मराठी भयकथा-हायवे वर
मराठी भयकथा-हायवे वर

मराठी भयकथा-हायवे वर

मराठी भयकथा-हायवे वर

डॉक्टर कुलकर्णी एक चांगले फिजिशियन होते पेशंट ला उत्तम आणि योग्य असे उपचार देण्यात त्यांचा हातखंडा होता .नुसतेच पैसे कमावणे हा हेतू त्यांचा कधीच नव्हता. त्यामुळे शहरात प्रॅक्टिस करण्याबरोबरच लांबच्या एका खेडेगावात सुद्धा एक क्लिनिक ते ना नफा ना तोटा या तत्वावर चालवत होते .आज रात्री ते तेथूनच परत येत होते. आज तसाही खूप उशीर झाला होता आणि तशातच पाऊस ही पडत होता. येताना हायवे च्या बाजूला आणखी काही खेडी लागत होती , त्यांचा नेहमीचा रस्ता त्याच खेड्यातुन हायवेला लागत होता ,ते सावधपणे गाडी चालवत होते.
दोन दिवस झाले भिका च्या घरात खूप चिंतेचे वातावरण होते ..त्याची मुलगी बकुळा खूप आजारी पडली होती .. कोणत्यातरी मोठ्या डॉक्टरांना दाखवणे खूप गरजेचे होते आज दुखणे खूप वाढले होते ..भिकाजी म्हणाला होता .

काही मदत मिळते का ते बघतो हायवेला कोणती गाडी मिळाली तर आणतो …पण पैशाचे काय करायचे?

हा पण प्रश्न होताच ..
तो तसाच धो धो पावसात बाहेर पडला.

हायवे आता थोडाच दुर होता .. डाँ नी गाडीचा वेग वाढवला ..पण अचानकच गाडी पंक्चर झाली .. ते गाडी बाहेर आले …गाडीत स्टेपनी पण नव्हती ते जरा काळजीतच पडले ..गाडी पिक अप साठी फोनाफोनी सुरु झाली इतक्यात त्यांना शेजारुन जाणाऱ्या भिकाने विचारले .

काय झाले साहेब ? पंक्चर का ?

डॉ. हो म्हणाले
डॉ—-.कोणी आहे का आसपास पंक्चर काढणारे ..?
भिका ….हो साहेब मीच काढतो .. पण थोडे आतल्या बाजूला माझे घर आणि दूकान आहे तिथे येता का ..लगेच करून देतो …

डॉक्टर आनंदाने तयार झाले.

ते दोघे निघाले काही अंतर गेल्यावर, गावातील काही माणसे घाई घाई ने हायवे कडे जाताना दिसली.त्यांचे जे बोलणे कानावर आले त्यावरून डाॅक्टरांना कळाले की, हायवेवर एक अॕक्सिडेंट झाला आहे. पण भिकाचे बोलणे सुरू होते त्याकडे त्यांचे लक्ष होते. तो म्हणाला….

साहेब , एक विनंती हाय तुम्ही मोठे डॉक्टर तुम्ही जरा माझ्या मुलीला तपासुन औषधी द्या की लई उपकार होतील तवर मी गाडी ठीक करतो आणि त्याचे काय बी मोल घेणार नाही तेवढं करा आमच्यासाठी….

डॉक्टर म्हणाले
अरे ठीक आहे माझे कामच आजारी माणसांना उपचार देणे आहे. तू काळजी करू नको मी उपचार करतो.

असे म्हणे पर्यंत ते घरी पोहोचले पण होते….डॉक्टरांनी गाडी त्याला हवी होती तशी उभी केली…. भिकाने त्यांना घर दाखवले. आणि

तुम्ही चेक करा तवर मी गाडी बघतो.

असे म्हणत गाडीकडे वळला. डॉक्टर आत गेले. त्यांनी भिकाने पाठवल्याचे सांगून बकुळाला तपासू लागले होते.त्यांनी योग्य ते उपचार केले स्वतःकडील गोळ्या औषधे ही दिली आणि ते बाहेर आले.. भिकाचे दुकान बंदच होते आणि भिका ही कुठे दिसत नव्हता त्यांनी टायर कडे पाहिले ते ठीक झालेले दिसत होते . पण पंक्चर काढल्याच्या खुणा दिसत नव्हत्या ती पट्टी जी टोके बाहेर दिसतात ती दिसत नव्हती ते इकडे तिकडे भिकाला शोधू लागले,पण तो काही सापडला नाही. शेवटी त्यांनी परत घरात जाऊन त्याच्या बायकोला, काय बोलणे झाले होते ते सांगीतले, पण मला ते योग्य वाटत नाही, असे म्हणून 500 ची नोट तिथल्या कोनाड्यात ठेवली, आणि पटकन मागे वळले.
गाडी घेऊन परतीच्या वाटेला लागले. आता त्यांना, त्या गावकऱ्यांच्या बोलण्यात आलेल्या अॕक्सिडेंट ची आठवण झाली.
त्याच विचारात ते हायवेला आले.
तर तेच गावकरी गाडीवरच्या + चिन्हा कडे बघत, गाडी थांबवण्यासाठी हात करत होते.
डॉ. नी गाडी थांबवली आणि पटकन आपली बॅग घेऊन ते जखमी होऊन पडलेल्या माणसा जवळ गेले.
आणि त्यांनी त्याचा हात हातात घेताच तो मरण पावला आहे हे त्यांच्या लक्षात आले ..पण ..
पण……..त्याचा चेहरा पहाताच……डाॅक्टरांना दरदरून घाम फूटला, कोणाला काही कळायच्या आत ते चक्कर येऊन खाली पडले………

कारण ज्याचा हात त्यांनी धरला होता……
तो…तो .. भिका होता…..

 

वैशाली खोडवे जोशी

 

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!