शोध-पोलीसकथा
शोध-पोलीसकथा

शोध-पोलीसकथा

शोध-पोलीसकथा

वैशाली जोशी खोडवे

 

अमरावतीचे विभागीय आयुक्त कैलास देशपांडे यांची दोन महिन्या न्यापूर्वी पुण्याला विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली होती.
एक कार्यक्षम आणि जनतेच्या अडचणी तत्परतेने सोडवणारे अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. अगदी साधी बस जरी बंद पडलेली दिसली तरी ते लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून प्रवाशांची दुसरी व्यवस्था करून देत व मगच पुढे जात
पुण्यात आल्यापासून त्यांचा वर्गमित्र राजेश त्यांना घरी बोलवत होता. राजेश एका खाजगी कंपनीत आधिकारी होता. शेवटी त्याच्या कडे जाण्याचा एकदाचा मुहूर्त ठरला. आणि त्यादिवशी संध्याकाळी कैलास त्याच्या सौं सह राजेश च्या घरी आला. चहापाणी, खाणेपिणे आणि गमती जमतीं अगदी ओसंडून वहात होत्या.
तेवढ्यात शेजारच्या भिडेंकडे मोठ्याने रडण्याचा आवाज आला. राजेश व कैलास तिकडे धावले. अवधूत व कल्पना हे तरूण जोडपे त्यांच्या शेजारी रहात होते. कल्पना खूप रडत होती, आणि अवधूत खूप टेन्शन मधे होता व फोनाफोनी करत होता.
राजेश ने विचारल्यावर त्यांना कळाले की त्यांची सहा महिन्याची मुलगी दिपा गायब झाली आहे. बरीच शोधाशोध करून ही सापडली नाही.
एव्हाना सगळी सोसायटी तिथे गोळा झाली होती.प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोध घेऊ लागला होता.पण व्यर्थ. राजेश ने कैलास यांची ओळख करून दिली. आणि त्याला काही करता येईल का असे विचारले. अवधूत, कल्पना तर अगदी गयावया करू लागले. तसे कैलास म्हणाला की तुम्ही शांत व्हा, मी सुत्रे हलवतो, mean while तुम्ही एक nominal complaint लिहून माझ्याकडे द्या
आणि त्यांनी पोलीस आयुक्तांना फोन लावला….शिंदे साहेब मी एके ठिकाणी आलो आहे, आणि ईथे एक सहा महिन्यांचे बाळ बेपत्ता आहे, अजून गोल्डन अवर गेलेला नाही, जर आपली यंत्रणा कार्यान्वित केली तर, निश्चितच आपण बाळ शोधू शकू . देशपांडेंचा लौकिक शिंदेना चांगलाच माहित होता.त्यामुळे त्यांनी लगेच ते आव्हान स्वीकारले. आणि लगेच ते आपले काही अधिकारी घेऊन सोसायटीत दाखल झाले, व अवधूत कल्पनाला धीर दिला.म्हणाले आमची दोन हजार पोलिसांची फौज रस्यावर उतरली आहे, शहराचा इंच न इंच शोधतो, बाळ नक्कीच सापडेल.
मग देशपांडे, शिंदे, आणि ईतर दोन निष्णात अधिकारी planning करू लागले.

सर्व मार्शल, पोलिस, RTO ला सूचना गेल्या. जास्त लक्ष 6 किलोमीटर च्या परीसरात दिले गेले.पुण्या बाहेर जाणारे सगळ्या रस्त्यांवर नाकाबंदी केली गेली जे कोणी लहान बाळ दिसेल त्याचा LIVE VIDEO ह्यांना दाखवण्याची व्यवस्था केली गेली त्याकामी सोसायटीतील IT /COMPUTER च्या विद्यार्थांची मदत घेतली गेली.
आता जणू त्यांची WAR ROOM च अवधूत च्या घरी सूरू झाली होती. 15 मोबाईल वर वेगवेगळ्या ठिकाणांहून शेअर केले जाणारे VIDEO अवधूत कल्पनाला दाखवण्यात येत होते. एव्हाना तास उलटून गेला होता. टेन्शन वाढत होते. सगळ्या सरकारी यंत्रणेची इभ्रत पणाला लागली होती. देशपांडेनी आता तपास आणखी कडक केला, प्रत्येक घरात जाऊन विचारणा करण्यास सांगितले…..VIDEO शेअर होतच होते.
आणि अचानक कल्पनाला एका VIDEO मधे ती ओझरती दिसल्यासारखी वाटली.ती एकदम ओरडली, पण लगेच म्हणाली मी शुअर नाही पण ती दिपाच असण्याची दाट शक्यता आहे. कैलास म्हणाले हरकत नाही…..शिंदे आणि त्यांनी पुढचे Planning सुरू केले. ते बाळ एका मोटारसायकल वर जात होते. आजूबाजूचे 4,5 मार्शल त्या रोडवर बोलावले. त्यांनी आपले कॅमेरे चालू करून त्या मोटारसायकल स्वरांना शंका येणार नाही अशारितीने त्यांच्या आसपास गाडी चालवू लागले.जेणे करून जास्त clear video शेअर करता येईल.
ते video पाहून कल्पनाने ती दिपाच असल्याचे confirm केले.
आता बाळ spot झाले होते. पण घाईगडबडीत काही करून उपयोग नव्हता. बाळाला इजा दगाफटका होऊ शकला असता.

आता देशपांडे आणि शिंदे यांनी सूचना द्यायला सुरवात केली…स्टेशन वॅगन ….target पासून अर्धा किलोमीटर अंतर मेंटेन करा….तेथीलच एका डॉक्टरना पोलीसा करवी बोलणे करून स्टेशन वॅगन मधे घेतले होते.
2 महिला काॅन्स्टेबल…तूम्ही target पासून 2 k.m अंतरावर थांबा….

दोन निष्णात biker असलेले मार्शल….तूम्ही आता target ला हळूहळू काॅर्नर करा….बाळ गाडीवरून पडू शकते हे लक्षात घ्या,व सावधगिरी बाळगून महिला काॅन्स्टेबल पाशी त्यांची मोटारसायकल आडवा…..काॅन्स्टेबल तूम्ही फक्त बाळ ताब्यात घ्या….पडू देऊ नका…
स्टेशन वॅगन पटकन पुढे या…..बाळ आत घ्या… लगेच उलट फिरा…….तूम्हाला green channel आहे….डॉक्टर बाळाची तपासणी करा….काही ईजा आहे का….नाही..
Good ……आता सोसायटीत या…..

मार्शल…त्या दोघांना ताब्यात घ्या….शिंदे साहेब….आता तूम्ही तुमच्या पद्धतीने त्यांचा समाचार घ्या….

काही वेळातच स्टेशन वॅगन सोसायटीत आली….सगळ्यांनी एकच जल्लोष केला अवघ्या एक तास पंचेचाळीस मिनिटात बाळ आईच्या कुशीत विसावले होते.
सगळे देशपांडे व शिंदे यांना धन्यवाद देत होते

देशपांडेनी सर्व team ला दुसऱ्या दिवशी आयुक्तालयात बोलावले….अवधूत कल्पना म्हणाले आम्ही ही येतो…व एक फूल ना फुलाची पाकळी म्हणून..सर्वाना…एक भेट देऊ इच्छितो…तसेच सर्वासाठी आम्ही एक भोजन समारंभ सोसायटीत आयोजित करतो.

एक कार्यक्षम अधिकारी, आणि सरकारी यंत्रणा काय करू शकते ते समजून सगळेच अवाक्‌ झाले होते…..

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!