Gulzar-Izaazat-ना जाने क्यों आँख भर गयी
गुलजार-इजाजत-रेखा,नसीर,अनुराधा
छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से
सारी वादी भर गयी
छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से
सारी वादी भर गयी
ना जाने क्यों, दिल भर गया
ना जाने क्यों, आँख भर गयी……
इजाजतचे Title song सुरु होते.आशा भोसलेचा आवाज आणि सुंदर फोटोग्राफीने टिपलेला सुंदर निसर्ग.
गाणे सुरु असतांनाच रेल्वे,रेल्वेतून महेंदर उतरतो.
पती-पत्नीचे सहजीवन आणि त्यात तिसऱ्याची असणारी सावली. प्रेमत्रिकोणावर आधारित बरेच सिनेमे आले.पण इजाजत सगळ्या सिनेमात सरस वाटतो तो गुलजारने लिहिलेल्या कथेमुळे,गाण्यांमुळे,दिग्दर्शना मुळे.
गुलजारनी लिहिलेली गाणी तर जबरदस्त आहेतच पण सिनेमाची गुंफणही कवितेसारखी मनाला भावणारी,
सिनेमात शब्दाशब्दाला अर्थ आहे.एकही शब्द अनावश्यक वाटत नाही. जिथे शब्द नाहीत तिथे मौनातही शब्द आहेत.तिथली शांतता बोलकी आहे.
कवीमनाच्या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे हा अनुभव प्रत्येक फ्रेममध्ये येतो.
योगायोगाने रेल्वेस्टेशनवर waiting room मध्ये महेंदर आणि सुधा भेटतात.
सुधा आणि महेंदर पाच वर्षांनी एकमेकांना भेटतात.रात्रीची वेळ आहे.पाऊसाची रिमझिम सुरु आहे,आणि सुरु होतो इजाजतचा सुरेल,काव्यमय,हृदयस्पर्शी प्रवास.
सुधा आणि महेंदर waiting room वर भेटतात.मध्ये बरीच वर्ष निघून गेली आहेत.पण दोघेही एकमेकांच्या सवयी अजून विसरले नाहीत.
आपकी भूलनेकी आदत नही गयी
मेरी रखनेकी आदत नही गयी
आदतेभी अजीब है
साँस लेनाभी कैसी आदत आहे
जिये जानाभी कैसी रवायत है
जिये जाते है
जिये जाते है
waiting room बाहेर पाऊस येत आहे.दोघे बसून आहेत
सुधा महेंदरला विचारते
वही रहते है आप
हाँ वही
वही शहर है,वही गली,वही घर
सबकुsssछ
सबकुछ वही तो नही है
लेकीन है वही उसी जगह… मनाला भिडणारे डायलाॕग्ज पूर्ण सिनेमाभर आहेत.
सुधाने घर सोडल्यानंतर सर्व तसेच होते का?
दोघेही भूतकाळातील सोबत घालवलेले प्रेमाचे,रुसव्याचे क्षण आठवत राहतात.दोघांच्याही आठवणीत मायाची सावली आहे.
अब भी माचिस रखती हो ?…
पहले तो मेरे लिये रखती थी, और अब….
“अब अपने लिये रखती हूँ“
“मतलब सिगरेट पीना शुरू कर दिया क्या…?”
“नहीं… आपकी भूलने की आदत नहीं गई।
सिनेमा flasback मध्ये आहे.
महेंदरचे दादाजी त्याचे लग्न सुधासोबत ठरवतात.मायासोबत जीव गुंतलेला महेंदर सुधाला भेटून मायाबद्दल सांगतो. शिक्षिका असलेली सुधा मायाला घेऊन दादाजीला भेटायला सांगते.
महेंदर मायाला भेटायला परततो,तिला शोधतो.
माया तिच्या महेनवर भरभरुन प्रेम करणारी पण स्वतःच्या
अटींवर जगणारी,महेनशिवाय जगू न शकणारी पण अल्लड,अवखळ,अतीसंवेदनशील असलेली माया विवाहबंधनात अडकायला तयार नाही.आईवडिलांचा विफल झालेला विवाह बघून तिचा त्यावरचा विश्वासच उडतो.
महेंदर दादाजीला भेटण्यासाठी तिला शोधतो पण ती भेटत नाही.महेंदरचा विवाह सुधासोबत होतो.
सुधा महेंदरचा भूतकाळ विसरुन त्याच्या सोबत संसार थाटते.महेंदरवर प्रेम करते.
महेंदरसाठी मायाला विसरणे सोपे नाही.सुधा त्याच्या आयुष्यात येण्यापुर्वी त्याच्या मनात,घरात तिचेच राज्य असते.तिच्या वस्तू ,आठवणी ठिकठिकाणी विखुरल्या आहेत.
