पुन्हा नव्याने-मराठीकथा
कककककककरररररररररर….( समोर येणाऱ्या महिलेस वाचवत जोरदार ब्रेक लाऊन थांबते कार) ..दार उघडून एक पस्तीशी तील रूबाबदार महिला चढ्या आवाजात बोलता बोलता पुढे येते.
“काय हो बाई कुठे आहात तुम्ही…अस चालतात रस्त्यावर..ऐकू येत का, एवढा हार्न वाजवला ..कुठल्या तंद्रीत होतात….”
ओह..साॅरी हाॅ ….लक्ष नव्हत जरा …
अग रेणुका तु?.(आश्चर्या ने ) कशी झाली तू .(खांदे धरत).
ओळखल का नाही मला ?,मी रमणी ..तुझी स्पर्धक ..ग.(हसत).
रमणी तु? इथे कशी ?
सांगते, सगळ सांगते ,आधी कार मधे बस .दे तुझी ती बॅग आणि हे काय आहे फोटो दिसतो..बर जाऊ दे नंतर बघु …रेणू..रेणू कित्ती दिवसांत भेटलीस ग ….कसनुस होतय मला ..खूपखूप गप्पा करू आपण.
ड्रायव्हर चला ..
समोर कॅफे वर थांबवा….
ये रेणू काफी घेत गप्पा करू..(दोघी टेबल वर अमोरसमोर बसतात..हे काय तू हा फोटो सोबत का मिरवती आहेस ….
असू दे ग रमे मला नाही होत त्याची अडचण..
तू सांग इथे पुण्यात कधी आली.?. आणि तुझे यजमान कुठे आहेत?
सांगते ना. आधी ऑर्डर तर करू दे. काय घेणार ,,कॉफी ऑर्डर करू,, बर ..
वेटर दोन कॉफी …
अगं माझ्या यजमानांची इथे बदली झाली . रुजू झाले , शिफ्टिंग काल केले . तुला शोधायच डोक्यात होत माझ्या.आणि तु दिसलीच..
किती छान ,आता मी इथेच आहे, आपण छान भेटत जाऊ , मस्त की नाई रेणू ,मज्जा करू, जुने दिवस आठवलेबरं.बरं ..हाॅ असं सांग, तुझं तो हिरो कुठे आहे. मी ऐकले होते, तू लग्न केल्याचे त्याच्याशी, हो न..होताच राजबिंडा तो नाई का.किती छान नाव होतं त्याचं रणवीर…….
अग तू बोल ना, मीच आपली बडबड करते आहे सांग ना मला .
काय सांगू रमे तुला ..
अगं रणवीर बद्दल सांग ,मजेत आहे की नाही तू त्याच्यासोबत.
मजेत ह …..(बारीक असत हो) हो मी आणि रणवीर आम्ही दोघांनी लग्न केलं. प्रेमविवाह… प्रेम झालं होतं माझं त्याच्यावर. विवाह केला दोघांची ,घरे तुटली ,,माहेर सुटले दोघांचे, हो परवानगी नव्हती ना. तरी दोघांनी ठरवलं संसार मांडायचा, एक छोटसं स्वप्नांच घर बांधायचं .ते पूर्ण पण केलं कल्पने प्रमाणे घर बांधलं. राजा रानी आनंदात राहात होतो .
अगं मग पुढे काय झालं ?
सांगते ना सांगते ..सात वर्षे संसार केला .तो म्हणेल तस..प्रेम होतं ना गं माझं त्याच्यावर .तो म्हणेल ती पूर्व दिशा, सोबतीने प्रवास करायचा होता त्याचा .खरंच किती आनंदी होतो आम्ही, आमचे घर, .
रणवीर म्हणायचा …तुझं माझं घर ,आणि आपली दोन छान पिल्ल, खूप आनंदाने राहू आपण ,काही नको आहे मला दुसरं ,तुला मागितलं ,देवाने दिल ग ,खुप उपकार आहे देवाचे ,कसं छान चालू होतं सगळं,
मग का कोण जाणे संसाराला दृष्ट च लागली ..
खरंच ग माणूस ओळखलं कठीण असतं नाई .किंबहूना येतच नाही ओळखता आपल्याला, का प्रेमात माणूस आंधळा होतो म्हणतात .. तसच काहीस ,हो अगदी खरे ,त्याची ..त्याचीच प्रचिती आली ग रमे मला .मी ओळखूच शकले नाही रणबीरला. सुरुवातीला वाटायचं हा आहेच गमतीशीर म्हणून रमतो माझा मैत्रिणींमध्ये ,नंतर नंतर कळलं हेतुपुरस्सर असा वागतो.. नंतर कळल ह्यला या सवयी च आहे स्त्रियांमध्ये रमण्याचा.
ऑफिसच्या पार्ट्यांमध्ये गेलो की दुसऱ्या बायकांशी सलगी करणे ,माझ्याकडे दुर्लक्ष करणे ,हळूहळू सगळं कळत गेल, पार्टी मध्ये थोडी थोडी घेता घेता दारू ही सवयीची झाली. आणि मग तर काय ,मी गावंढळ, शंकेखोर ,मॅनर्स लेस आणि कायकाय.. नको असलेले सारेच गुण माझ्यात .. मी दुर्दैवी ठरलो,, असं सारखा म्हणायचा रणवीर .आवडे नाशी झाली होते ग मी .मग सगळ वाढतच गेल..
