marathi revenge story सूड
marathi revenge story सूड

marathi revenge story सूड

रामपुर छोटे खेडे..सर्वत्र हिरवीगार शेते. गावाच्या बाजूला दुधळी भरून वाहणारी सुंदर नदी.
हीरा गावातील छोटासा शेतकरी …घरी फार शेती नव्हती पण मेहनत करून आंनदी जगायचे.हीरा विचाराने प्रगत होता.गावात दहावीपर्यंत शाळा भरायची नंतर शिकायला शहरात जावे लागायचे.गावापासून दोन किलोमीटर पायी जावे लागायचे. मध्ये नदी लागायची.नदीवर पुल बांधून होता.हीराला दोन मुली मोठी चंदा आणि लहान बेला.बेला खोडकर बडबडी दिसायला सुंदर.

चंदा दहावी पास झाली.शहरात काॕलेजमध्ये जाऊ लागली.गावातील लोकांनी खूप नावे ठेवली. गावात दहावी झाली आणि लग्न लावून दिले…अशीच प्रथा होती .पण हीराला शिक्षणाचे महत्त्व कळत होते.चंदा पेक्षा बेला पाच वर्षांनी लहान.आईप्रमाने चंदा बहिणीचे करायची.तिचे खाणे…. तयारी करणे…
अभ्यास सर्व चंदाकडे असायचे.दोघी सोबतच रहायच्या
हीरा नेहमी म्हणायचा..तुम्हाला एकाच घरात द्यावे लागेल बाबा.. या बेलाला चंदाशिवाय कुणी सांभाळून घेऊ शकणार नाही …माझी चंदा खूप शांत समजदार आहे सासरशी लवकरच जुळवून घेईल ती… पण बेलाचे काही खरे नाही असे म्हणून सर्व जोरात हसायचे.बेलाला तर राग येत होता पण नंतर ती पण हसायची.

गावातील जमीनदाराचा मुलगा राघव चंदाच्या मागे लागायचा.रोज पुलावर तिची वाट बघत बसायचा.पण चंदा त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जायची.हळूहळू गावात ही गोष्ट पसरली.खेडेगाव ते गावात चर्चा होऊ लागली.
आई तर खूपच घाबरली.बस झाले तिचे शिक्षण. आता लग्न करू तिचे.तरूण मुलगी , काही कमी जास्त झाले तर चांगला मुलगा मिळणार नाही.यंदा मुले बघा तिच्यासाठी आईचे सुरू असायचे.

हीराने धीराने काम घेतले.तो सोबत जायचा आणि सोबत वापस यायचा.राघवचे मागे लागणे बंद झाले.चंदाचे काॕलेजचे शिक्षण पूर्ण झाले. आता मुले बघणे सुरू झाले
दिसायला सुंदर..चांगले शिक्षण , मुलांची रीघ लागली.सर्वांना साकेत आवडला सरकारी नोकरी..काही कमी नव्हते.स्वभाव शांत सालस गावातील सर्व जण त्याच्या स्वभावाची ग्वाही देत होते.लग्न जमले तसे त्याचे येणे सुरू झाले.बेलाची तर छान मैत्री झाली.
तिघे नदीवर फिरायला जायचे. ताई जाणार या कल्पनेने बेला दुःखी राहायची.बेला ताईसोबत तू पण येशील असे म्हणून साकेत चिडवायचा.लग्न थाटामाटात पार पडले.बेला ऐकटी पडली.सतत आईच्या मागे लागायची.

आई चल ग ताईकडे.
अग बेला नेहमी जाणे बरे नाही दिसत..आई म्हणायची .चंदा आल्यानंतर बेला खूप आंनदी दिसायची.काही दिवसात चंदा माहेरी आली.साकेत आला होता सोडायला.बाळ होणार म्हणून दोघेही आंनदात होते.साकेत निघून गेला.बेला खूष होती.मध्ये साकेत आला.दिवस भरत आले होते.डाॕक्टरकडे जायचे म्हणून दोघे गेले.पावसाळ्याचे दिवस होते.नदीला भरपूर पाणी असायचे पावसाळ्यात. बेला वाट बघत होती

..आई अग किती वेळ करत आहे ताई आणि भाऊजी

.येतील ग बाई..गर्दी असेल दवाखान्यात.

