आनलाईनचा वर्ग सुरू हाये…
अरे तो परशा कुठं गेला ? गन्या बी नाई दिसुन रायला.
गुरूजी … काय रे पोट्ट्या…
ते दोघबी मले त्या वावरात दिसले…विहीरीवर बसुन होते.
विहीरीवर?बापा त्या विहीरीवर कायला गेले हे पोट्टे.
दोघ बी नीरा वाया गेले.. अभ्यास कराच्या नावान बोंब हाये दोघाची..
थांब आता .. त्या गन्याच्या घरीच जातो मी..पायतोच काय दीवे लावुन रायला त..घरी त्याची आजी असन..
आजी…आजी… कोन होय बापा..
अव आजी मी मास्तर होय…
बापा डाॕक्टर कायला आला व.. म्या त दोनी लसी घेतल्या बापा.. आठ दीस तापान फनफनली हुती..
काय कराव बापा बुढीले नीरा कमी आयकु येते
अव आजी मी गायतोंडे मास्तर होय… गन्या कुठसा हाये
शाळेत येऊन नाई रायला दोन दिस झाले ..
काय करू बापा मले लयच कमी दिसते अन आयकु कमी येते.रातच्याले त नीरा कमी दिसते मले…झावर… झावर दिसते… त्या सिरेला आहे भलकशा टी वी वर त्या सबन पायतो मी .. डोये फाडुन पहा लागते.. त्यायच्या साड्याचे रंग नाई दिसत बराबर …पन त्यायचे दाग दागीने लय चमचम करत्यात.
आजी गन्या कुठ हाये .. अन त्याचा जीगरी दोस्त परशा आनलाईन कलासले नाई येऊन रायले..
बापा बापा… हे त लयच झाली आता.. बचतगटाच कर्ज काढुन त्याले ते डबर घेऊन दिल… म्हने कसा मला भारीचा पाईजे.. आता म्हने त्याच्यावर अभ्यास करा लागते..
त्याच्या गावात चांगली शाळा नाई म्हणून त्याले इथ टाकल अन हे पोट्ट अस करून रायल.
तीन.. चार दिवसाच्या आंदी परशा आल होत.. फटफटी घेऊन आल होत… कोन्या दोस्ताची आनली म्हने..डोयाले काया रंगाचा चष्मा होता.. म्या म्हटल त्याले त म्हनते कसा.. अव आजी याले गाॕगल म्हनत्यात..
दोघ बी फटफटीवर बसले अन गेले. हा त्यायचा खेळ चार पाच दीस सुरू होता.. मंग एक दिवस परशा आला हुता ..सार थोबाड सुजुन होत..
आजी पोरीच्या नांदी लागले काय हे पोर…
मीराच्या नांदी…नाई गुरीजी.
अव आजी मीराच्या नाई …पोरीच्या… काय कराव बापा..जीव सारा वैतागला… चला रे विहीरीवर आज परशा अन गन्याले सुतवतोच चांगला …
ते पा गुरूजी … परशा अन गन्या.
काय झाल रे तुमाले.. अन परशाच थोबाड कोन सुजवल.
त्याले मारले त्या मंगुदादान ..गन्या भित..भित सांगुन रायला.
काऊन मारल..?
त्याचि गाडी अन गाॕगल आनला हुता परशान भाड्यान..
फोटो काढाच्या नादात गाॕगल विहिरीत पडला.. लय महागाचा हुता.. मंगुदादा पैसे मागे ..परशाची खायची सोय नाई.. तो कुठुन पैसे आनन… मंग काय मार खालला त्यान..
अरे लेकहो.. एवढा कारभाय कायच्यासाठी केला..
सांग रे परशा…
आर्चीसाठी केल सबन… तिच्यावर छाप पाडासाठी गाडी अन गाॕगल घेतला.. आमी दोघ.. टायपींग कलासले सोबत हुतो.. मले लय आवडे ते.. आता आजकाल पोरीले सायकलावाले पोर नाई पाईजे त्यायला हीरोवानी पोरग पाईजे.मंग म्या भाड्याने आनल सबन.. दोन.. तीन दिस फिरलो.. पानीपुरी… भेळ.. पिझा यातच माये सारे पैसे खतम झाले.. अन आर्ची आनलाईन सामान बोलवत जाये
मले पैसे द्या लागे… जीव काऊन गेला.. फीचे पैसे खतम झाले… अभ्यास नाई.. कलास नाई.. गाडीच.. गाॕगलच भाड द्या लागे रोज…
जीव काऊन गेला..भाड नाई भरल म्हनुन मार पडला… आर्चीले समजल ..ती बी रागारागान गेली..म्या तिच्यासमोर लय फुशारक्या मारल्या हुत्या..
माय लय चुकल गुरूजी… दहावीच वर्षे लय महत्त्वाच रायते… मले माफ करा…
परशा झाल गेल गंगेले मिळाल..अस म्हनुन ..सबन इसर.. मी तुया फीचे पैसे भरतो… चांगला अभ्यास कर.. मेहनत कर.. अरे बाबु जवळ पैसा असला का अशा छप्पन आर्चा येतात जवळ.. अरे लेका .. स्वतःची कमाई नाई.. आजीच्या जिवावर जगुन रायला.. अरे बाबु निरा परेम करून पोट नाई भरत.. हातात पैसे बी पाईजे.. जुना जमाना गेला आता.. पोर.. पोरी खिसा पावून परेम करत्यात.. पन अजुनबी खर परेम करनारे हायेत काईजन
अरे बाबा पैसा नसला का कस हुते तुलेमाईत हाये ..आपल्या गावातली लैला मजनुची जोडी.. एकमेकासाठी हाताच्या नसा कापुन घेतल्या हुत्या.. पोलीसान लगन लावून दिल.. किती दिवस चांगले रायले बारा मईन्यात ईस्कोट झाला संसाराचा.. फारकत झाली..लय धीरान रा लागते संसारात.. दुरून डोंगर लय साजर दिसते बाबू ..जवळ गेल्यावर समजते..किती खाच..खळगे रायतात त… परेम करन सोप हाये पन त्याले निभावन लय कठीन..
धीरान.. संयम ठेऊन जमते बाबा सार…आता मायवालच पाय न लग्नाले तीस वर्ष होऊन रायली… भांडत…पिरमाने सुरू हाये गाडी..
अरे लेका परशा..आज माया लग्नाचा वाढदिवस हाये ..
बायकोले साडी घ्याले न्याच होत..
बापा.. गुरू जी आता काडी कायला घेता..
अव आजी साडी.. साडी…
गुरूजी पयत घरी निंगाले..
ज्योती रामटेके….
कथेचा तिसरा भाग येत आहे..









मस्त च..
Wawawa