मै भी लडकी हूँ- movie review in marathi
मै भी लडकी हूँ- movie review in marathi

मै भी लडकी हूँ- movie review in marathi

मै भी लडकी हूँ

movie review in marathi

तो काळ black and white सिनेमाचा.म्हणजेच बराच जुना काळ..
१९६४ साली आलेला हा नितांत सुंदर …समाजप्रबोधन करणारा भावनाप्रधान सिनेमा.
चन्द्रगुप्त यांचे सुमधूर संगीत.
लता मंगेशकर..आशा भोसले…मोहम्मद रफी यांचे सुरेल सूर मंत्रमुग्ध करतात.
त्या काळातील दिग्गज कलाकार..मीनाकुमारी…धर्मेन्द्र.बलराज सहानी..यांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला..अप्रतिम सिनेमा.

रजनी….रंगाने काळी….अमावस्येसारखी… मुलीचा रंग काळा म्हणजे तिच्या साठी शापच. तो काळ आणखीच जुना. मुलींना शिक्षणाचा गंध नाही…शोभेची बाहुली बनून राहायचे.तिला कोणतेही स्वातंत्र्य नाही. वयात आली आणि लग्न लावून दिले ही वृत्ती.त्या काळात
प्रत्येक मुलाची सुप्त इच्छा एकच होणारी बायको सुंदर गोरीपान पोर्णिमेच्या चंद्रासारखी हवी. तिने सुंदर दिसायला हवे …रंग गोरा हवा. रजनी बिचारी रंगाने काळी त्यामुळे तिचे लग्न जुळत नाही.तिचे निष्पाप ..शुभ्र ह्दय कुणाला दिसत नाही.या जगात दिखाव्याला भुलणारे जास्त .
तिची लहान बहीण चंदा..दिसायला सुंदर.पाहुणे नेहमी चंदाला होकार देतात. एक भाऊ..लहानपणी आई गेली आणि घराची जबाबदारी रजनीवर आली. मोठी बहीण..
आईचे दुसरे रूप. ती स्वतःला घरासाठी
अर्पण करते.
मीनाकुमारीने रजनीच्या भूमिकेत जीव ओतला. चेहऱ्यावरचे अगतिक भाव तिनेच जिवंत करावे. रंग काळा पण मन शुभ्र जाईच्या फुलाप्रमाने. कोमल…निरभ्र.हृदयात फक्त प्रेम आणि प्रेम….

तिचा चेहराच सर्व काही सागंत राहते ..सालस …प्रेमळ भाव…मनाच्या वेदना…न सांगता चेहऱ्यावर प्रतिबिंबीत होतात..

रामची भूमिका धर्मेन्द्र ने साकारली…,
निर्जीव कलाकृतीमध्ये रंग भरून त्यांना सजीव करणारा प्रसिध्द चित्रकार. एका पेक्षा एक कलाकृती आपल्या रंगकौशल्याने जिवंत करायचे कसब त्याच्या हातात.

लालाजी…रामचे वडील …जमीनदार घराणे.मोठी हवेली .
घरात कसलीही कमी नाही. रामची आई पार्वती या जगात नाही. लालाजी सतत तिच्या आठवणीत रमलेले. सतत आजारी. नोकराच्या रूपात दिसतात बलराज सहानी.
लालाजीवर अतोनात प्रेम. गंगा नावाला नोकर पण घरातील सदस्य.दिवस…रात्र हवेलीसाठी समर्पित केलेली.

रामचा मामा आणि मुरळीचा भाऊ रामला फसवतात.
चंदाला दाखवून मंडपात रजनीला उभे करतात.
राम खूष असतो. पण खरा प्रकार तेव्हाच उघडकिस येतो.मंडपात एकच गोंधळ सुरूच होतो.रामला धक्का बसतो.तो फक्त रजनीच्या डोळ्यातील निष्पाप भाव बघतो..तिचा व्याकूळ चेहरा…चेहऱ्यावरील अव्यक्त भावना…त्याच्या हृदयात चरे पाडतात. न बोलताच तिच्या भावना त्याला कळतात.
तिचे अश्रू जणू सांगत आहेत…
साजना मला अशीच किनाऱ्यावर सोडून जाऊ नको रे…
आता कुठे आयुष्यात सुंदर हवेची झुळूक आली.माझ्या चेहऱ्यावर जाऊ नको.माझे मन बघ..
यात माझा काय दोष ?तो समजून घेतो. मोठया मनाने तिचा स्वीकार करतो.लालाजी दुःखी होतात.त्यांना सून पोर्णिमेच्या चन्द्रासारखी हवी असते.. सुंदर ….देखणी
सुरवातीला लालाजी  रजनीचा तिरस्कार करतात.
रजनी मात्र आपली कर्तव्य चोख बजावत राहते. हसून सर्व सहन करते. कधी तरी माझ्या भावना लालाजीला
कळतील …हा विश्वास. असतो तिला.

