marathi crime story- दूहेरी घात
marathi crime story- दूहेरी घात

marathi crime story- दूहेरी घात

लग्नानंतर परदेशी गेलेली सुखदा महिनाभरासाठी भारतात परतली.
यावेळी तिने सगळ्या मित्र मैत्रीणींना भेटण्याचे ठरवले.
आज मुक्ताची भेट ठरवली होती.
मध्यंतरी मुक्ताबद्दल तिला कळले होते.दोन वर्षापूर्वी मुक्ताचा नवरा अमल ट्रेकींग करतांना उंचावरुन खाली पडला.आणि  त्यातच तो गेला.
शाळेत नेहमी चेहऱ्यावर  खळाळतं हास्य असणारी,खूप  संवेदनशील असणारी मुक्ता.
असे कसे झाले तिच्या  आयुष्यात?
विचार करत सुखदा मुक्ताच्या घरी पोहचली.
मुक्ता बिल्डिंगच्या खालीच भेटली.
सोबत दोन मुलींना घेऊन होती.
अमल जाऊन वर्ष झाले होते.मुक्ता बऱ्यापैकी सावरली होती.
दोन मुली,मुक्ता,सुखदा  मुक्ताच्या घरी पोहचले.
मुक्ता तुझ्या दोन्ही लेकी सारख्याच दिसतात ग.
मुक्ताने दोन्ही मुलींना आतील खोलीत पाठवले.
एक माझी लेक मधुरा आणि  ती दुसरी मिठी.बाजूला राहायची अग.
दिड वर्षापूर्वीच तिची आई विभा गेली. विभा,माझी शेजारीण आणि मैत्रीण पण.इथे राहायला आली तेव्हा मिठी खूप  लहान होती.
ती नौकरी करायची.टूरवर गेली कि मिठीला मजजवळ ठेवून जायची,एकदा टूरवर गेली आणि  परतलीच नाही. शोधण्याचा खूप  प्रयत्न  केला.पण नाही कळले काहीच.
नातेवाईकांशीही तिचा काहीच सबंध नव्हता.
माझी सवय होतीच मिठीला.
अग पण किती मोठी जबाबदारी आहे ही.
हो ग.पण काय करणार? विभा आणि  ही दोघीच राहत होत्या घरी.अमल गेल्यावर विभाने मला खूप  सावरले. ती गेल्यावर खूप एकटी पडली मी.
दोघी बोलत असतांनाच मुली आई आई करत बाहेर आल्या.
बाकी कसं चाललयं मुक्ता?
अमलचे अचानक जाणे….
चाललयं ग.
तू एकटी किती दिवस राहणार? काही विचार केला का पुढचा?
सासर,माहेरचे मागे लागले लग्न कर म्हणून.पण नाही विसरु शकत अमलला.
अमलचाच मित्र  आहे शशांक घटस्फोटीत.आईबाबांना वाटतयं मी त्याच्याशी लग्न करावे.
आईबाबा बरोबर सांगताहेत मुक्ता.
नाही ग सुखदा.
अमल,त्याच्या आठवणी नाही दूर सारु शकत मी.
एवढा वेळ गप्पात गुंतलेल्या सुखदाचे लक्ष समोरच्या भिंतीवरील फोटोकडे गेले.अमलच असावा बहूतेक.
मुक्ता ,अग अमलला भाऊ आहे का?
नाही ग दोन बहीणींमध्ये  हा एकटाच होता.
का ग?
अग असाच दिसणारा माणूस माझ्या शेजारी राहायला आलेला.
नवीनच लग्न झालेले जोडपे आहे. मानस आणि  लतिका.
हो का?
असते कधी कधी साम्य
सुखदा वापस निघाली.
पण तिच्या डोक्यातून अमलचा फोटो  काही केल्या जात नव्हता.
वापस कॕनडाला जाण्यापूर्वी एकदा पुन्हा मुक्ताला भेटते.
सुखदा परत जाते.
मानस आणि लतिका-मराठी जोडपे म्हणून ओळख वाढली होती.एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरु झाले.
बोलता बोलता सुखदाने त्यांना मुक्ताबद्दल सांगितले.
तिचा नवरा अमल मानससारखाच दिसायचा असेही सांगितले.
आठएक दिवसानंतर मानस आणि लतिका ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेले.
