दुर्दैव-marathi sad story
दुर्दैव-marathi sad story

दुर्दैव-marathi sad story

दुर्दैव-marathi sad story

 

वसुss एss वसुss उठss उठss जेवायला वाढ..उठते की नाही?.
नामदेव तोल जाऊन खाली पडतो. हातातली पिशवी वसुच्या अंगावर भिरकावतो. तरी वसुची हालचाल न पाहता, तिला शिव्या द्यायला लागतो. साली जास्त शहाणी झाली त्या मालकिनींच्या जीवावर. चार मोठ्या लोकांन कडे काम काय करते नवरा उपरा वाटतो आहे तुला.
चल उठss
दारु पिलेला नामदेव तोल सांभाळत बिछाण्यावर आदळतो. काही जोऱ्यात ओरडतो.
ऊठ  ss….
जास्त हुशार झाली न. मग हो तुझ्या माहेरी. उद्याच निरोप देतो तुझ्या लाडक्या भावाला. मोठ्ठा ताई-ताई करतो नं. घेऊन जा तुझ्या बहिणीला. काही वागत नाही हीचं दोन दिवस गेले की बिमार.
“झाड आहे का पैशाचं?”.
“काही सुख नाही  मलां”.
पाठवतोच निरोप.

नामदेव नशेत बडबड करत वसुची चौकशी न करता झोपी जातो.
अनभिज्ञ नामदेव दुर्दैवाने तोच उपरा झालेला. त्याला काय माहिती…
वसु…
“वसु नी त्या अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या त्याच्या संसाराचा, त्याच्या पाशवी वृत्तीचा, त्याच्या व्यसना चा, त्याच्या माणसांचा, त्याच्या गावाचा, घराचा, या जगाचा, या मानवी देहा चा कधीच निरोप घेतला होता”.

मुक्ती मिळवली होती बिचारी ने, या त्रासदिक आयुष्यातूनं. याअसह्य यातने तून सुटका झाली होती तिची. निरोप घेतला होता या ऐहिक जगाचा. जिथे तिला सुखाची परिभाषा ही कळली नव्हती. असा निरोप जो घेऊन ती वैकुंठीच्या प्रवासाला निघाली होती. तिचा नवा आरंभ होणार होता.
“निरोप एक शाश्वत सत्य,
समयस्त नसे आरंभ असे नाविन्याचां”.
“इतुकेच मला जातांना सरणावर कळले होते

मरण्या ने केली सुटका जगण्या ने छळले होते”

@$

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!