ऱाधिका : मुलांनो उठा न!
बेटाss उठा-उठा मा!
अरे मला घाई आहे मा आज!
उठाss राजा, शीला ताई येईलच एवढ्यात कामं आटोपायची लवकर लवकर उठा बरं.
माझ्याने होईल तेवढे आवरुन देते न तुमचं.
ऐकत आहा का?.
उठा शोना.
जायचंय न उद्या पिकनिकला काशीद बिचला.
मग?
(पांघरुन काढत)उठा बाबा.
(राधिकेला दोन गोड अशी अपत्य, ओवी मुलगी तिसऱ्या वर्गात नी अभंग मुलगा पहिल्या वर्गात. दोन वर्षाच अंतर… दोघेही हुशार, देखणे अर्थात राधिका रमण हे जोडप मुऴात स्मार्ट. रमण एका कंपनीत मोठ्या हुद्यावर. राधिका पण कंपनीत जाॕब वर.(सुखी कुटुंब )
शीला: काकु !
काकु कुठे आहात?.
दार का उघडं ?
राधिका: (बेड रुम मधुन बाहेर येत)
आली. बरं ग वेळेवर आली.
कर भाजी-पोळी पटकन.
दुध कर मुलांच.
डबा कर माझा.
अग मला कंपनी व्हिजीटर्सला ब्रेकफास्ट करवून तिकडुन तिकडे आॕफिसला जायचंय.
चला टेबल वर.
ओवी,अभंग(दोघांना दुध देते)
नीट धर पेला अभंग सांडेल न ते.
बरं उद्या मज्जा करायची नं.
सगळं सामान काढून ठेवा तुमचं पिकनिकला नेण्याच. बाबांसोबत आंघोळ करुन घ्या.
ओवी: आईss बाबा आले.
बाबा आज आमची आंघोऴ तुमच्याकडे, असे आई म्हणाली.
रमण: हो हो का नाही. आपल्या आईला घाई आहे आज. आवरेन मी तुमचं शाळेत पण सोडेन.
रमण: निघाली तू?डबा घेतला ?
राधिका: होss रे. प्लीज मुलांच आवर आज संध्याकाळी वेळेवर घरी ये. नसल्या सबबी सांगू नको. उद्याची पण थोडी तयारी कर. आली की मी पण करतेच रे.
चला बाय येते मी रमण.
पिल्यांनो बायss बायss.
ओवी: आई देवाला नमस्कार केला का?.
“आम्हाला सांगते नं तू बाहेर पडतांना बाप्पांना सांगून जावं”.
राधिका: हो ग राणी कशी विसरेन मी?
गाडी काढुन राधिका निघते. विचार चक्र सुरु होत. रमण किती जिद्दीस पेटलाय काशीद बीच ला जायचंय म्हणून न.
खरे तर मला नाही जावस वाटत तिकडे पायाखालून निसटुन गेलेल्या आठवणी काढायला.
चांगलंच आठवतं तिला रजनीशला शेवटच तिथेच बोलवले होते. तिनेच आग्रह धरला होता.
कसं चुकू शकतो माणूस एखाद्या व्यक्तीच्या भावना ओऴखण्यात इतकं.
रजनीश सावळासा उंच असा मुलगा. घरी रेंट वर रहायला आलेला, पाहताक्षणी मनात भरलेला जरा लाजरा-बुजरा सोलापुरच्या जवळ कुठल्या तरी खेड्यातून आलेला. माझी थोडी टाळाटाळ करणारा.
बाबांना आलेल्या भोवळीने आमची सोबत घडवून आणली. दवाखान्याच्या सोबतच्या फेऱ्यांनी खुललो होतो आम्ही. अनवधानाने त्याचा स्पर्श ही झाला होता आणि हवाहवासा वाटणारा स्पर्श विसर न पडणारा होता.
माझ्या मनाचा ताबाच त्याने घेतला होता. संपूर्ण कोवऴ्या प्रेमाच्या भावना त्याच्याशीच जुऴल्या होत्या.
