जुस्तजू जिसकी की उसको  उमराव जान Lyrics and song review
जुस्तजू जिसकी की उसको उमराव जान Lyrics and song review

जुस्तजू जिसकी की उसको उमराव जान Lyrics and song review

जुस्तजू जिसकी की उसको उमराव जान Lyrics and song review
१९८१ मध्ये आलेला उमराव जान.
उमराव जान…आज एवढ्या वर्षांनीही शब्द उच्चारताच त्यातील गाणी, छोटी अमरीन आणि  उमराव जानच्या भूमिकेतील रेखा,तिची अदाकारी डोळ्यासमोर तरळते.
लखनौची वारांगना उमराव जानला समोर ठेवून मिर्जा हादी रुस्वा यांनी लिहिलेल्या उपन्यासवर आधारित  हा चित्रपट आहे. उमराव जान हे काल्पनिक  पात्र आहे कि खरे आहे यावर बराच वाद झालेला आहे.(मिर्जा हादी उमरावला भेटले आणि  तिने सांगितलेले तिचे आयुष्य  त्यांनी उपन्यासमध्ये उतरवले असे काही जणांचे मत आहे. )
 अजाण असलेल्या अमरीनचे सामान्य आयुष्य  सुरु असते.तिचे अपहरण करुन तिला कोठ्यावर आणले जाते.आणि  सुरु होतो तिच्या आयुष्याचा विस्कळीत प्रवास.
 अबोध,अजाण  अमरीन ते कोठ्यावर पोहचून अनेकांची जान बनलेली उमराव असा प्रवास दिग्दर्शक मुजफ्फर अलीने मांडला आहे.
अमरीन उमराव जान बनल्यानंतर तिच्यासाठी माहेरचे ,सर्वसामान्य संसाराचे दरवाजे बंद होतात.
आयुष्यात प्रेम मिळते पण संपूर्ण  नाही. हरवलेले बालपण, अतृप्त प्रेम,पुढची अनिश्चितता आणि  मागच्या वळणावर जाण्यास मज्जाव….
सगळ्या सगळ्या भावना  ताकदीने पेलणारी रेखा, भावनांचे विविध कंगोरे दाखवणारा दिग्दर्शक,
तिच्या भावना अचूक  शब्दात शब्दबद्ध करणारी गाणी,गजल,
खय्याम यांनी दिलेले  संगीत,
उमरावच्या भावना गाण्यात उतरवणारी आशा,
उमराव सोबत त्याच ताकदीने अभिनय  करणारे अभिनेते….सगळ्यांनी मिळून उमराव जानला एका वेगळ्याच उंचीवर पोहचवले.पण तरीही उमरावजान म्हंटले की बहूतेकांच्या डोळ्यासमोर फक्त  रेखाच येते.याला कारण तिचा अभिनय,तिची लाजवाब अदाकारी.
श्रीमंती असूनही डोळे सदा आसवांनी डबडबले तिचे डोळे बघून खूपदा अंगावर शहारे येतात.
जुस्तजू जिसकी की उसको तो ना…..
ही गजल शायर शहरयार यांनी आधीच लिहिली होती. त्यात  आवश्यक बदल करुन उमरावजान साठी देण्यात  आली.
खय्याम यांना या सिनेमाच्या संगितासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि  फिल्मफेअर अवार्ड,आशा भोसलेला या गजलसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
नवाब(फारुक शेख) उमरावजानवर प्रेम करतो. पण विरांगनेबरोबरचे नाते त्याच्या  आईला अमान्य असते, आईच्या विरोधामुळे नवाब उमरावाला सोडून देतो. तिच्या  एकटेपणाचे दुःख ती त्याच्याच हवेलीत त्याच्या आणि  त्याच्या  बेगमसमोर व्यक्त करते.
जुस्तजू जिसकी की उसको तो ना……ही गजल ती गाते.
ज्याची इच्छा धरली,ज्याबद्दल प्रेम वाटले,ज्याचा आयुष्य  शोध घेत होते  ते काहीही मिळाले नाही पण त्या बहाण्याने लोकांचे खरे रुप मात्र समोर आले.त्यांचे मुखवट्यामागे दडलेले चेहरे मला ओळखता आले.
तुला नाराज,बदनाम  केले नाही, तुझ्या  बद्दल काही तक्रार केली नाही आणि  मी पण कशाचा पश्चाताप केला नाही.  प्रेमाची रीत  प्रामाणिकपणे  निभवत गेली. तुझ्या वर प्रेम करत राहिली.
तू आयुष्यात  कधी होतास कधी मला सोडून गेला काही आठवत नाही.तुझे अस्तित्व माझ्या आयुष्यात होते  तेव्हा फक्त  तेव्हाच जिंदगीची (जिवंतपणाची) झलक दिसली होती.पण तू आयुष्यातुन गेला आणि  मी ती छोटीशी झलकही विसरले मी.आता तर ते सगळे  स्वप्नवत वाटते मला.
पूर्ण आयुष्य एकटीने (तन्हा)काढल्यावर आता माझ्या बद्दल काही बोलण्यातही काय अर्थ आहे.
जुस्तजू जिसकी थी उसको तो न पाया हमने
इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने
 तुझको रुसवा न किया, खुद भी पशेमाँ न हुये
इश्क़ की रस्म को इस तरह निभाया हमने
जुस्तजू जिसकी थी…
कब मिली थी कहाँ बिछड़ी थी, हमें याद नहीं
ज़िंदगी तुझको तो, बस ख़्वाब में देखा हमने
जुस्तजू जिसकी थी…
ऐ अदा और सुनाये भी तो क्या हाल अपना
उम्र का लम्बा सफ़र तय किया तन्हा हमने
जुस्तजू जिसकी थी…
गजल संपते…पण आपल्याला भानावर यायला वेळ लागतो.
गजल गातांनाचे उमरावजानचे दुःख  ,नवाबची अगतिकता रेखा आणि  फारुक शेख आपल्यापर्यंत पोहचवतात. उमरावजानचे चेहऱ्यावरचे हसू आणि  डोळ्याच्या आत दडलेले आसू सगळेच अभिनयाची कमाल दाखवतात.
उमरावजान म्हंटल्यानंतर रेखाच आधी का आठवते याचेही उत्तर आपल्याला  मिळते.
प्रिती

प्रिय वाचक,तुम्हीही तुम्हाला आवडणाऱ्या गीताचे रसग्रहण शब्दपर्णवर पाठवू शकता.

Email-shabdaparnamarathi@gmail.com

शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

प्रिय लेखक,लेखणीचे मोल कोणी करु शकत नाही. सर्वांनाच हे प्रतिभेचे देणे लाभत नाही.ज्यांना हे देणे लाभले त्यांनी लिहिते रहा…..

 

10 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!