७ कुणी तरी आहे तिथं -भयकथा
७ कुणी तरी आहे तिथं -भयकथा

७ कुणी तरी आहे तिथं -भयकथा

आता मात्र प्रज्ञाला खात्री झाली की नक्कीच कोणीतरी आहे बाहेर ..
प्रज्ञा-(घाबरून)कोण आहे तिथं..? मयंकला का बोलावताय ?
प्रज्ञा एवढं बोलून थांबली जेणे करून तिला समोरून प्रतीउत्तर मिळेल पण त्या ऐवजी एक भयाण शांतता पसरली.
प्रज्ञा -(घाबरतच ओरडून) कोण आहे…कोण आहे बाहेर ?

एकच शांतता.फक्त रात किड्यांचा कर्रर्रर्रर्रर्रकश् श् आवाज ऐकू येत होता. आता मात्र प्रज्ञा रडायला लागली.
प्रज्ञाचा भितीने थरथर कापत होती.त्यात ती साडीचा पदर तोंडावर दाबून ठेवत हुंदके देऊन रडू लागली जेणे करून मयंकला तिच्या रडण्याने जाग येऊ नये म्हणून.आता खोलीतील त्या काळोखासोबत ती भयाण शांतता तिला खायला उठली

तेवढ्यात टाळ्यांचा आवाज आणि त्यासोबत बांगड्या वाजण्याचा आवाज प्रज्ञाला ऐकू येतो.हे दोन्ही आवाज तिला नव्याने ऐकू येतात..तशी ती जास्तच घाबरते.त्यात भर पडते घुंगरांची.कुणी तरी सारखे पाय आपटत त्या घुगंरांचा आवाज करत तिच्या खोलीकडे चालत येत आहे असे तिला जाणवते.
हे सर्व आवाज कशी आणि कुठून येताय ?हे आवाजांचे मला होणारे भासच आहे की खरचं कुणी तरी आहे बाहेर.या विचाराने प्रज्ञाला भीती जरी वाटत होती तरी एक मन म्हणत होते की एकदा तरी बाहेर जाऊन बघावे की कोण आहे?हा विचार प्रज्ञाच्या मनात यावा तशी पुन्हा थंडगार हवा खोलीत शिरली.पहिल्या वेळेपेक्षा ह्यावेळी थंड हवेचा जोर तीव्र असतो.

जणू काही ती थंड हवा प्रज्ञाला ओढत बाहेर नेण्यासाठी आत शिरली असावी.तशी प्रज्ञा जागेवरून उठली.आणि तिची पाऊले आपोआपच खोलबाहेरील दिशेने चालायला लागले.खोलीचा दरवाजा कसा व केव्हा उघडला ह्याकडे तिचे मूळी लक्षच नव्हते.प्रज्ञा फक्त एका रोबोटप्रमाणे चालत होती.आता खोली सोडून ती शेजारील हाँलमधे आली .

हाँलचा ही दरवाजा उघडाच होता.ती हाँलला सोडत बाहेर वाड्यात येते.वाड्यातील तसेच रस्त्यावरील सगळी लाईट्स् बंद असतात.काळ्या रंगाने माखलेली ती रात्र एक भयानक आणि राक्षसी रूप दाखवत होती.पण प्रज्ञा जराही न घाबरता तशीच स्तब्ध उभी राहली..मान उजवी कडून वळवून डावी कडे नेत कोणी दिसतय का हे बघू लागली.तितक्यात शूक…..शूक…शूक…शूक…आवाज प्रज्ञाच्या कानावर पडला….
जसा शूक..शूक..शूक..शूक हा आवाज तिच्या कानावर पडतो..

