला ….. काई बी करतो आपुन.
वदरून नाय्या वानी कडक धनी अंदरुन मऊमऊ हायेत,अस जानोलं.
✍🏻असे हाय माये धनी ……
कबी नीमनीम कबी सयदसयद
कबी नरमनरम कबी सक्तसक्त……
.@$
माये धनी ऐकण्यासाठी खालील लिंक बघा
लय बेस,