नाकारले मी-Marathi short story
मी नुकतेच पंधरावं संपून सोळाव्यात पडले होते.सर्व दृष्टीने माझ्यात अभूतपूर्व बदल जाणवत होता. शारीरिक, मानसिक याबरोबर पुरूष आकर्षण अपार वाटत होत. याच उत्तर मला माहिती नव्हतं. कुणाला बोलायची तदात नव्हती.रुढी,परंपरा,धार्मिक अशा संकल्पना मानणारं प्रतिष्ठित घराणं. याचा कुबट वास नाकातोंडात जात होता. मला याची उलटीच यायची, किळस वाटायचा, मुक्त व्हावं, स्वच्छंदी, नाकात वारं भरलेल्या वासरा सारखं उधळून नाचत, जीवनाचा आनंद घ्यावं, ही मनिषा दाबून टाकली होती. ती परत परत उफाळत होती.
गावातलाच अगदी माझ्या वयाचा, एकाच शाळेत, वर्गात शिकणारा, तो शीलवंत माझ्या नजरेचा ताबा घेत होता. मला स्वप्न पडायचे, दिवसारात्री त्याचा भास बेचैन करायचा. कोण्या दुष्मनांनी या भिंती बांधून घोळ घातला होता. मन म्हणायचं, घोळ निरर्थक, खोटा, पण आडवी प्रतिष्ठा…! जिवाभावाचा, जिवलग दिसायला राजबिंडा, रुबाबदार शीलवंत. खरच शीलवंत होता. नुसतं
बघत राहण्यावाचून माझ्या हाती, ते काय? अबला, परजीवी, भावना, अपेक्षांचा जन्मानुजन्माचा कोंडमारा सोबतीला. तो मी नाकारला पाहिजे. निदान जीवनसाथी निवडीचा आधिकार असावा, हे ओरडून ओरडून समाजाला सांगले पाहिजे. असं मनोमन वाटायचं. ही शिष्ट मंडळी, खुनशी, जीवघेणारी, (ऑनरकिलींग) सुपारी देऊन बळी घेणाऱ्या प्रवृत्तीचे आहेत. हे बघितलं आहेच उघड्या डोळ्यांनी. भीतीच्या गोळ्यांनी काळीज पिळवटून जायचं. कोणत्याही परिस्थितीत मला त्याला नजरेआड करायचे नाहीये. माझ्या मनाचा कौल मला बजावत होता.
लगीनघाईची लगबग सुरू झाली. पै-पाहुणे यांची ये-जा वाढली. मी नकारावर नकार कळवत होते. वागण्याचा गैर अर्थ काढला जात होता. मी तोंडदाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते. आता मलाच कोंडी फोडावी लागणार होती. मी ठरवलं, सांगूनही टाकलं. मला माझ्या इच्छेनुसार लगीन करायला आवडेल. कपाळावर गाठी जमा झाल्या, आकाश पाताळ एक झालं. प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.कोण मुलगा?जातीचा आहे का?काय करतो? जातीचा, तर तो आपला आहे का? कमावतो किती?नाहीतर आमचं नाक कापशील?गावात, समाजात छी थू होईल. असं काही होणार नाही, हे लक्षात ठेवा?
मी हबकून गेले. शीलवंत हाच ,माझ्या शीलाची,आयुष्य वस्त्राची किनार होता. मला कुणाच्या खोट्या प्रतिष्ठेची चाड राहिली नव्हती. माझ्या स्वातंत्र्यावर,हा तर घाला होता. मी पंचप्राणांनी त्यालाच स्वीकारले आहे. मला कोणीही दूर करणे दुरापास्त होते. समाज, प्रतिष्ठा, बडेजाव मला कवडीमोल वाटत होता. म्हणून मी बंड केलं, नातंगोतं तोडलं. भय बाळगलं थेट मी शीलवंतची कुडी जवळ केली. आत्मीय भावनेने. झुगारून सारे बंध.
चंद्रकांत गायकवाड
मुखेड.







छान लिखाण
छान लघुकथा
अप्रतिम 👌
Sundar
Chhan