विवाहानंतरही त्याच्या Vallet मध्ये मायाचा फोटो असतो,सुधाला दिसतो तो.
तो स्पष्टीकरण देतो.
मै जानता हूँ माया बहूत ज्यादा बसी हूई थी यहाँ हर जगहसे तो निकाल दिया है उसे
कही कोनेमें बची है वहाँसे भी हट जायेगी
महेंदरलाही मायाला विसरायचे असते.
सुधा जी महेंदरवर प्रेम करते.तो तिला पूर्ण तिचा हवा असतो पण
सब कुछ बटाँ हूआ लग रहा इस घरमें
जिस चीजको छूने जाती हूँ लगता है किसी औरकी चीज छू रही हूँ
पुरा पुरा अपना कुछ भी नही लगता
माया मध्ये मध्ये फोन करते.तिच्यासाठी महेंदर सर्वस्व असते,वेड्यासारखी ती त्याच्यावर प्रेम करते.
महेंदरला सुधाला दुखवायचे नाही पण मायाबद्दलही माया आहेच.
माया बर्दाश्त नही कर पाती इसलिए फोन करती है
मै बर्दाश्त कर पाता इसलिए फोन नही करता मिलता
भी नही हूँ
सच तो ये है की हम दोनो एकदुसरेको छोडकर जीनेकी कोशिश कर रहे है
मेरे साथ तो तुम हो
उसके साथ तो कोईभी नही है….
महेंदर सुधाला समजवतो.
सुधा प्रगल्भ आहे.तिही समजून घेते.
संसारात दोघेही रमतात.
महेंदरसाठी मायाला विसरणे कठीण असते पण तो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो.
तिच्या बऱ्याच वस्तु महेंदरच्या घरी असतात.
त्या सुधा महेंदरला परत करायला सांगते.
मायाला वस्तु मिळतात.जे परत केले त्यात सगळे होते का?.महेंदर सगळे परत करु शकतो का?
माया चा तार येतो. कविता लिहून पाठवते ती.
सिनेमाभर असलेल्या मायचा इथेच सिनेमात प्रवेश होतो. मेरा कुछ सामान…
गात पडद्यावर प्रथमच ती दिसते.
माया तिचे राहलेले सामान मागत आहे.ज्याच्याशिवाय ती अधूरी आहे अशा तिच्या प्रियकराने दुसऱ्या स्त्री सोबत घर वसवले.तिथे मायाच्या प्रेमाला,तिला जागा नाही. पण मग त्या दोघांनी एकत्र पावसात भिजलेले दिवस,दोघांनी सोबत घालवलेली रात्र ते तू पाठवू शकतो का?मला ते हवे आहे.
महेंदरचे मायाला विसरण्याचे प्रयत्न सुरु असतात.
महेंदर-सुधा हनिमूनलाला जातात.
सुधा विचारते,
आप भाग तो नही रहे है किसीसे
किससे?
मायासे
देखो सुधा ये दिनरात मायाका खयाल हम दोनोके बीचमें अच्छा नही है
मै मायासे प्यार करता था ये सच है
और उसे भूलनेकी कोशिश कर रहा हूँ ये सही है
उसे भूलने मे तुम मदत नही करोगी तो मुश्किल होगी क्योंकी मुझसे ज्यादा वो तुम्हे याद आती है
जो बीत गया उसे बीत जाने दो उसे रोकके मत रखो
महेंदरला भूतकाळातील मायाला विसरुन सुधासोबत रमायचे आहे. सुधासोबत लग्न झाल्यामुळे ती त्याची जबाबदारी आहे हे त्याला माहित आहे. मायावर प्रेम केले पण तो आता भूतकाळ आहे हे त्याला कळत असते.
पण…
महेंदरचा दुरावा माया सहन करु शकत नाही.ती आत्महत्येचा प्रयत्न करते,महेंदर तिला भेटायला जातो.भेटी वाढत जातात.महेंदर मायाबद्दल सुधाला काही सांगत नाही.पण सुधाला ते कळते.
सुधाला महेंदर माया एकमेकांना विसरु शकणार नाही असे वाटते आणि घर सोडून ती निघून जाते.
सुधा निघून जाते.महेंदरला Heart attack येतो. त्याची काळजी घ्यायला माया त्याच्या सोबत राहायला येते.
महेंदरला सुधाला घरी आणायचे असते.पण तिचे डिव्होर्स पेपर येतात.महेंदर सुधावर प्रेम करतो हे मायाच्या लक्षात येते.
मायाला सुधा निघून गेली यासाठी ती जबाबदार आहे असे तिला वाटते.ती मोटरबाईक घेऊन जाते.जाता जाता तिचा स्कार्फ जो सुधाने तिच्या सामानासोबत पाठवला असतो तो तिच्या गळ्याभोवती आवळल्या जातो. त्यातच ती जाते.
