निशिगंध
मागचे वर्षी राजू भावजीनी (आत्येभावाने) काही रोपटी पाठवली होती. जास्वंद, निशिगंध आणि कन्हेरी….
जास्वंद भराभर वाढला, फुलला आणि श्री गणेशाचे शिरी दिमाखात विराजमान पण झाला दोन महिन्यात.कन्हेरी बिचारी एवढीशी….तिला फुलायला अजून खूप वेळ होता. पण निशीगंध मात्र गेली वर्षभर झाले निपचित पडून राहायचा.जागीच झोपळून मान टाकून द्यायचा. झोपाळला तरी फुलण्याचे नाव नव्हते त्याचे. शेवटी एक दिवस ‘वांझ’ म्हणून मीच हिणवले त्याला रागाने
आणि उचलून बाजूला ठेवले.
रोज मधल्या वेळेत घरी आले म्हणजे उगाच रोज त्याची जागा बदलू लागले. उगाच आपला देह वाढवून ठेवलाय याने म्हणून एक दिवस रागात त्याची पान, फांद्या छाटून काढल्या तेंव्हा तो बिचारा माझ्यावर रागावून रागात बघत असल्याचा मला मनोमन भास मात्र झाला होता. मग उगाच मी मगभरून पाणी त्याच्यात ओतून त्याची मनधरणी केली अगदी एखाद्या रुसलेल्या प्रेयसीची तिच्या प्रियकराने समजूत काढावी तशी मी ही प्रेमाने त्याची समजूत काढली होती.
दोन दिवसांपूर्वी उठल्याबरोबर माझ्या मोगऱ्यावर नजर फिरवताना निशिगंधान लक्ष वेधलं. ….आणि काय गंमत, …
कळ्यांचा एक मोठा झुपका दिमाखात डोलताना नजरेस पडला आणि निशिगंध ही आज लाजेने चुर झालेला दिसत होता. माझी नजर तिथेच खिळली
ही एवढी सुंदर सकाळ….
मनोमन निशिगंध दरवळला.
आणि घरातील प्रत्येकाला बोलावून त्या वर्धिष्णू होणाऱ्या कळ्या सर्वांना आनंदाने दाखवण्याचे नवीन काम लागले. अगदी न थकता…
आपण ‘वांझ’ म्हणून हिणावल्याचा gilt आता माझंच मला स्वस्थ बसू देईना….
जवळ जाऊन गोंजारलं, हस्तांदोलन केलं, पण छे$$$$ काहीच उपयोग झाला नाही.त्याने माझ्याकडे पाहून साधी मानही डोलावली नाही.
एवढा राग….?.मग मीच माघार घेतली . आणि आता त्याच्या फुलण्याची वाट पाहत होते, कारण मला माहित होतं- त्याचा राग हा क्षणिक आहे…लटका आहे, उद्या सुगंधित झाला की हसेल आपसूकच….
आजचा दिवस सरून उद्याच्या फुलण्याची प्रतीक्षा. निशिगंधाचा आजच माझ्या मनभर सुगंध पसरून जात होता….
मनभर पसरलेला सुगंध घेऊन उद्या देवघरात त्याला कोणती जागा द्यायची याच विचारात प्रत्येक देवाच्या मूर्ती वर हा पांढरा शुभ्र निशिगंध मी मनोमन अर्पित होते…..
माझ्यावर लटकेच रागावून फुललेला निशिगंध तुम्हालाही आवडल्यास जरुल प्रतिक्रिया द्या
सौ. प्रिया देशपांडे…✍️
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
Wah sundrch
खुप छान भावना मांडल्या तुम्ही. आणि मुख्य म्हणजे त्यानीही ऐकलं तुमचं म्हणणं.
वाह
खूप सुंदर..