१०आभास हा छळतो मला-मराठी कथामालिका
१०आभास हा छळतो मला-मराठी कथामालिका

१०आभास हा छळतो मला-मराठी कथामालिका




. एक दोन तीन……आठ दिवस गेले. एकही दिवस मानस त्यांना दिसला नाही
मानसला आपला डाव लक्षात तर नसेल आला संपदा?
शाश्वततने विचारले.
 नाही रे आपण कुणाला दिसलो नसणार.पण नक्की काही कळत नाही आहे.
 आठ दिवसांनी संपदाआणि शाश्वत घरी आले सुखदाच्या पाठोपाठच.
संपदाने विचारले,
 सुखा एवढ्यात भेटला नाही नं मानस.




 भेटलो कि.परवा भेटलो आणि आताही मी त्याला  भेटूनच येत आहे.
शाश्वत आणि  संपदा अवाक् होऊन सुखदाकडे बघायला लागले.
सुखा खोटी कशाला….शाश्वतने डोळ्याने इशारा करुन संपदाला थांबविले.
दोघांनीही आईबाबांना यातील काहीही सांगितले नाही. दोघे घरी वापस गेले.
संपदा–मानसच खरा बोलत होता शाश्वत.
शाश्वत.- हो ग.पण सुखदा अशी का वागत आहे?
संपदा- मला आता जास्त काळजी वाटतेय रे सुखाची.
असे म्हणून संपदा रडायला लागली.आजवर हिमतीने वागणारी संपदा आज मात्र हतबल  झाली होती.
शाश्वत तिला भूत लागले नसेल ना?आई पण असेच म्हणत होती.
 संपदा वेडी आहेस का? काहीही बोलतेस.बघू काय करायचे ते.अशी तुच हार मानली तर आईबाबांना धीर कोण देणार आणि सुखाला कोण सांभाळणार?




शाश्वत आणि संपदा आता काय करायचे याच संभ्रमात होते. सुखदाचे प्रेम एकतर्फी आहे. हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले होते.सुखदाला समजवायचे प्रयत्न केले दोघांनी पण सुखदा आभासातून बाहेर यायला तयार नव्हती. संपदाला सुखदाचा रागही येत होता आणि  कीवही येत होती.
आता सुखदा जास्तीत जास्त एकटी राहायला लागली.ती,मानस आणि आभासी स्वप्ने.
मनोहरराव आणि  वसुधाताई सुखदामुळे जास्त थकले होते.दोघांची तब्येत सुखदाच्या काळजीपायी वारंवार बिघडत होती.
संपदा सुखदाला भेटायला यायची अधेमधे. मानसबद्दल काही विचारले तर सुखदा नेहमीसारखेच चित्र रंगवून सांगायची.
ताई बघ ना हे माझे पाठमोरे चित्र.मानसने काढले. मस्त ना.हं थोडे जास्त शृंगारीक झालेय पण मानसला अशीच पोज हवी होती.
ही साडी मानसनेच दिली होती.हिरवी जर्द. माझा हा आवडता रंग आहे.मानसला माहीत आहे .
 संपदाला सगळे ऐकतांना चीडही यायची आहेत दयाही यायची.
सुखदाच्या मनाची तडफड कळत होती तिला.
आॕफिसमध्ये  सुखदाचे काम चोख होते पण ती कुणाशीही बोलायची नाही.आधीची हसतखेळत असणारी सुखदा पार बदलली होती. जवळ कुणालाही फटकू देत नव्हती. आॕफिसमधील सर्वच सहकारी तिला दुरावले.एकटी पडली होती सुखदा.तिला एकटेपणाच आवडत होता.
मध्येमध्ये मानसच्या चित्रांचे प्रदर्शन असले तर ते बघायला जायची. प्रदर्शनात मानसला तिची नजर भिरभिर  शोधत राहायची. घरी आता सर्वांचा संयम सुटत चालला होता. घराला  अनोळखी असलेल्या मानसने त्या हसत्याखेळत्या घराचे घरपण संपवले होते.
क्रमशः
पुढील भागाची लिंक

https://marathi.shabdaparna.in/११आभास

प्रिती गजभिये
(प्रिय वाचक,लेखक तुम्हीही तुमचे लिखाण पाठवत रहा)

2 Comments

  1. Nirmala Mendhe

    विषय खूपच खास आहे. अशा अवस्थेतील तरुण-तरुणींना मार्गदर्शक ठरणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!