सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

प्रभाकरराव,विमलताई,चंदना,अपर्णा,अपूर्व यांचे कनिष्ट मध्यमवर्गीय कुटुंब.चंदना मोठी ..तिच्या लग्नाचे वेध घराला लागले…तिच्या लायक मुलगा मिळतो का…चंदनाचे आयुष्य पियुष सोबत कसे बदलत जाते…

 

१- सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

चंदना .. नावाप्रमाणेच चंदना सारखी शीतल कोमल..
पवित्र. बाबा तर नेहमीच आईला म्हणायचे आपल्या नावाचे सार्थक केले पोरीने. अभ्यासात हुशार. घरकामात तरबेज. बारावीत चांगले गुण मिळाले. मेडीकलला नंबर लागला पण आपण तिला पाठवले नाही. तिचा असा भोळा
भाबळा स्वभाव. कुणावरही लवकर विश्वास ठेवणारी, भीती वाटत होती.कोणी तिला फसवेल का? जाळ्यात अडकवेल का? काय.. काय विचार येत होते. आपली मनस्थिती बघून
चंदनाने पाऊल मागे घेतले. ठीक आहे बाबा,मी इथेच शिकते म्हणून किती समजदारी दाखविली .

हो..न.. आपली चंदना आहेच समजदार. तुमच्या सारखी मलाही तिची काळजी वाटते. आता लग्नाचे वय झाले.
मला तर तिला दूर पाठवायची इच्छा होत नाही. मला काय वाटते आपण तिच्यासाठी जवळपासचा मुलगा बघू. म्हणजे आपले लक्ष राहील. काल माझ़्या मावस भावाचा फोन आला होता. चंदनाबद्दल विचारत होता. त्याच्या शेजारी एक मुलगा आहे. बॅकेत काम करतो. मी तर नकार कळवला.दिल्ली किती लांब आहे नं.
दोन.. दोन वर्ष. लवकर भेट होत नाही दूर असले तर.

आपली अपर्णा बरी आहे बिनधास्त, मनमौजी..
दोघी बहिणी किती वेगवेगळ्या. लग्नानंतर पाच वर्षांनंतर चंदना झाली.

तिचे जरा अतीलाड झाले. नंतर अपर्णा झाली. ती लहानपणापासून बंड प्रवृत्तीची. आपल्या मनाने करणारी.
चंदना साध्या.. साध्या गोष्टी विचारुन करते.या जगात अशी मुलगी शोधून सापडणार नाही. तिला आपण बाहेर गावी पाठवायला हवे होते,बाहेरचे जग कळले असते तिला.
जाऊ द्या आता.. छानच होईल तिचे,घर समजून घेणारे असावे. आपली चंदना कशातही आंनद शोधणारी आहे.
देवा चंदनाला तिच्या मनासारखे घर मिळू दे.

आई भूक लागली, अपर्णाने आवाज दिला.
अग हो.. दादाला येऊ दे.तो आला कि करते पोळ्या.
जाऊ दे.. ताईला करुन मागते पोळ्या. तिच्या पोळ्या किती मऊसुत असतात. माझ्या मैत्रिणी तर भांडतात ताईच्या हातची पोळी खायला.
तू शिकून घे अपर्णा ताईसारख्या पोळ्या. आई बोलली.
मी नाही शिकणार पोळ्या. एक दिवस बनवल्या तर दादानी हात नाही लावला.. शेवटी ताईने पोळ्या करुन दिल्या त्याला, आणि वरुन म्हणतो कसा पोळ्या असाव्या तर अशा.

 

हे घे पोळी चंदनाने जेवणाचे ताट दिले हातात.
अपर्णा जेव आरामात.
अपर्णा जेवत होती, तेवढ्यात सुमन काकु आल्या.
या बसा काकु चंदनाने खुर्ची सरकवली.
काकु जेवण करा नं थोडे.. मी पोळ्या करतच आहे.
दे एक पोळी. सकाळी न जेवता निघाली. नमु गेली काॕलेजला. तिचे ती करुन जाते. मला बचत गटाची कामे असतात. फिरावे लागते इकडे.. तिकडे..
सुमन काकु जेवायला बसल्या. चंदना गरम पोळ्या वाढत होती.
चंदना काय अप्रतिम पोळ्या बनवते ग. अगदी तुझ्या आईसारख्या.पण आता पुरे चांगल्या तीन पोळ्या खाल्ल्या मी.थोडावेळ थांबून सुमनकाकु निघून गेल्या.
आई ,आपल्या घरी येते वेळी सुमन काकु उपाशीच येतात का ग?अपर्णा हसायला लागली.

चंदना-अपर्णा .. अग असे बोलू नये. सकाळी त्यांना नसेल वेळ मिळत जेवायला.आपल्या आईलाही दिवसभर उंसत नसते. सुमन काकु घरचे करुन निघतात.
घाई होत असेल त्यांना.

अपर्णा-हो..ग ताई तुझे बरोबर आहे पण नेहमीच त्यांचे असे आहे.
मला नाही जमत बाई तुझ्या सारखे.बघ आता आठ दिवस झाले कि तयार आहेत त्या, हाच रस्ता आहे त्यांचा. त्या घरी काम करत नाहीत.त्यांची मुलेच कामे करतात असे त्याच सांगत होत्या.स्वयंपाकही मुलेच बनवत असणार.म्हणूनच काकु उपाशी येतात.

क्रमशः

चंदनाचे लग्न कुणासोबत होते….ती लग्नानंतर सुखी होते कि आई-वडिलांची काळजी वाढते…वाचत रहा….

https://marathi.shabdaparna.in/२-सुन्य

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!