महेंदर मायावर प्रेम करतो तेव्हा सुधासोबत विवाह करावा लागतो.सुधावर प्रेम करायला लागतो पण सुधा त्याला सोडून निघून जाते. आणि ज्या मायामुळे हे सगळे घडते तीही कायमची जगातून जाते.
महेंदर एकटा राहतो
आणि आज अचानक पावसाळी रात्रीत दोघे waiting room मध्ये भेटतात.
अब भी माचिस रखती हो ?…
पहले तो मेरे लिये रखती थी, और अब….
“अब अपने लिये रखती हूँ“
“मतलब सिगरेट पीना शुरू कर दिया क्या…?”
“नहीं… आपकी भूलने की आदत नहीं गई।
महेंदर-घरभी तो वेटिंग रुम है
तो तिला खाण्यासाठी काही आणायला जातो.
पावसात भिजून येणे
ती टाॕवेलने केस पुसून देणे.
लाईट जाते.ती धडपडून पडते.
तो जखमेवर मलमपट्टी करतो.पाच वर्ष एकमेकांपासून दूर असून,दोघातील नाते संपले आहे तरीही काहीतरी आहेच जे मनाच्या खोल तळ्यात दडून आहे.
महेंदरला waiting room सुधामुळे घरासारखी वाटते यातच सगळं आलं.
एकमेकांशी बोलता बोलता एकमेकांची काळजी घेतात.कुठेही कडवटपणा नाही.
महेंदर आणि सुधा दोघेही एकत्र गप्पा मारतात.
पावसाळी रात्र संपते.पहाट होते.
महेंदरला सुधा एकटीच आहे असे वाटत (प्रेक्षकांनाही आता सुधा आणि महेंदर सोबत आले तर…) असतांना सुधाचा जोडीदार येतो. महेंदरला तिचे लग्न झाले हे आता कळते. दुःखी ,व्याकुळ होतो. सुधा-तिलाही खंत वाटते.
इजाजतची मूळकथा सुबोध घोषची आहे.जातुगृह हा बंगाली सिनेमा त्या कथेवर बेतलेला आहे.
पण हिंदी इजाजत पूर्णतः गुलजार टच आहे.
महेंदर-
सिनेमात नसीरने महेंदरची भूमिका केली आहे.मायावर प्रेम करणारा,तिच्यात गुंतलेला,तिच्या अल्लडतेला सहन करणारा प्रेमी आणि विवाहानंतर प्रामाणिक,जबाबदार पती अशी त्याची व्यक्तीरेखा आहे. सुधा त्याला हवी आहे पण मायाला विसरु शकत नाही अशा असहाय हतबलतेत तो अडकला आहे.सिनेमात सर्वात दुःख त्याच्याच वाटेला आले आहे.नसीर त्याच्या सर्वच भूमिका परफेक्ट वठवतो.
सुधा-
सुधाची भूमिका रेखाने केली आहे.जोडीदाराच्या आयुष्यात दुसरी स्त्री आहे हे माहीत असूनही ती आत्मविश्वासाने त्याच्या आयुष्यात येते पण महेंदरने मायाला विसरावे हे तिला अपेक्षित असते.
शिक्षिका असलेली सुधा mature असते.independent असते. पतीवर प्रेम करणारी,घर सांभाळणारी,घरात असणाऱ्या दुसऱ्या स्त्रीच्या आठवणी यामुळे पत्नीची होणारी तगमग आणि वेळ येताच स्वाभिमानाने घर सोडून बाहेर पडणे….रेखाचा दर्जेदार अभिनय.
माया-
सिनेमात कमी दृश्य असणारी पण प्रत्येक दृश्यात असणारी माया,महेंदरवर वेड्यागत प्रेम करणारी माया,सुधाला दीदी मानणारी,लाघवी,आकर्षूण घेणारी,लहान मुलासारखी नितळ कवी मनाची माया अनुराधा पटेलने साकारली आहे.
इजाजत बघितल्यानंतर अनुराधा पटेलचे करियर लवकर का संपले? हा प्रश्न पडण्याइतपत उत्तम अभिनय आहे.
माया आणि सुधा दोन्ही परस्परविरोधी व्यक्तीरेखा आहेत.सुधा mature,independent आणि माया immature आणि dependent आहे.
दोघी महेंदरवर प्रेम करतात हे एकच दोघींमध्ये साम्य आहे.
दोघीही महेंदरवर प्रेम करतात पण महेंदर शेवटी एकाकीच राहतो.
सिनेमातील चारही गाणी आशा भोसलेनी गायली आहेत.संगीत R.D. बर्मनचे आहे.गुलजारची सगळीच गाणी मोहवणारी.ऐकून आनंद देणारी,तर कधी दुःखाची जाणीव देणारी.