सुखदाने शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही भेटले ते नंतर.
मानस आणि अमलमधील साम्य तिला आश्चर्यकारक वाटत होते.
सुखदाच्या वाढदिवसाला झालेल्या पार्टीत काढलेला मानसचा फोटो तिने मुक्ताला पाठवला.
बघ ग मुक्ता .किती साम्य आहे अमल आणि मानसमध्ये.
क्षणभर मुक्ताला तो अमलच वाटला.
पण कसे शक्य आहे?
असे म्हणून तिने तो विषय झटकून टाकण्याचा प्रयत्न केला.
सुखदाला मानसचा शोध घ्यायला सांगितले तिने.
सुखदा मी येऊ का ग कॕनडाला काही दिवस?
अमल जाण्याआधी आम्ही प्लॕन पण बनवला होता तिकडे फिरायला येण्याचा.
माझा आणि मधुराचा पासपोर्ट आहे.मिठीला आईकडे ठेवेन काही दिवस.
ये ग मुक्ता.त्यात विचारायचे काय?
मुक्ताने आॕफिसमध्ये सुट्या टाकल्या.मधुराला घेऊन ती सुखदाकडे गेली.
तिचा कॕनडात येण्याचा उद्देश केवळ मानसला भेटण्याचा होता.
पण त्याला शोधणार कसे?
तो जिथे नौकरी  करायचा तिथली नौकरीही त्याने सोडली होती.
पंधरा दिवस झाली.वीस दिवस झाली.मुक्ताला परतण्यापूर्वी अमलसारखा दिसणाऱ्या मानसला भेटायचे होते.
सुखदा ओळखीच्यांना मानसचा फोटो  दाखवून याला बघितले का विचारत होती.
शेवटी एका मैत्रीणीच्या नवऱ्याच्या आॕफिसमध्ये तो काम करतोय असे समजले.दुसऱ्याच दिवशी सुखदा आणि मुक्ता त्याला भेटायला जातात.
सोबत मैत्रीणीचा नवरा असतोच.
मानसला बघितल्याबरोबर मुक्ता किंचाळली
अमल
तिला बघून मानसच्या चेहऱ्यावर काहीही भाव उमटत नाही. तो विचारतो.
कोण अमल?
सुखदा-
Sorry मानस
अग मुक्ता हा मानस आहे.
Sorry,
मानस व्यवस्थित बोलतो तिच्याशी.
एक चेहरा सोडला तर त्याच्यात आणि अमलमध्ये काहीच साम्य मिळत नाही.त्याचे वागणे,बोलणे सगळेच अमलपेक्षा वेगळे होते.
दोघी परततात.
सुखदा मानसचा नंबर घेते.
मुक्ता मनातील शंका दूर करण्यासाठी एकदा पुन्हा मानसला भेटली.तिची खात्री पटली मानस फक्त अमलसारखा दिसतो याची.
तिचे परतायचे तीन चारच दिवस बाकी होते.
सुखदा, मानसच्या बायकोचा फोटो  नाही का ग तुजजवळ?
अग आहे ना.तुला मानसचा फोटो  क्राॕप करुन पाठवला मी.
थांब हं असे म्हणत तिच्या मोबाईलमधला लतिकेचा फोटो  तिने दाखवला.
फोटो बघून मुक्ता अवाक् झाली.म्हणजे विभा आणि  अमल…..एवढी फसवणूक? ती जोरात रडू लागली.
सुखदाच्याही सर्व प्रकार लक्षात आला.
अमल आणि  विभाने मिळून मुक्ताला फसवले होते.
विभा आणि  अमल टूरच्या निमित्ताने बाहेर असणे, मिठीला तिने मुक्ताची सवय लावणे,अमल गेल्यानंतर पाच सहा महिन्यात विभाचे गायब होणे, मिठीचे अमलला बाबा म्हणणे,तिचे मधुरासारखे दिसणे,म्हणजे मिठी अमलची मुलगी…सगळे मुक्ताच्या लक्षात आले.पण आता खूप  उशीर झाला होता……..
प्रिती.

4 Comments

  1. सौ. उषा शिरीष कुलकर्णी.

    वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे राहिले आणि खुपच राग आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!