बरेचसे प्रसंग येतात …तेव्हा …तेव्हा लालाजींच्या मनातील रूसवा दूर होईल याची ती वाट बघते.
आर्त स्वरात कृष्णाला जाब विचारते…

कृष्णा
ओ काले..कृष्णा

तुने ये क्या किया
कैसा बदला लिया
रंग देके मुझे अपना.

देवालाच ती उत्तर विचारते…
तुझा काळा रंग सर्वत्र प्रिय आहे.
पण माझा काळा रंग कुणालाही नको आहे.
हा रंग तूच मला दिला नं
यात माझा काय दोष ?

हळूहळू रजनी आपल्या सेवाभावी वृत्तीने ..सालस गोड स्वभावाने सर्व जिंकून घेते…लालाजी खूष दिसू लागतात.
त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागते. हवेली नव्याने फुलून जाते.उदासीन वातावरण मिटून आंनदाचे नवचैतन्य घिरट्या घालू लागते. सुनीताचा कोमेजलेला चेहरा आता प्रफुल्लीत … आंनदाने भरून दिसतो.

रामने तर तिच्या निष्पाप  प्रेमाची  केव्हाच  पारख केलेली.
संसारात  आंनदाचा क्षण येतो… रजनी आई  होणार ….
हवेलीत आंनदोत्सव सुरू  होतो. दोघेही  येणाऱ्या  बाळाच्या स्वप्नात  रंग  भरू लागतात.
चंदा से होगा वो प्यारा
फुलोसे होगा वो न्यारा
नाचेगा आगन ये छमछम
नन्हासा मुन्ना हमारा
आणि  पुन्हा  अचानक  एक  वादळ येते.राम रजनीकरिता चिठ्ठी  देतो..त्याचे मित्र  जेवायला येणार  असतात…ती निरक्षर..तिला  वाचता येत नाही.. मित्र  येतात.स्वयंपाक  तयार नसतो..तो खूप  चिडतो…रागावतो…तिला जाब विचारतो.
पुन्हा  त्याला  रजनी निरक्षर आहे हे कळते.त्याला  स्वतःची   लाज वाटायला लागते ..तो रागाने  घर सोडून  निघून  जातो. ते दुःख  तिला  सहन  नाही होत.तिचा  गर्भपात होतो.
रजनी जिद्दीने दिराकडून वाचणे..लिहिणे शिकते…
 रामची वाट बघणे सुरू  राहते. रामचे मामा.. मामी पुन्हा तिच्याबद्दल  गैरसमज  पसरवतात.
 पुन्हा …तिच्यावर  आरोप.. तिला  सर्व  असह्य  होते.
 ती माहेरी  येते.
 रामला त्याचा जुना  मित्र मोहन  भेटतो …पूर्णपणे  दारूच्या  आधीन  गेलेला…त्याची पत्नी  पद्मा दिसायला देखणी  त्याच्या  आवडीची . तो पूर्णपणे  तिच्या  सौंदर्यावर आसक्त झालेला…सर्व  मनाप्रमाणे  असूनही  मोहन इतका दुःखी?
 त्याला  काही  कळत नाही.
मोहन  सत्य  सांगतो  तेव्हा  त्याचा विश्वास  बसत नाही.
मोहनचे दुःख  त्याला  खूप  काही सांगून  जाते.
जिंदगी बसर करने के लिए
उस लङकी कि जरूरत होती है जिसका
चरित्र  हो…चाहे वो खुबसूरत ना हो
पढी…लिखी ना हो.
वो कदम …कदम  पर साथ दे
साथी बन सके…मोहनच्या काळजातील ही सल त्याला  व्यथीत करते..त्याला डोळ्यासमोर  रजनी दिसू लागते..
साधी भोळी..आपल्यावर अतोनात  प्रेम  करणारी  पत्नी पण.. तिला  समजून  नाही घेतले याचा पश्चात्ताप  करत
राम घरी येतो…लालाजींना त्यांची  चूक  कळते.
शेवट सुंदर ..दिखावटी सौंदर्यापेक्षा   ह्दयातील सौंदर्य  हे महत्त्वाचे ..हेच  हा सिनेमा
शिकवून  जातो….
ज्योती संजय रामटेके
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

दर्जेदार साहित्य  लिहिण्यासाठी  आणि वाचण्यासाठी

खालील लिंक जरुर बघा.

Link

Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे  फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

7 Comments

    1. pravin Dani

      वां वां क्या बात है …अतिशय सुंदर समिक्षण .. बाह्य सौंर्दर्या पेक्षा आंतरीक सौंदर्य हे अधिक खुलुन दिसते हे निर्विवाद सत्य आहे ..

Comments are closed.

error: Content is protected !!