तो मात्र कधी भरभरुन प्रतिसाद देईना. सारखं वाटायचं लाजरा आहे जरा तो मी मात्र माझं संपूर्ण आयुष्य त्याच्या संगतीत रंगवत चालले होते. का कोण जाणे, वाटायचं लाजतो पण प्रेम करतो आपल्यावर.
काॕलेजला सोडायला जाणे. घ्यायला येणे. मला लागलेली सगऴी मदत आनंदाने करायचा. वाटायचं आवडत ह्याला.
एमबीएला एडमिशन घेतली होस्टेलला रहायला आले. दुःखी झाला होता तो. आईनी पाठवलेल्या सामानाची ने आण आवडी ने करायचा.
यायचं कधीकधी मनात,
हा आपल्याला प्रपोज का करत नाही?”. पण लाजरा आहे असे मनात म्हणत सोडून दिल्या जायचं.
एकदा हिम्मत केली नी ठरवलं, ह्याला मनातील गुपित सांगायच ते पण रमणीय ठिकाणी त्याला आनंद होईल ह्याची खात्री वाटत होती.
कारण त्याच्या नजरेनी कधीच मला नाकारलं नव्हतं. काशीद बिच वर भेटू म्हणुन आग्रह धरला. आधी तो नाही म्हणाला. नंतर काहीस ठरवुन हो म्हणाला यायला.
चांगलचं आठवत तो आला ठरलेल्या वेऴेवर. पाण्यात पाय रोवून उभे आम्ही बोलत होतो. संधी पाहून मी त्यास मनातील गुपित सांगणार तेवढ्यात त्याने सांगितलले कि,
त्याच लग्न ठरलंय मामाच्या मुली सोबत. ऐकताक्षणी पायाखालची वाळू निसटुन गेली होती. माझा तोलच गेला होता तेव्हाही त्याने सावरलं, तसचं जसं बाबांना भोवऴ आली होती नी त्याने सावरल होत. तशीच नजर त्याची इतकी अर्थशुन्य नजर मला का इतकी अर्थपूर्ण वाटावी.
स्वतःची लाज वाटली, माणुसकी, मैत्री म्हणुन ज्या व्यक्तीनी जवळीक दाखवली. आपण त्याचे चुकीचे अर्थ काढले.
त्याची काही चुक नव्हती. आयुष्यात आलेल प्रेमाचं ते एकमेव वार होतं. त्यातुन कधी निघाव अस वाटलंच नाही. आजही आठवतं सारसार पण कधी काळी तो स्वप्नात जरी आला तरी लांबच उभा राहतो. मी आनंदी आहे. मी तर प्रेम केलं, नी मनात साठवल ही.
“रजनीश” कित्ती गोडनाव.
अरे चला ss उद्या परत पायाखालुन वाळू कशी निसटते त्याचा अनुभव घेऊ. हसायला येत, किती बालिश असतो आपण, थोडेसे वेडे च …
शेवटी प्रेम हे देवाचा प्रसाद असतो. सर्वांना नाहीच मिऴत, मोगऱ्याच्या फुलांची आरास मांडून देवाची पूजा करावी तसंच असतं प्रेमाच.
त्या प्रमाणे केलं मी प्रेम,मला वाटली श्रद्धा, सर्वार्थाने आपण आपली श्रद्धा जपावी …
आठवणींच्या फुलांची साठवण मनाच्या मखमली कुप्पीत करायला पाहिजे,हवे तेव्हा काढली हुंगावी, दरवळीत जगावं,
मी जगतीय, आनंदी आहे.
आल हाॕटेल.
चला! “सगळा दिवस बिझी जाणार. जाऊन उद्याची तयारी…!”.









खूप सुंदर
सुंदर कथा
सुंदर लिहिले…
Wahh mast tai 🌹🌹🌹
छान
Tq everyone