हरवून गेल्या जाणिवा-भाग-२१
हरवून गेल्या जाणिवा-भाग-२१

हरवून गेल्या जाणिवा-भाग-२१

भाग-२१

हरवून गेल्या जाणिवा..
सौ.दर्शना भुरे..

विनायकरावच्या आजोबांच्या तेरवीनंतर विमल आणि मधुकर राव घरी परतणार होते. आणि कांता वैकुंठा सोबत तिथे राहणार होती..

पुढे..

आई आबा उद्याच उमरगावला परत जाणार असल्याचे वैकुंठाला समजले तेव्हा पासून ती त्यांच्या सोबत जाण्यासाठी मागेच लागली होती.
ती कोणाचेच काही ऐकत नव्हती. तेव्हा विमलला वाटले की वैकु एवढी हट्टाला पेटलीच आहे तर अजून दोन दिवस राहून जाऊन वैकुला सोबतच उमरगावला घेवून जाऊ दोन दिवसांनी घरी गेलो तर असा काय फरक पडणार आहे. तसेही व्याही म्हणतच होते की नवीन जोडीला उद्या देवदर्शनाला न्यायचे आहे तर तुम्ही थांबा दोन दिवस आपण सर्वजण मिळून जाऊ..
बोलून बघायला काय हरकत आहे एकदा वैकुच्या आबाला बघतेच एकदा बोलून विचार करत करत विमल पेटीत कपडे भरू लागली..
तिच्या शेजारीच चटई वर वैकू झोपी गेली होती.
त्यांच्यासोबत जाण्यासाठी तिने तिचे डोळे रडून रडून सुजवून घेतले होते. तिला सोडून जायला विमलच मन होत नव्हते.पण लेकीच्या सासरी जास्त दिवस राहणे योग्य नव्हते. तीची नजर परत परत शेजारी झोपलेल्या वैकुवर जात होती.

झोपली का वैकु..
हो ग कांता आताच डोळा लागला बघ तिचा..
तुम्ही काळजी करू नका ताई मी आहे वैकुजवळ तुम्ही निश्चिंंत होवून घरी जा..
कांता वैकुशेजारी बसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,

कांता काकू तिच्या आईला म्हणत होती ..ताई वैकुचे लग्न झाले आहे.. तेव्हा तिच्यावर आता आधी आपल्या पेक्षा तिच्या सासरच्या लोकांचा अधिकार आहे.

आणि शिवाय सून या नात्याने प्रत्येक सण समारंभाच्या निमित्ताने वैकुंठाला अधूनमधून सासरी उपस्थित राहावे लागणार आहे.
कांता चे म्हणणे विमलला पटत होते. त्यांच्या आवाजाने वैकुची झोप चाळावली
वैकु दोघींचे बोलणं ऐकू लागली त्यांच्या बोलण्यातून तिला आपण कितीही हट्ट केला तरी आई आपल्याला
सोबत नेणार नाही हे लक्षात आले होते म्हणून वैकुने त्यांना घरी जाण्यासाठी स्वखुशीने परवानगी दिली. लेकी मध्ये झालेल्या एवढा बदल पाहून विमलला छान वाटले. मधुकरराव ला आता लवकर घरी जाण्यची घाई पडली होती. वाशीमला येताना त्यांनी सर्वे कामे एकट्या सदाशिव वर सोडली होती घरी त्याच्या मदतीला कोणीही नव्हते.
मधल्या दिवाकरने नौकरी निमित्ताने त्याच्या बायको पोरांसमवेत बाहेर गावी स्वतंत्र बिऱ्हाड थाटले होते.
घरी धाकटा भाऊ सदाशिव त्याची बायको सिंधू आणि नर्मदा ताई असे दोघे तिघे च होते.

त्यामुळे सिंधूचा पूर्ण वेळ घरकामात जात असे.. नर्मदा ताई मदतीला होत्या पण त्यांचे आता वय झाले होते. वयोमानानुसार नर्मदाताईला फार दगदग सहन होत नव्हती.तरी त्या
त्यांच्या कडून होईल तेवढी सिंधूला मदत करून शेताकडे चक्कर टाकीत होत्या..

अंदाजे दहा अकरा वाजता ती सर्वजण आपल्या गावी उमरगावला पोहोचली तेव्हा घरातील मंडळी जेवायला बसली होती. वैकुंठाकडून निघताना पोटभरून नाश्ता करून झाल्यामुळे मधुकरराव ला तेवढी भूक नव्हती तेव्हा त्यांनी शेतातील कामे कुठवर आली आहेत हे पाहण्यासाठी आल्या आल्या आपला मोर्चा शेतीकडे वळवला..
मधुकरराव वाशिम ला गेल्यावर शेताकडील सर्व कामे एकट्या सदाशिवच सांभाळत होता.

शेतातील कामे बऱ्यापैकी आटोपलेली दिसत होती.

कापसाची वेचणी करून झाली होती. गहू लागवडीसाठी शेत नांगरणे चालू होते जवळपास अर्ध्याहून जास्त शेती नांगरून तयार झाले होते.
मधुकरराव दूरवरून शेतीची पाहणी करत होते.
सदाशिव मजुरांना कामे समजावून सांगत होता.
मधुकरराव ला शेताच्या उभे राहिलेले पाहून तो पळत येत म्हणाला,
दादा कधी आले तुम्ही .. मला कळलेही..
अरे सदा नेमका च पोहोचलो वाशिम वरून..कामे बऱ्यापैकी आटोपलेले दिसत आहे.
हो दादा राहिलेले शेत आज नांगरून होईलच तेव्हा उद्याला पेरणी सुरू करून घेवू .. कशी व्याही मंडळी आपली वैकु काय म्हणते? कधी येणार ती?
अरे हो हो किती प्रश्न सगळं सांगतो चल ..
हसत हसत मधुकरराव आणि सदा दोघेही गप्पा मारत घराकडे निघाले..
घरी वैकुसोबत तिची सासूपण दोन दिवसांनी रत्नाच्या भेटीसाठी येणार होती त्याकरिता स्वयंपाकाचा खास बेत ठरत होता. वैकुंठाला आवडतात म्हणून तिच्या आवडत्या खुसखुशीत करंज्या आणि अनारसे स्वतः नर्मदाआत्या तिच्यासाठी बनवणार होत्या.

क्रमशः

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!