छोटी सी कहानी से
छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से
सारी वादी भर गयी
छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से
सारी वादी भर गयी
ना जाने क्यों, दिल भर गया
ना जाने क्यों, आँख भर गयी
दिल में गिले भी थे, पहले मिले भी थे
मिलके पराये थे, दो हमसाये थे….इजाजत बघितल्यावर ह्या दोन ओळीत बराच सिनेमा सामावलेला वाटतो.
खूप सुंदर शब्द आहेत गाण्यात.पानावर ओघळणारे दवाचे थेंब आणि गुलजारने त्याला दिलेली आँसूची उपमा…हे फक्त गुलजारलाच शक्य आहे.
रुकती है, थमती है, कभी बरसती है
बादल पे पाँव रख के बारिश मचलती है
अहाहा!
कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जीने दो
ज़िंदगी है, बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
हनीमूनला जातात तेव्हाचे त्यांच्या गुलाबी दिवसातील हे गाणे आहे.
जीवनातील आनंदाचे क्षण सुधाला जीवन जगण्याची ताकद देत आहेत.तिला महेंदरचे मायावर प्रेम आहे हे माहीत असते. पण त्याच्याकडून मिळणारे थोडे प्रेमही तिला आनंद देते.
मेरा कुछ सामान
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है
सावन के कुछ भीगे-भीगे दिन रखे हैं
और मेरे इक खत में लिपटी राख पड़ी है
वो राख बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो
मेरा कुछ सामान…
महेंदर मायाचे त्याच्याघरी असलेले सामान तिच्याकडे पाठवतो.
पण भूतकाळात घालवलेलेक्षण,एकमेकांबद्दलचे प्रेम,भावना हे सगळे तो तिला कसे परत देणार
इजाजतमध्ये दोघीही इजाजत मागतात.
एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफ़नाऊँगी
मैं भी वहीं सो जाऊंगी, मैं भी वहीं सो जाऊंगी
माया महेंदरच्या आठवणींबरोबर संपून जाण्याची इजाजत मागते तर सुधा त्याच्यापासून कायमची दूर जाण्याची इजाजत मागते.
खाली हाथ श्याम
खाली हाथ शाम आयी है
खाली हाथ जायेगी
आज भी न आया कोई
खाली लौट जायेगी
खाली हाथ शाम आयी है …
संध्याकाळची वेळ आहे.महेंदर आणि माया सोबत आहेत.सुधाघरी एकटी आहे.
आज पण संध्याकाळ खाली हात आली,एकटी आली. आणि तशीच परत जाईल.आशा भोसलेने अप्रतिम गायले आहे हे गीत.
Waiting room,रात्र आणि कोसळणारा पाऊस सिनेमाचा महत्वाचा घटक आहे.
बाहेर पाऊस सुरु आहे.यांच्या मनातही आठवणींचा पाऊस पडतो.अशा आर्त वेळी
सुधा बोलून जाते
बरस जायेगी तो अपनेआप थम जायेगी
सिनेमाचा शेवटही गुलजारने चुटपूट लावणारा पण सिनेमाचा दर्जा वाढवणारा केला आहे.
शशी कपूरने रेखाच्या पतीची भूमिका केली आहे.
सुधा पतीसोबत जायला निघते.
डोळ्यात अश्रु असतात.सोबत असणाऱ्या पतीच्या लक्षात तिची तगमग येते.तिला अवघडल्यासारखे वाटू नये म्हणून तो काही पावलं तिच्यापुढे जातो. पाचच मिनिटामध्ये त्याचे तिच्यावर असलेले प्रेम,तिची वाटणारी काळजी आपल्याला जाणवते.
हा रोल शशीकपूरने केला आहे.
पहिल्यांदा महेंदरला सोडून जाते तेव्हा ती त्याची इजाजत न घेता घाईत निर्णय घेऊन जाते.तेव्हा तिने महेंदरला विचारले असते तर कदाचित् …
पहली बार बिना पुछे चली गयी थी इस बार इजाजत दे दो…सुधा इजाजत मागते.
काश ये इजाजत पहेली माँगी होती……
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










Wah
धन्यवाद
सुंदर लिहिले
धन्यवाद दर्शना
खुप खुप छान, अप्रतिम. No words
धन्यवाद मोहिनी.
माझा सर्वात आवडता चित्रपट,
आणि अगदी सुंदर रसग्रहण… खुप छान
धन्यवाद रागिणी
खरेच खूप वेगळा,तरल भावव्यक्ती असलेला चित्रपट आहे हा.कथा,संगीत,अभिनय सर्वच बाबतीत उंची गाठणारा चित्रपट.
खूपच छान
धन्यवाद