प्रवास काळरात्रीचा-भयकथा
चल लवकर आवर….मला उद्या कंपनीत ही जायचे आहे….पुण्यात घरी पोहचून मला थोडी झोप ही आवश्यक आहे….
अवधूत आदिती ला म्हणाला
ते दोघे काही कामानिमित्त नाशिक ला आले होते….आणि संध्याकाळी परत चिंचवड ला येण्यासाठी निघाले होते.
छान प्रवास चालू होता. तसा रस्ता त्यांच्या ओळखीचा होता,पण निघायलाच उशीर झाल्यामूळे…आता अंधार पडला होता…….म्हणूनच तो गाडीही जरा वेगातच चालवत होता. त्याला हाॅल्टही घ्यायचा नव्हता. पण आदितीच्या ईच्छेखातर ते एका हाँटेल मध्ये जेवण करण्यासाठी थांबले….खाणे चालू असताना, आदितीने त्याच्या गळ्यातील ताईत पाहून विचारले की
तू हे का घालत असतो….खूप आऊटडेटेड वाटते…
तसे तिने अनेकदा त्याची ताईतवरून चेष्टा केली होती…पण तो नेहमीच म्हणायचा की आजी ने पत्रिका पाहून मनात ठाम घेतले की मला भूतबाधा होण्याचा धोका आहे…म्हणून तो माझ्या गळ्यात घातला आहे………तिचा मस्करीचा मूड पाहून तो ही म्हणाला…..की
ताईत आऊटडेटेड वाटतो…मग तू हे गजानन महाराजांचे ब्रेसलेट मिरवतेस…ते काय खूप ईन फॅशन आहे का?…..
ती म्हणाली की
अरे त्यामुळे मला एक आत्मविश्वास मिळतो….असू दे…
असे म्हणून तिने त्याला एक चिमटा काढला…..
ते दोघे गाडीत बसले आणि मार्गी लागले…..थोड्याच अंतरावर…एक मध्यमवयीन स्त्री व तिचा मूलगा उभे होते. त्यांना बहुतेक लिफ्ट हवी होती…..आदिती च्या सांगितण्यावरून त्याने गाडी थांबवली….आदिती ने त्यांना गाडीत बसण्यास सांगितले…
त्यांचा प्रवास सूरू झाला….ते दोघे काहीच बोलत नव्हते……
आदितीला ही झोप लागली होती…..
काही वेळ गेल्यावर अवधूत ला काहीतरी विचित्र वाटू लागले….खूप वेळ गेला तरीही….त्याला ओळखीचे असे काहीच दिसत नव्हते….रस्तातर अगदी नेहमीचाच होता…पण असे का घडत होते…
त्याने…रियर मिरर मधे पाहिले तर ती स्त्री ही डोळे मिटून बसली होती……पण चेहरा अगदीच विचित्र वाटत होता….
त्याने पटकन वळून मागे पाहिले तर…तिने डोळे उघडले होते….ते अगदी रक्ताळलेले दिसत होते….
आता मात्र त्याच्या जिवाचा थरकाप उडाला…..त्याने आदितीला खूप हाका मारल्या…पण ती ही जागी झाली नाही…..त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण गाडी ही थांबत नव्हती…..परिस्थिती खूपच कठीण होती…….पटकन ओळखीच्या ठिकाणी जावे….म्हणून त्याने गाडीचा वेग खूप वाढवला…….कुणाला फोन करावा म्हणून मोबाईल बघीतला तर …..आजिबात रेंज नव्हती……हे ही विचीत्रच होते………
भितीने त्याची गाळण उडाली होती…..तो वेगात गाडी दामटत होता…….अचानक त्याच्या डोळ्यावर…..प्रखर प्रकाशाझोत पडला…….समोर….मोठा काळा कातळ दगड होता…….त्याने करकचून ब्रेक दाबले….मोठा आवाज होऊन गाडी थांबली……त्याचे डोके….स्टिअरींगवर आपटले……….
आदितीच्या हलवण्याने आणि हाका मारण्या ने तो सावध झाला…….डोळे उघडून पाहिले तर गाडी बाहेर माणसांचा घोळका दिसत होता…..तो बेशुद्ध पडला होता तर…….
तो आणि आदिती बाहेर आले……..त्यांना तिथल्या लोकांनी बाजूला बसवले…पाणी दिले….. त्यांना. जरा हुशारी वाटू लागली….मग कळाले की ते…..निमगाव खंडोबा च्या डोंगरावर होते………
आपण ईथे कसे आलो……..आणि….ती स्त्री…आणि…तिचा मुलगाही….दिसत नव्हते…..त्यांनी गावकऱ्यांना त्या बाबत विचारले……..
गावकरी ते ऐकून हबकलेच……म्हणाले….
अहो,असे कोणीही हाँटेलपाशी उभे नसते.ती भूते होती.वेगात गाडी चालवण्याच्या नादात अपघात होऊन.त्यांचा मृत्यू झाला.तेव्हापासून.अमावस्येला जर तिथून कोणी वेगात गाडी चालवत असेल तर ते त्याला असाच धडा शिकवतात……
तुमचे नशीब.आणि हा ताईत.तसेच मॅडमच्या हातातील ब्रेसलेटमुळे तुमचे जीव वाचले.आणी जशी अमावस्या संपली तसे ते तुमचा अपघात करून.गायब झाले…आता खंडोबाचे दर्शन घ्या….जेवण करा….आणि परतीच्या वाटेला लागा……
ते दोघे अगदी हतबुद्ध झाले होते…..अवधूत…आजीला, ताईतसाठी , तर आदिती गजानन महाराजांना मनोमन नमस्कार करत होते.
वैशाली जोशी
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










Mast 🌹🌹🌹
खूपच मस्त 👌
खूप छान