राखीपोरनीमा-Varhadi katha
सगुना आज लय खूश हुती ..ऊद्या राखीपोरनीमेचा सन
लय दिसान भाऊ येऊन रायला होता तिच्या घरी.
बापा आज त तुया चेहरा लयच चमकुन रायला .सखाराम बाहेर जाता.. जाता बोलला….
तुले बचतगटाचे पैसे भेटले का काय? बी.. सी .. लागली वाटते तुईवाली..
माया बी.. सी..च्या पैशावर नजर ठुवत जा तुमी.. मी काडी ..काडी करून पैसा जमा करतो..अन तुमी उडवत जा.. बचतगटाच बी तसच.. तुमाले त कुबेराचा खजीना आनुन दिला तरी पुरनार नाई.. लयच उधळपट्टीवाला नवरा भेटला मले.. मी हुती म्हणून संसार झाला..दुसरी असती त पयाली असती..मी कसा पैसा पुरवतो ते माय मले माईत..
नव लुगड घ्यासाठी दहा वेळा ईचार करा लागते मले.. यंदा गावातल्या साऱ्या
बाया सेलमदी गेल्या मले बी लय जाव वाटे पन माय नाई जमल.. पदराशी पैसा नाई जाउन तरी काय करू? तुमच बर हाये.. कायचाच ईचार नाई.. आला दिस ढकलाचा.उद्याचा ईचार नाई.. दुख हाये सुख हाये.. काई कायजी नाई.. तो कायजी कराचा सबन ठेका म्या घेतला हाये..मले निरपा लागते सबन..देव बी मायी लय परीक्षा घेऊन रायला.
सांग आता.. अव गंगा कायले ऐवढा ईचार करत बिचारे.
देवाले बी कायजी हाये आपणली.. आता मायवाल पाय समद चालु हाये ना बराबार.. अन तु असल्यावर मले काय कायजी हाये..
अव त सारा इचार शायन्या मानचसाले हाये..नाई त कायचा ईचार अन कायच काय…
म्हणजे मी शायना नाई का व गंगा…
बापा… तुमच्याएवढा शायना मानुस त शोधुन सापडनार नाई बापा…
बर ..ते जाऊ दे…तु ऐवढी खुश कावुन दिसुन रायली आज ते सांग…
अव घरात रायता का जंगलात रायता तुमी.. साधे सनवार माईत नाई तुमाले… ऊद्या राखीपोरनीमा हाये हे बी माईत नाई… काय मनाव या मानसले समजत नाई.. माय नसीबच फुटक
ऊद्या माया भाऊ येनार हाये… मांगल्या वर्षी करोनान घोर केला..त्याले याले नाई भेटल.. लय दिसान येऊन रायला माया भाऊ जरास गोडधोड करिन म्हनतो..तसबी त्याले घरी काई चांगल..चुंगल खाले भेटत नाई.. मायी वैनी नीरा आयसी हाये..
तुमी अस करा.. चांगल तुप आना.. ईलायची आना.. पुरनाच्या पोया करीन साजऱ्या ..त्याले लय आवडत्यात..पुरनाचा सैपाक माया वैनीच्या लय जिवावर येते..मले पा अन फुल वा.. अशी हाये ते.
जा.. ते थैली घ्या.. आना लवकर …
अव गंगा मी सबन आनतो..थैली बी घेतो..पन पैसे त तुलेच द्या लागन..
काय मनाव या मानसाले… धन्य आहे बापा.. त्या पाटलीच्या खाली पाचशेची नोट हाये घ्या ते…
बचत गटातले ठेवले हुते ते…नवरा किती कारभारी हाये ते मलेच माईत हाये..
झाकली मुठ लाखाची..जुने लोक उगीच म्हनत नाई…
झाल काय तुय भाषन देऊन..
जातो मी……
शब्दपर्ण साईटवरील इतर व-हाडी कथा वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा.
https://marathi.shabdaparna.











जोरदार
Mstmst
वाह 👌
मस्त झाली राखी पोरनिमा