तशी प्रज्ञाची नजर आवाजाची दिशा शोधू लागते.तोच लागोपाठ टाळ्यांचा आवाज येतो.पहिल्या आवाजापेक्षा टाळ्यांचा आवाज अगदी स्पष्ट व जोरात आल्याने प्रज्ञा मान वर करून बघते..शेजारील बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर एका आकृतीची पाठमोरी सावली तिला दिसते.तिला पाहताच प्रज्ञाचे घाबरणे आपोआपच थांबले. प्रज्ञाने आता तिची नजर त्या आकृतीच्या सावलीकडे रोखून धरते जेणे करून ती नजरेआड होणार नाही..
तेवढ्यात बांगड्या वाजल्या.त्यामुळे प्रज्ञाची आकृतीकडे रोखून ठेवलेली नजर क्षणात विचलित झाली.
हवेत गारवा असतांनाही प्रज्ञाला दरदरून घाम आला.प्रज्ञाने पुन्हा वर बघितले तर ती आकृती आता तिथे नव्हती…तिथून ती नाहीशी होते.प्रज्ञाची अस्वस्थता वाढते.तिला स्वतःला भानावर आल्यासारखे जाणवते.पदराने चेहऱ्यावरचा घाम टिपत ती घरात माघारी जाण्यासाठी वळते.तोच घूंगरांचा छम् छम् छम् छम् आवाज येतो.तो घूंगरांचा आवाज कर्रर्रर्रर्रकश्य असतो.प्रज्ञा घरात न जाता आपोआपच शेजारील बंद बिल्डिंगकडे त्या घूंगरांच्या आवाजाच्या दिशेने चालू लागते.

ती नजर इकडे तिकडे न करता.फक्त चालत जाते.एव्हाना वाडा ओलांडून ती बिल्डिंगच्या कंपाऊन्ड मध्ये शिरते.बंद बिल्डिंग उघडलेली असते..प्रज्ञा कुठेच न थांबत फक्त चालत राहते.जणू काही एखादी अदृश्य शक्ती तिला खेचून वर नेत असते.बिल्डिंगमध्ये इतका काळोख असूनदेखील प्रज्ञाची पावले सूरळीत पडत होती.

प्रज्ञा जसजशी पाचव्या मजल्याकडे घूंगराच्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली तसतसा आवाजाचा जोर ओसरत होता.प्रज्ञा पाचव्या मजल्यावर जिथे बिल्डिंगची गच्ची असते तिथे पोहचते.जसा ती उंबरठा ओलांडते.तशी धाड्कन खाली पडते.
गच्चीवर सर्वत्र अंधारच अंधार असतो.प्रज्ञा स्वतःला सावरत उठून उभी राहते.तिची नजर सर्वीकडे भिरभिरायला लागते.कसला तरी शोध घेऊ लागते .त्या काळ्याकुट्ट अंधारात तिला काहीच दिसत नाही.
प्रज्ञा स्वतःशीच पुटपुटते..मी कशी आली इथे कोणी आहे का ?
तेवढ्यात तिला कुणीतरी स्पर्श करून पुढे पळत गेल्यासारखे जाणवते.तशी ती हादरते.पुन्हा..
प्रज्ञा -कुणी आहे का..इथं ??
तितक्यात प्रज्ञाला तिच्या मागून तिचा साडीचा पदर कोणीतरी खेचतोय असे वाटतेे..तशी झटकन् प्रज्ञा आपला पदर आवरयाला जाते..तोच पदराला जोरात ताणत ती अदृश्य शक्ती प्रज्ञाला खाली पाडते….प्रज्ञा जोरात गच्चीवरील भिंतीवर आदळत खाली पडते….प्रज्ञाच्या डोक्यामधून रक्ताची धार एखाद्या कारंज्याप्रमाणे उडून बाहेर येते..

.तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर रक्ताचा शिडकावा होतो..तशी प्रज्ञा खूप घाबरते,,रडायला लागते.कशीतरी स्वतःला सावरत पुन्हा उठते आणि इथून बाहेर कसे निघता येइल ते बघत चालू लागते.तेवढ्यात जोरजोरात घूरघूरायचा कर्रर्रर्रर्रर्रर्रकश्य आवाज तिच्या कानावर पडतो.प्रज्ञा जीव मुठीत घेऊन मागे वळून बघते तर..एक भयानक दृश्य नजरेस पडते.तिच्या मयंकच्याच वयाची एक मुलगी गच्चीच्या त्या अरूंद कठड्यावर आडवी झोपलेली असते.

तिचे लांबसडक काळेभोर केस तिच्या चेहऱ्यावरून खाली लोंबकाळत असतात.दोन्ही पायात जाड घुंगरांचे अनेक वेढे असतात..आडवे झोपूनच ती तिचा एक पाय दुसऱ्या पायावर आपटत घुंगरांचा आवाज करत असते.तिचे ते विचित्र कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रकश्य गुरगुरण्याचा आवाज आणि घूंगरांचा आवाज एकमेकांना समांतर जात होता……

क्रमशः

पोर्णिमा शिंपी
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर पाठवू शकता.

आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी शब्दपर्ण पेज जरुर follow  करा.

https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!