तेवढयात गावात एकच गलका झाला. चंदा पाण्यात वाहत गेली.पुलावर पाणी बघत होती आणि तोल गेला. सर्व नदीवर गेले,साकेत ओक्साबोक्सी रडत होता.गाडी लांब उभी होती.बेला तर फक्त बघत होती.पोलिस आले.चौकशी सुरू झाली.साकेत उत्तर देण्याच्या परिस्थितीत नव्हता. पुलापासून गाडी लांब उभी होती.गाडी लांब ठेवण्याचे कारण पोलिस विचारत होते.
साहेब गाडी अचानक बंद पडली.मी बघत होतो.चंदा समोर गेली,पुलावरून पाणी बघत होती आणि अचानक आवाज आला मी धावत गेलो.ती दिसत नव्हती.नंतर वाहत जाताना दिसली मी उडी मारली तो पर्यत सर्व संपले होते.

चंदा आत्महत्या करू शकते काय? तिला काही त्रास होता का ?

पोलिस विचारीत होते. तसे काही नाही साहेब पोरगी खूप सुखात होती.जावई तर हीरा आहे आमचा.तुम्ही कोणालाही विचारा. पण राघव तिच्या मागे लागायचा.त्यानी तर लोटले नसेल..त्याचा राग होता चंदावर. राघवला चौकशी करिता बोलावले.मी खरेच चंदावर प्रेम करित होतो.पण मी तिला का मारू साहेब? राघवला खोदून…खोदून प्रश्न विचारले पण हाती काही लागले नाही.बेलाला तर आपली ताई पाण्यात पडू शकते यावर विश्वासच बसत नव्हता.ताई नेहमीच पाणी दुरून बघायची.तिला तशीही जपून राहण्याची सवय होती.
काय झाले असेल त्या दिवशी?ती खूपदा पुलावर गेली.आजूबाजूला शोध घेत फिरत राहायची.दिवस चालले होते.पोलिस पुरावा नसल्यामुळे शांत बसून बघत होते.साकेत आणि त्याच्या घरचे लोक सावरल्यासारखे दिसत होते.

बेलाच्या मनात सारखे वादळ सुरू राहायचे.ताईला कुणीतरी पाण्यात लोटले यावर ती ठाम होती.आई कोण असेल ग..ताईने कधी कुणाला दुखविले नाही..तिच्या सोबतच असे का घडले

राघव असेल का ?साकेत भाऊजींनी तर…नाही लोटले ताईला

आई जोरात ओरडली

अग काय बोलते हे .. देवमाणसे आहेत ती.ताईने कधी काही सांगितले नसते का? किती आंनदी होती चंदा
दिवस सरत होते.आणि एक दिवस साकेतचे आई..वडिल आले.त्यांनी साकेत करिता बेलाची मागणी केली.सर्व तयार झाले.बेलाही तयार झाली.लग्नाची तयारी सुरू झाली. साकेत खूपच खूष दिसत होता. चंदाला तर तो विसरून गेला होता.बेला राघववर लक्ष ठेवून होती. बेलाला कसेही करून शोध लावायचा होता.ती जुन्या गोष्टी आठवत राहायची आणि तिला होळीचा सण आठवला.रंग लावण्याचा बहाना करून साकेतनी केलेली जवळीक आठवली. तिला ते अजिबात आवडले नव्हते.पण गंमत म्हणून तिने ते सोडून दिले. मनावर नाही घेतले.

लग्न जवळ येऊ लागले.आणि अचानक बेलानी लग्न तोडल्याचा निरोप साकेतला कळविला.आई …वडिलांना काय करावे हे सुचत नव्हते. बेला नदीच्या पुलावर पुन्हा तेच बघत होती. साकेत रागात पुलावर बेलाला शोधत होता.बेला पाणी बघत होती.बेला लग्न का मोडले हे सांग साकेत ओरडला.रागात जोरजोराने बोलत होता .बेला तुला हे लग्न करावेच लागेल.तुला माहित आहे तू मला भेटावी म्हणून मी काय केले.या पुलावरून तुझ्या बहिणीला पाण्यात लोटले.मला फक्त तू पाहिजे.चंदा पाणी बघत होती मी हळूच आलो आणि धक्का दिला.ती पाण्यात पडली..मी बघत होतो..संशय येऊ नये म्हणून पाण्यात ऊडी मारली,..

असे का केले बेला विचारत होती.
तुझ्यासाठी केले हे सर्व. तुझ्याशी लग्न करायचे होते मला पण चंदा असेपर्यंत आपले लग्न शक्य नव्हते. बेलानी आवाज देताच लपून बसलेले पोलिस हजर झाले. साकेतला अटक झाली.तिचा संशय खरा ठरला.

ज्योती रामटेके

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!