मराठी भयकथा – घाटातले भूत
मराठी भयकथा – घाटातले भूत

मराठी भयकथा – घाटातले भूत

मराठी भयकथा

उस्मान ला आज गोवा एक्सप्रेस ची ड्युटी देण्यात आली..
त्याची सर्व तयारी झाली. आज सहकारी ड्रायव्हर म्हणून त्याचा खास मित्र अजय शिंदे होता. गाडी सुपर फास्ट असल्यामुळे फार काही हाॅल्ट नव्हते.त्यामुळे रात्री ची ड्युटी मिळूनही तो तसा खूषीत होता. मनमाड ला 24 तास हाॅल्ट करून ते दोघे परतीची गाडी घेऊन परत येणार होते. आणि दुसऱ्या दिवशी अजय चा वाढदिवस होता.

उस्मान स्टेशनवर पोहचला. अजय जरा लांबच्या काॅलनीत रहात होता म्हणून त्याला यायला थोडा उशीर झाला.
पण तो आलाच.
गाडी ही आली होती. त्यामुळे त्यांचा आधी ठरलेला चहा चा बेत त्यांना रद्द करावा लागला.
त्यांनी गाडी चा चार्ज घेतला.
आणि एक खणखणीत शिट्टी मारून. उस्मान ने गाडी सूरू केली..
नेहमी प्रमाणे अजय ने गणपती बाप्पा मोरया चा गजर केला नाही. उस्मान ला ते जरा खटकलेच कारण जेव्हा जेव्हा त्यांची सोबत ड्यूटी असायची तेव्हा तेव्हा तो ड्यूटी सुरू करण्याच्या वेळेस गणपतीचा गजर करायचा कारण तो गणपतीचा खूप भक्त होता हे उम्मान ला माहिती होते ..पण गाडी सुरू करण्याच्या गडबडीत असल्याने तो काही बोलला नाही …गाडी जशी बाहेर पडत होती….त्यावेळेस स्टेशन वर उम्मान ला काहीतरी गडबड , आरडाओरड ऐकू आली , पण असेल काही प्रवाशांचा प्राॅब्लेम म्हणून त्याने दुर्लक्ष केले.
एव्हाना गाडी ने वेग घेतला.
जरा स्थिरस्थावर झाल्यावर त्याने अजयशी गप्पा करायला सुरुवात केली..पण
मध्ये असणाऱ्या कंट्रोल पॅनल मुळे ते एकमेकांना बघू शकत नव्हते.
आणि आज अजय अगदी बेताचेच बोलत होता …हे पण त्याला कुठेतरी जाणवले …कारण बरेचदा त्यांची सोबत ड्युटी लागायची …त्यामुळे ते एकमेकांचे चांगले मित्र झाले होते …त्यामुळे एकमेकांच्या सवयी बद्दलही चांगलेच परिचित पण होते …

बराच वेळ झाला आता गाडी विळद च्या घाटात होती. सिग्नल दिसण्यात अडचण होती.म्हणून तो जरा सावध झाला..त्याने अजयला तशी सुचना केली पण
अजय आज फारसा बोलत नव्हता … पण काम योग्य करत होता.
इतक्यात, अजय त्याची जागा सोडून उस्मान जवळ आला.
उस्मान ला त्याचा रागरंग जरा वेगळाच वाटला
त्याने सांगितले की
पुढे रूळाची प्लेट निखळली आहे. त्यामुळे खूप मोठा अपघात होईल आणी शेकडो लोकांचे प्राण जातील…कदाचित तूझे सुद्धा….
म्हणून ताबडतोब गाडी थांबव.
उस्मान ला वाटले की तो गंमत करत आहे. कारण त्याला हे त्यात्याबरोबरच गाडीत बसून कसे कळाले.
त्याने साफ दुर्लक्ष केले
तसा अजयने जरा आवाज चढवला आणि जोरात उस्मान ला म्हणाला ..
कि …जर …..
मला ब्रेक लावणं शक्य असते तर मीच गाडी थांबवली असती.

पण आता तू लगेच थांबव.
उस्मान ने अगदी नाईलाजानेच गाडी थांबवली. …गाडी पण नेमकी अगदी….रूळ जिथे तूटला होता तिथेच थांबली
दोघे खाली उतरले. …आणि ….खूप मोठ्या अपघातातून आपण आणि सर्व प्रवासी वाचलो आहोत ..याची जाणिव उस्मान ला झाली.

एव्हाना गाडी अशी अचानक मध्येच थांबल्यामुळे बरेच प्रवासी गाडीतून उतरून तिथे गोळा झाले होते…. सगळेच वाचलेल्या संकटामुळे दिग्मूढ झाले होते…

उस्मान अजय ला मिठी मारणार….तसा तो मागे सरकन् मागे सरकला हे उस्मान ला जाणवले ..काय झाले हे उस्मानला कळाले नाही. तो इकडे तिकडे बघत होता. पण गर्दीत अजय दिसत नव्हता…..

एवढ्यात देहरे स्टेशन चा कॅबिनमन गौतम कांबळे धावत येताना त्याला दिसला.
उस्मान त्याच्या जवळ गेला. आणि खुणेनंच तुटलेले रूळ त्याला दाखवले.
ते पाहून तो मटकन खालीच बसला.
त्याच्या तोंडून शब्दही निघत नव्हता..
खूप मोठ्या संकटातून आपण सगळेच वाचलो आहोत ..असे उस्मान त्याला सांगत होता …
आणि हे सगळे अजय मुळे झाले …त्याने जर आज गाडी थांबवायला सांगितले नसते तर …..?
काय ..? अजयचे नाव ऐकताच ..कांबळेंना दरदरून घाम फुटला …आणि
तो कसेबसे इतकेच म्हणाला….. उस्मान…..अजय शिंदे रात्रीच हार्ट अटॅकने गेला……..
तूझ्या बरोबर कोण होते।

…..वैशाली जोशी खोडवे…

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!