२-अपराधी कोण?कोण असेल खुनी
२-अपराधी कोण?कोण असेल खुनी

२-अपराधी कोण?कोण असेल खुनी

२-अपराधी कोण?

कोण असेल खुनी

नंदा-महेंद्रच्या बांधकामावर काम करणाऱ्या बबनची ही नुकतीच वयात आलेली मुलगी.वडिलांना डब्बा पोहचवायला आली.महेंद्रची नजर तिच्यावर गेली….
नगराळेंनी नंदाला काही प्रश्न विचारले पण घाबरलेली ती काही बोलायला तयार नव्हती.
बबनचे काम बंद झाले होते,महेंद्रचा खून झाल्यापासून पोलिसही चौकशी करायला येत होते.नाना प्रश्न  विचारुन भंडावत होते.
सकृतदर्शनी तरी तारा आणि नंदाच्या घरच्यांचा खूनामध्ये हात आहे असे वाटत नव्हते. 
दोघेही वापस आले.
सर, काही वेगळेच प्रकरण वाटत आहे.खूनी अनुभवी वाटतो. आणि दोन्ही केसमध्ये अपराधातून सुटलेल्या व्यक्तीचीच हत्या झाली आहे.आणि  दोघांचाही अपराध बलात्काराचा होता.
उदय नगराळे-त्या तरुणींपैकी एखादीचा प्रेमी असेल का?
अजय भोसले-असू शकतो.
उदय नगराळे-पण सर,एवढ्या हूशारीने नाही करणार तो.
 भावनेने आंधळे झालेल्या माणसाचे डोके एवढ्या हूशारीने चालणार नाही.
ड्यूटी संपवून भोसले घरी आले. 
अजय भोसले आई,पत्नी सुधा आणि  मुलगी पिहूसोबत राहत होते. लहानपणीच अजयसरांचे वडील गेले.आईने अंगनवाडीत नौकरी करुन अजय भोसलेसरांचे शिक्षण केले.
गरीबीतुन पुढे आलेले अजय भोसलेसर गारिबांना मलृत करण्यास तत्पर राहत.
 पत्नी सुधा संगीत  शिक्षिका  होती.
 आणि  त्याःची एकुलती एक लेक 
पिहू B.Com च्या पहिल्या वर्षाला होती.भोसलेनी घरी येऊन रोजचाच प्रश्न विचारला.
सुधा पिहू कुठे आहे ग?
पिहू मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली.
बराच वेळ झाला.मी आणि आई तिचीच वाट बघत होतो आता.
फोन करुन बाघितला का?
हो.पण तिने उचलला नाही. 
अजय भोसले-वाढदिवसाच्या गोंधळात तिला रिंग ऐकू नसेल गेली.
सुधा-तिने तरी करायचा नं फोन.आजकालच्या मुली पण नं.घरचे वाट बघत असतील याचे भानच त्यांना राहत नाही.
भोसले-येईल ग.तुम्ही दोघी फारच काळजी  करता.
सुधा-आता पूर्वीसारखे वातावरण नाही राहले अजय.
मुलींना घरी यायला जरा वेळ झाला कि जीवाची घालमेल होते.
आई-आधीही  व्हायच्या ह्या गोष्टी पण आता वाढल्या.
भोसले-आई,अग माझ्यासारख्या अधिकाऱ्याच्या घरात ही परिस्थिती.बाकी लोकं कसे सांभाळत असतील मुलींना?
तेवढ्यात पिहू घरी आली.
सुधाचा जीवात जीव आला.
भोसलेसर-पिहू बेटा,उशीर होत असेल तर घरी फोन करत जा.आई,आजी काळजीत असतात.
sorry बाबा.मैत्रीणींच्या दंगामस्तीत विसरले मी फोन करायला.
सुधा- कमाल आहे पिहू तुझी.आम्ही इकडे तुझ्या  काळजीने बेजार आणि  तू सरळ विसरली म्हणून सांगत आहेस.
चुकले आई मी.
बरं असु दे सुधा यानंतर पिहू असे नाही करणार.
दोनच दिवसांनी पुन्हा एक खून झाला.तसाच.कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष सोडलेल्या व्यक्तीचा.
उदय नगराळे-सर,तपासाचा वेग वाढवावा लागेल.
भोसले-हो नगराळे.
सर,तुम्हाला नाही वाटत खून करणारी व्यक्ती एकच असेल असे.
नाही.
वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या व्यक्तींचे खून करणे हे एकाच व्यक्तीचे काम असेल असे वाटत नाही.
पण सर, त्या दिशेने तपास करायला काय हरकत आहे?
क्रमशः

पुढील भाग खालील लिंकवर

https://marathi.shabdaparna.in/३-अपराधी-कोण

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!