मै भी लडकी हूँ
movie review in marathi
तो काळ black and white सिनेमाचा.म्हणजेच बराच जुना काळ..
१९६४ साली आलेला हा नितांत सुंदर …समाजप्रबोधन करणारा भावनाप्रधान सिनेमा.
चन्द्रगुप्त यांचे सुमधूर संगीत.
लता मंगेशकर..आशा भोसले…मोहम्मद रफी यांचे सुरेल सूर मंत्रमुग्ध करतात.
त्या काळातील दिग्गज कलाकार..मीनाकुमारी…धर्मेन्द्र.बलराज सहानी..यांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला..अप्रतिम सिनेमा.
रजनी….रंगाने काळी….अमावस्येसारखी… मुलीचा रंग काळा म्हणजे तिच्या साठी शापच. तो काळ आणखीच जुना. मुलींना शिक्षणाचा गंध नाही…शोभेची बाहुली बनून राहायचे.तिला कोणतेही स्वातंत्र्य नाही. वयात आली आणि लग्न लावून दिले ही वृत्ती.त्या काळात
प्रत्येक मुलाची सुप्त इच्छा एकच होणारी बायको सुंदर गोरीपान पोर्णिमेच्या चंद्रासारखी हवी. तिने सुंदर दिसायला हवे …रंग गोरा हवा. रजनी बिचारी रंगाने काळी त्यामुळे तिचे लग्न जुळत नाही.तिचे निष्पाप ..शुभ्र ह्दय कुणाला दिसत नाही.या जगात दिखाव्याला भुलणारे जास्त .
तिची लहान बहीण चंदा..दिसायला सुंदर.पाहुणे नेहमी चंदाला होकार देतात. एक भाऊ..लहानपणी आई गेली आणि घराची जबाबदारी रजनीवर आली. मोठी बहीण..
आईचे दुसरे रूप. ती स्वतःला घरासाठी
अर्पण करते.
मीनाकुमारीने रजनीच्या भूमिकेत जीव ओतला. चेहऱ्यावरचे अगतिक भाव तिनेच जिवंत करावे. रंग काळा पण मन शुभ्र जाईच्या फुलाप्रमाने. कोमल…निरभ्र.हृदयात फक्त प्रेम आणि प्रेम….
तिचा चेहराच सर्व काही सागंत राहते ..सालस …प्रेमळ भाव…मनाच्या वेदना…न सांगता चेहऱ्यावर प्रतिबिंबीत होतात..
रामची भूमिका धर्मेन्द्र ने साकारली…,
निर्जीव कलाकृतीमध्ये रंग भरून त्यांना सजीव करणारा प्रसिध्द चित्रकार. एका पेक्षा एक कलाकृती आपल्या रंगकौशल्याने जिवंत करायचे कसब त्याच्या हातात.
लालाजी…रामचे वडील …जमीनदार घराणे.मोठी हवेली .
घरात कसलीही कमी नाही. रामची आई पार्वती या जगात नाही. लालाजी सतत तिच्या आठवणीत रमलेले. सतत आजारी. नोकराच्या रूपात दिसतात बलराज सहानी.
लालाजीवर अतोनात प्रेम. गंगा नावाला नोकर पण घरातील सदस्य.दिवस…रात्र हवेलीसाठी समर्पित केलेली.
रामचा मामा आणि मुरळीचा भाऊ रामला फसवतात.
चंदाला दाखवून मंडपात रजनीला उभे करतात.
राम खूष असतो. पण खरा प्रकार तेव्हाच उघडकिस येतो.मंडपात एकच गोंधळ सुरूच होतो.रामला धक्का बसतो.तो फक्त रजनीच्या डोळ्यातील निष्पाप भाव बघतो..तिचा व्याकूळ चेहरा…चेहऱ्यावरील अव्यक्त भावना…त्याच्या हृदयात चरे पाडतात. न बोलताच तिच्या भावना त्याला कळतात.
तिचे अश्रू जणू सांगत आहेत…
साजना मला अशीच किनाऱ्यावर सोडून जाऊ नको रे…
आता कुठे आयुष्यात सुंदर हवेची झुळूक आली.माझ्या चेहऱ्यावर जाऊ नको.माझे मन बघ..
यात माझा काय दोष ?तो समजून घेतो. मोठया मनाने तिचा स्वीकार करतो.लालाजी दुःखी होतात.त्यांना सून पोर्णिमेच्या चन्द्रासारखी हवी असते.. सुंदर ….देखणी
सुरवातीला लालाजी रजनीचा तिरस्कार करतात.
रजनी मात्र आपली कर्तव्य चोख बजावत राहते. हसून सर्व सहन करते. कधी तरी माझ्या भावना लालाजीला
कळतील …हा विश्वास. असतो तिला.
बरेचसे प्रसंग येतात …तेव्हा …तेव्हा लालाजींच्या मनातील रूसवा दूर होईल याची ती वाट बघते.
आर्त स्वरात कृष्णाला जाब विचारते…
कृष्णा
ओ काले..कृष्णा
तुने ये क्या किया
कैसा बदला लिया
रंग देके मुझे अपना.
देवालाच ती उत्तर विचारते…
तुझा काळा रंग सर्वत्र प्रिय आहे.
पण माझा काळा रंग कुणालाही नको आहे.
हा रंग तूच मला दिला नं
यात माझा काय दोष ?
हळूहळू रजनी आपल्या सेवाभावी वृत्तीने ..सालस गोड स्वभावाने सर्व जिंकून घेते…लालाजी खूष दिसू लागतात.
त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागते. हवेली नव्याने फुलून जाते.उदासीन वातावरण मिटून आंनदाचे नवचैतन्य घिरट्या घालू लागते. सुनीताचा कोमेजलेला चेहरा आता प्रफुल्लीत … आंनदाने भरून दिसतो.
दर्जेदार साहित्य लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी
Link











खूप च छान
व्वा!
सुंदर
अप्रतिम g
खुप सुंदर विश्लेषण
अप्रतिम 👌
वां वां क्या बात है …अतिशय सुंदर समिक्षण .. बाह्य सौंर्दर्या पेक्षा आंतरीक सौंदर्य हे अधिक खुलुन दिसते हे निर्विवाद सत्य आहे ..
जबरदस्त लिखाणाचा पगडा, सुरेखच मांडले कथानक