marathi shortstory-मोरपीस स्वप्नातले
श्वेता बारावी पास झाली . खूप छान मार्क्स मिळाले आणि तिला जे कोर्स करायचे होते त्यासाठी तिला मोठ्या शहरात जाणे गरजेचे होते म्हणून पुढील शिक्षण घेण्यासाठी श्वेता पुण्याला गेली .चांगल्या काॅलेजात अॕडमिशन आणि राहण्याची व्यवस्था सगळं अगदी नीट पाहून सर्व सोयींनी परिपूर्ण असं रुम बघून श्वेता पुण्याला गेली.
नवीन शहर,नवीन लोकं तिचा स्वभाव जरा लाजरा बुजरा असल्यामुळे तिचा अभ्यास आणि ती मात्र रोज संध्याकाळी
नियमित बाहेर पडायची, सामान व दूध घेऊन यायची श्वेता ज्या दुकानात जायची त्याच्या शेजारच्या दुकानात एक मुलगा बसलेला असायचा तिला पहिल्या नजरेत तो आवडायला लागला .त्याला कल्पनाही नव्हती कि कुणी मुलगी त्याला बघण्यासाठी रोज समोरुन जाते .तिही त्याच्या कडे निटसी बघायची नाही पण केवळ तेथून जाताना तिचं मन आल्हादून जायचं ,प्रेमाच्या लहरी तिला रोमांचित करायच्या ..
ह्याच नित्य नियमाने वर्ष निघून गेलं पण ती कधी त्याला आपलं प्रेम व्यक्त करु शकली नाही.
एक दिवस नळांना पाणीच येत नव्हतं म्हणून श्वेता शेजारच्या देव काकुकडे विचारायला गेली. तर त्यांच्या कडे त्यांची मैत्रीण (भावे काकु)आलेली असते . श्वेताला पाहताच त्या काकु तिची विचारपूस करायला लागतात एकंदरीत पहिल्याच नजरेत श्वेता त्यांना खूप आवडली असते. मग जेव्हाही भावे काकु तेथे यायच्या श्वेताला भेटल्या शिवाय जायच्या नाहीत. देव काकुंना नेहमी म्हणायच्या तिला माझ्याकडे घेऊन ये.
बघता बघता एक महिना निघून जातो.श्वेताचे
पेपर संपतात मग दोघी भावे काकुकडे जाण्याचं
ठरवतात पण श्वेता देव काकुंना म्हणते“काकु आपण जरा लवकर जाऊ भावे काकु कडे कारण मग मला दूध आणायला जायचं असतं.”
देव काकु तिच्या म्हणण्याला होकार देतात व
संध्याकाळी दोघीही भावे काकु कडे जातात ,
बेल देतात.जय दार उघडतो (भावे काकुंचा एकुलता एक लेक) श्वेताची आणि त्याची नजर एक होते ..
मध्येच देव काकु म्हणतात“अरे जय या म्हणणार कि नाही .” तो एकदम दचकून..
.” हो…हो…काकु या ना,ये आई देव काकु आल्यात .” आईला हाक मारतो…
श्वेताच्या मनात अतिशय कालवा कालव सुरू होऊन
जाते ..“हा भावे काकुंचा मुलगा…”मन आनंदीही झालेलं असतं तसंच खूप जास्त घाबरतही असतं .. श्वेता दिसायला खूपच गोड असल्या मुळे जय ची नजर सारखी तिच्यावर येऊन थांबते…त्याचंही मन मोरपिसा
सारखं फुलतं.ती दिसताच मनात होणारी घालमेल त्याला जाणवते .
मनातल्या मनात तिच्या सौंदर्याची ,तिच्या हसण्याची
प्रशंसा करतो.
दोघांची ओळख होते, एकमेकांना फोन नं. देतात.दोघांच्याही मनातली मोरपिस जवळीक साधू पाहतात.
हळूहळू बोलणं सुरू होतं.कालांतराने त्याचं रुपांतर खास मैत्री मध्ये होतं….जय श्वेताला प्रपोज करतो . श्वेताचं शिक्षण पूर्ण होतं न होतच दोघांच्याही घरच्यांच्या
संमतीने दोघेही लग्न बंधनात अडकतात . लग्न झाल्या नंतर श्वेता जयला तीन वर्षांपासून मी तुला पाहण्यासाठी नित्यनियमाने या सडके वरुन जायची ही पूर्ण कहानी सांगते आणि अलगत एकमेकांचा हात हातात घट्ट होत जातो नी हळूच मोरपिस तनूवर फिरावं नी शहारलेल्या अंगांची मिठी अजूनच घट्ट होत …नव स्वप्नात दोघेही न्हाऊन जातात.
दोघंही खूप आनंदी असतात….मनू अतुल
नाशिक








सुंदर प्रेमकथा
धन्यवाद ताई 🙏
छान कथा
धन्यवाद ताई 🙏
खूप छान
खूप खूप धन्यवाद 🙏