उशीराने ऑफिसमधून यायचं ,,,जेवण झालं आहे म्हणायचं ,,,कुठल तरी कारण काढून हॉलमध्ये झोपायचं.. दवाखाना स्वताच कर म्हणायचं .कुठली हाऊस नाही का मौज नाही.. काही नाही नोकरी करावी ..तर ती तुला जमणार नाही असे ठाम मत
अशी बाई असते, असं सारखं म्हणायचं .पण कधी त्या दिशेने प्रयत्न किंव्हा वाटचाल नाही करायचं ..दवाखाना तू स्वतःचा स्वतः कर म्हणायचं .एकदोनदा मी म्हंटले ,आपण दोघे टेस्ट करू. तर रागे भरला ,खूप चिडचिड केली ,तेव्हापासून तर सगळं सगळ पालटलच,अंगावर येऊ लागला हाती पडेल ते मारू लागला.मूल न होन हे महत्त्वाचं कारण झालं त्याला ..
रेणू च्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या .रमणी ने तिला जवळ घेतले . मांडीवर ठेवलेला तो फोटो हातात घेतला. एवढा सोजवळ दिसणारा राजबिंडा मुलगा इतका वाईट निघाला. देवा….कधी वाटलं नाही ग अस ही होऊ शकेल.
तू कधी तक्रार केली नाही त्याच्याकडे. मला नोकरी करू दे. नाही गं ऐकूनच घ्यायचं नाही .
पुढे काय झालं?
पुढे पुढे तर मला असं पण ऐकण्यात आलं त्याच्या सेक्रेटरी शी त्याचे संबंध वाढले आणि त्यांना लग्न करायचं आणि माझी अडचण होत आहे..
काल तर कहरच झाला रात्री खूप पिऊन आला आणि माझ्याशी खूप भांडला.. अंगावर आला काहीबाही बोलला.. नको ते आरोप केले कूस उजवू शकत नाही तुझी तु वांझोटी आहेस एखादी व्यक्तीआवडत नसेल तर तिला आपण कुठपर्यंत वाईट म्हणू शकतो हे मला काल कळले ग रमे..माझ्या अंगावर माझं सामान भिरकावून चालती हो म्हंटला ..माझ्या घरातला निघून जा मला तुझी गरज नाही आहे तू माझ्या काही कामाची नाही.
हा बघ ना ,,फोटो ,,हा फोटो किती सुंदर आहे ना.. आमचा प्रेमाची एकुलती एक आठवण ग..किती दिमाखाने मिरवत आहे ना हा पूल त्या पाण्यावर. लग्न झाल्या झाल्या महाबळेश्वरला गेलो ना तिथून घेतली होती अग ही फ्रेम ,नाही म्हणत होता रणबीर ,मीच आग्रहाने घेतली होती ,आपल्या बेडरूम मध्ये लावू म्हणून, आपल्या नात्या मधला दुवा आहे हा .आपल्याला मुलं होतील ती मुलं तुला आणि मला जोडून ठेवतील रे.आपल्या दोघांमधलं ऐक्य ठरतील ते ..आपलं नातं बळकट होईल ..देशील न मला दोन गोंडस मुलं .दोनच . एक मुलगा एक मुलगी ..सांगेन मी मुलांना
आम्ही मधुचंद्रासाठी महाबळेश्वर ला गेलो ना तेव्हा ही फ्रेम घेतली होती .नात्याला बळ देणारी ही पूलाची फ्रेम ….कितीही पाणी पूला खालून वाहून गेलं ना तरी कसा भरभक्कम उभा राहतो हा. कुठल्याही परिस्थितीती चा साक्षीदार …हीच ती फ्रेम ग रमे कालच्या भांडणात ही माझ्या अंगावर भिरकाविली रणबीरने ..काय करू कुठे जाऊ वाईट परिस्थिती आहे ग. आईकडे जाणार होते पण कुठल्या तोंडाने जाऊ. त्यांनी कधी जवळ नाही केलं मला ..आणि मी वेडी ठरले ग… मवाली माणसाला जवळ केले प्रेमाच्या वेडात ,वेढ्यात अडकले ग. काय करू ,काय करू रमे ,सांग मी .सांग काय करू .कुठे जाऊ..तु उगा मला वाचवल.या निकामी जीवा चा अंतच बरा होता ग
अग वेडी आहेस का? तू काही काळजी करू नको आता मी आलीये ना तू माझ्या सोबत चल .तू शिकलेली आहेस यांचे ऑफिस मध्ये तुझ्या नोकरी साठी बोलते मी आजची स्त्री आहेस तू असं खचून चालतं का .खंबीर व्हायला हवं.वर्षानुवर्ष पूलाला उचलून धरलेल्या खांबांन प्रमाणे.. कितीही पाणी वाहून गेलं तरीही धीरगंभीर उभ रहावं.सद्य परिस्थितीत ला तोंड देत… समजलं नं..
“गेले ते दिन गेले” ..अबला नाही .. तू सबला आहे… चल चल जाऊया आपण…
खरच का ग सगळ व्यवस्थित होऊ शकेल …जगू शकेल मी..मी तर हे कलंकित आयुष्य संपवायला निघाले होते…जगण्या मरण्या मधील खोल दरी मला कधीच पार करता येणार नाही असे वाटत होते…तु आधार दिला .. धुक्यात दडलेली ती पूला वरून जाणारी वाट तू दाखवली रमे मला…. ग्रेट आहेस तु …
.खरच आयुष्या च्या वाटेवर भरपूर खाचखळगे लागतात, आपुलकीने हात देऊन ती पार करण्या जी प्रेरित करतात ..ती खरी नाती..तो खरा दुवा ……
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा









अप्रतिम
आभार
खूप छान.
खरे आहे, A friend in need is a friend indeed.
आभार
Wah nice 🌹🌹🌹
वाह.. अप्रतिम 👌