१३-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-चंदनाच्या आयुष्यात वहिनीचा प्रवेश
१३-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-चंदनाच्या आयुष्यात वहिनीचा प्रवेश

१३-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-चंदनाच्या आयुष्यात वहिनीचा प्रवेश

१३-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

Written by-ज्योती रामटेके

चंदनाच्या आयुष्यात वहिनीचा प्रवेश

मुले मोठी होत होती. चंदनाचा बी,एड ला नंबर लागला. तिची दगदग वाढली होती. मुलांचे करुन ती काॅलेज करायची.
बरेचदा आई जेवणाचा डबा द्यायची. आईचा खूप मोठा आधार होता तिला. तिच्या काॅलेजमध्ये पण तिच्या पोळ्या प्रसिद्ध झाल्या. आम्हाला शिकव अशा पोळ्या सर्व मैत्रिणी म्हणायच्या. घरी आल्यावर घरची कामे. पियूष मदत करायचा. तो नवीन दुकान बघत होता.
पियूष- तो खेड्यातील माझा मावस भाऊ आठवतो का तुला? मागच्या दिवाळीत आला होता आपल्या घरी.
चंदना-हो.. हो.. आठवतो ना,का बरे,काय झाले?
पियूष-अग तो भरती आहे दवाखान्यात, अपघात झाला त्याचा.
मी चाललो. बघायला,तू येणार का?
चंदना-नाही हो.. माझे कुठे जमणार? मुलांची शाळा आहे. जा तुम्ही संध्याकाळी.

तो निघून गेला. सासूबाई खोलीच्या बाहेर आल्या..अग चंदना तुझे काम नव्हते का जायचे? काय करत असते ग दिवसभर? दोन लेकर जड जातात तुला.. मी कसे सांभाळले चार मुले.दिवसभर बचत गटाची कामे.. घरी आल्यावर घरचे.

आई.. मला हे नेहमी.. नेहमी सांगणे सोडून द्या.काय कमी होते हो तुम्हाला मामाजी चांगले ऑफिसर होते.चांगला पगार होता. हौसेने थोडेफार केले असते तरीही जमले असते. लहानपणीच मुलांना स्वयंपाक शिकवला.करा,खा आणि जा शाळेत. घर राहायचे उकिरड्यासारखे.पियूष सर्व सांगतात मला. आता मी पण लग्नानंतर बी,एड करत आहे. ते पण घराकडे लक्ष देऊन. वेळेचे नियोजन करते मी बरोबर.

तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता माझा पण काय करणार तुम्ही भाग पाडता.. सासुने खोलीचा दरवाजा लावून घेतला.
सर्व कामे आटोपले. तेवढ्यात पियूष आला.
अग खूप जखमी आहे तो.. काय होईल सांगता येणार नाही.वहिनी खूप रडत आहे.पाहिजे अशी परिस्थिती नाही.
काय करतात माहिती नाही.
अहो, त्यांचे नातेवाईक आले असतील न.बघतील ते. आपण केली असती मदत पण आपणही कुठून पैसे आणायचे? आठ दिवसात गार्गीची शाळेची फी भरायला हवी.
पियूष-जेवली का तु?

चंदना- तुमच्या शिवाय कधी जेवते का मी?
पियूष-अग वेळ झाला तर जेवण करून घेत जा.
चंदना-अहो तुम्ही जाताच कुठे मला सोडून? दुकानात पण मी असतेच सोबत.
चंदना-बरे मी काय म्हणते.. आता दुपारी आपल्या शेजारी नवीन घर होतं आहे त्याचे मालक आले होते.. त्यांचे मजूर मुक्कामी थांबणार आहेत. कुणी पोळ्या करून देणार का विचारत होते. मी पटकन म्हणाले ..मी देईल करुन, दोन हजार महिना ठरला.

पियूष- चंदना. किती दगदग करणार? राहू दे.निभत आहे नं सर्व.. आई ..बाबा आहेत मदत करायला. दादा पण आहेच.
हे सारे झेपेल का तुला?
मुलांचा अभ्यासही तुलाच घ्यावा लागतो. माझे शिक्षण तुझ्या पेक्षा कमी.

