अव दाजी…सारजा आहे का घरात.
बापा ते कुठ जाते..ते त महारानी आहे घराची
टी वी पावुन रायली मस्त.
एवढा नट्टा करून कुठसा चालली? अव दाजी खामगावले साड्याचा लय मोठा सेल लागला..काल आपल्या गावची सखु गेली होती सेलात.. बम साड्या आनल्या तिन.
काय समजत नाही बापा तुमच…मनल त राग येते.नीरा
वसवस साड्या रायतात.. सा मयने धड टिकत नाई.
मी मनतो एकच साजरी साडी घ्याव. तुले माहित आहे काय कालपासुन सखुच्या घरात नीरा भांडन सुरू हाये.
बाप्पा…काय झाल आनल्या साड्या त..दिसभर वावरात राबते..ते नाई दिसत घरच्या लोकाले.अन साड्या मोठ्या डोयात खुपत्यात.
अव तस नाई..तीची सासु तुले माईत हाये न ..कशी खजाल आहे त..ते मनते त्या सेलमदुन मायासाठी लुगडे कावुन नाई आनले..सखुन लय सांगून पायल का सेलमदी लुगडे नाई भेटत. तिथ नीरा साड्या रायतात. पण बुढी कायची आयकते.आता मनते मी बी जातो खामगावले अन लुगड्याचा सेल पायतोच म्हनते.बुढ्यान बी लय सांगून पायल पन बुढी वसकन आंगावर धावते.
अव दाजी…त्यायच जाउ द्या …सारजा..सारजा
आली काव पारू
चाल न बाई लवकर ..ते काली..पीली थांबून आहे न कवाची. तो लवकर सीटा भरते बर.
काय करू बीचारे..तुया दाजीचा काई सहारा नाई.
उठली तसी हात रीकामा रायत नाई.त्यात हा मानुस सदाई
च्या कराले लावते. गावातले रीकामे बुढे नीरा फिरत रायतात.उनाया आला कि सोयरीक कराची मनुन बायना करत्यात अन नीरा खान्यावर ताव मारत्यात.तुये दाजी असा बुढा दिसला कि च्या कराले लावत्यात.
अव..सारजा मी काय मनतो..त्या सेलमदी जान्यापरीस दुकानात जाय.त्या साड्या पचक्या पालव रायत्यात.
बाप्पा,..तुमची बहीन मले सेलमदली साडी देते तवा त दातखळी बसते तुमची. अन मले मोठे आले शिकवाले.
मी तिले चांगली दुकानातली साडी देत असतो..
पण आता मी बी सेलमदली साडी देत जाईन.मीच काय कमी आहो काय मंग..तुमाले त माईत आहे समद.
हो माउले कर तुले जे वाटते ते.तुयासमोर त हात टेकले.
जाय लवकर नाई त काली..पीलीत जागा भेटनार नाई.
चल व पारू…
अव सारजा ते सखुची सासु पाय कशी कनकन येऊन रायली. बुढा बी आहे संग.
थांब व सारजा.तु खामगावले सेल मदी चालली काय.
नाई व आत्याबाई मी त दवाखान्यात चालली बयना
अव..तुया वाला धनी आला हुता सांगाले.सारजा चालली मनुन मले बी सेल मदी लुगडे घ्याचे आहे.
अव त्या भवानीन लय साड्या आनल्या.मले एक लुगड नाई आनल.माया पोराचा पैसा उडवते ती भवानी.
पाय व पारू तुया दाजी… काई गरज हुती काय त्या बुढीले सांगाची..मायवाल सुख लय खुपते तुया दाजीले.
पोटात दुखल न त्यायच्या. आता सांग बीचारे.. या बुढीले सांबायत कि फिरत.तीले बी पहा..रस्त्यान धडाच चालत नाई. तिथसा नीरा गाड्या चालु रायतात. अन लुगड्याचा सेल बी नाई तिथसा..पन हे बुढी लय बाजींदी हाये.
बापा सारजा काय झामली आहेस व तु तो काली पीली वाला गेला न. घरात घुसून काम करत हुती.
हे पा माय डोक उठवू नका आता. सकायपासुन तयारीत हुती..तुमाले माय काई चांगल दिसत नाई.
जा आता उंडारा गावभार..त्या पागल बैलावानी
हो ..जातो..पण एक कप च्या कर आंदी
मायबाई…काय मनाव या मानसाले
गेंड्याची कातडी आहे बापा या मानसाची.
उद्या जाऊ व सारजा सेल मदी
पावु बयना उद्या …
आधी तुया दाजीची चांगली सोय लावा लागते.
उद्या सकाईच भांडन करतो.
आज ..मायीवाली लय फजीती केली.
आता उद्या पाय गंमत
ये तु उद्या…
जीवाच खामगावच करू.
ज्योती रामटेके










खूप हसू आले.