चंदना-जाऊ द्या.. होईल सर्व ठीक.. झोपा आता.दोन पैसे हाताशी रातील. होईल थोडासा त्रास. बघू. मदत करायला आई येईल एखाद्या वेळी.
सासुबाई मदत करतात .पण टोमणेही तेवढेच मारतात.
सदा न कदा तेच ते.. कंटाळा आला मला. आपण अंपग थोडीच आहोत. चांगले धडधाकट आहोत.आता फक्त आणि फक्त मेहनत करायची.तुम्ही जरा जिद्द ठेवा. मेहनत करा. या वेळी निसर्ग कोपला. पाहिजे असे पीक नाही आले. नव्याने करु प्रयत्न.. मी आहे नं सोबतीला.
पियूष-हो..ग चंदना तुझी सोबत माझ्यासाठी खूप अनमोल आहे.

दिवस उजाडला. चंदनाची गडबड सुरू झाली. आज मजुरांच्या पोळ्या बनवायच्या होत्या.लवकर आणि वेळेत झाले पाहिजे सर्व. माझ्यामुळे नको वेळ व्हायला.तिने पटापट कणिक भिजवून ठेवली.
पियूष-अग चंदना आज लवकरच उठली.
चंदना-हो..न. आज भरपूर पोळ्या करायच्या आहेत. ते मजुर दिवसभर कष्ट करतात. आंनदी राहून जगतात मस्त..
रात्री सुखाची झोप लागते त्यांना.
पियूष-हो..ग.. चंदना खरे आहे तुझे. कष्टाला पर्याय नाही. मी पण आता समोर दुकान सांभाळून दोन पैसे कसे शिल्लक राहिले पाहिजे हे बघतो.
तुला इतके काम करायची गरज नाही मग.

चंदना-अहो काळजी नका करू. होईल सर्व ठिक. आशेचा किरण येईल लवकरच. हे दिवस संपलेच म्हणून समजा. आज आई आली होती. बोलता.. बोलता.. सांगून गेली, अजिबात काळजी करायची नाही. जावई बापूला मदत करु, असे सांगून गेली.बघा बरे, अजून काय हवे आपल्याला?
काल दादा आले होते. त्यांनी दुकानाचा विषय काढला होता. काही लागले तर मदत. करेल असे सांगून गेले.
काही दिवसांनी मला माझे स्वप्न सत्यात साकारायचे आहे.
सध्या घर, मुले महत्वाची आहेत. ती मोठी झाली कि बघू.

पियूष-चंदना तुझे स्वप्न मी पुर्ण करेल. तुझे कोणते स्वप्न आहे ते मी नाही विचारणार वेळ येईल तेव्हा सांग. मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुझे प्रत्येक स्वप्न माझ्यासाठी महत्वाचे राहील. काल राम भेटला होता. तू वाढदिवसाला केलेला स्वयंपाक सर्वांना आवडला हे सांगत होता. वहिनीला एखादे हाॕटेल काढून दे म्हणत होता. खरेच चंदना तुझ्या हाताला सुंदर चव आहे.तुझ्या स्वभावाचा गोडवा तुझ्या स्वयंपाकात उतरतो.माझी आई सोडून तुझ्या स्वयंपाकाची, तू केलेल्या भाज्यांचे सगळे कौतूक करतात.

काल भिडेकाकू भेटल्या होत्या.
मध्ये त्यांना बरे नव्हते तेव्हा तू जेवण दिले होते त्यांना.
आज भेटल्या तर म्हणतात कशा,पियूष मी अजून आजारी पडू का? काय चविष्ट जेवण पाठवायची चंदना. खूप चव आहे तिच्या हाताला.

क्रमशः

पुढील भाग

कशी वाटत आहे कथामालिका…अवश्य कळवा.
प्रिय वाचक,तुम्हीही लघूकथा,कथामालिका,लेख,रसग्रहण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!