एक थरारक चिंब रात्र-मराठी कथा
एक थरारक चिंब रात्र-मराठी कथा

एक थरारक चिंब रात्र-मराठी कथा

रात्रीपासुन पावसाने नुसता धुमाकुळ  घातला होता पावसाच्या सरीवर सरी आणि सोसाट्याचा वारा जीव नकोसा झाला होता अगदी. घरातल्या दारं-खिडक्या अगदी गच्च लावल्या तरी पावसाचा आवाज मनात भीती निर्माण करत होता. त्यात मधुराला रात्री दहाच्या गाडीने नागपूरला जायचं होतं तिच्या दादा ची तब्येत अगदी क्रिटिकल झाली होती, त्यामुळे तिचे जाणं अतिशय महत्त्वाचं होतं.

         दुपारचे चार वाजले होते पण पावसाचा जोर काही केल्या ओसरत नव्हता. काय करावं जावं की नाही अशा द्विधा मनस्थितीत मोहिनी येरझारा घालत होती.
     आठ वाजेपर्यंत सगळ्यांची जेवण उरकून झाली होती पावसामुळे थंडी पण वाजत होती म्हणून पुन्हा एक् स्वेटर सामानात वाढलं होतं. मुलांचं सुरू होतं -आई उद्या गेलीस तर नाही का चालणार ,किती पाऊस येतोय ,तू स्टेशन पर्यंत तरी कशी जाशील.

मधुरा म्हणाली पाहूया थोडा होईल कमी पाऊस मला तर जाणं भागच आहे. दादाची भेट तरी होईल नाहीतर नेहमीसाठी मनात राहून जाईल.

मयंक म्हणाला नको काळजी करू काही वाईट होणार नाही दादा लवकर बरे होतील मी कॅब बुक करून देतो.

तुझं आवरून घे कॅब वाला नऊ वाजता येणार आहे.

पावणे नऊ वाजता फोन आला मधुरा च्या पोटात गोळा उठला दादाचा तर नाही ना मुलाने फोन घेतला.

अग आई कॅब वाल्याचा फोन आहे तो कुठेतरी अडकलाय येऊ शकत नाही म्हणतो ऑटो बघा म्हणे.

अरे देवा आता हे काय नवीनच ऑटो पण मिळाली पाहिजे आता एवढ्या पावसात .बघ रे सुमेध उशीर नको व्हायला.

हो जातोच मेन रोड वर मिळेल एखादी. असं म्हणून सुमेध छत्री घेऊन बाहेर पडला.

ढग गडगडत होते विजा चमकत होत्या मधून मधून.मधुराच रिझर्वेशन झालं होतं तो एक एक मोठा प्रश्न सुटला होता.

वाऱ्याचा आणि पावसाचा जोर थोडा कमी झाल्यासारखा वाटला थांब रे बाबा थोड्यावेळ असं म्हणत मधुरा दारात उभी राहिली.आई ऑटो आली बघ चल लवकर. सुमेध ने ऑटो आणली होती. सामान ऑटो मध्ये ठेवलं .आई स्टेशन वर उतरल्या बरोबर फोन कर पोचल्याचा.

खरं तर मीच आलो असतो सोडायला पण या पावसाने परत येणं कठीण आहे.

अरे तुम्ही काळजी करू नका ,मी पोचेन बरोबर .चला निघूया मधुराने नऊ वाजता घर सोडलं मोबाईल चार्ज केलेला होता म्हणून वेळ कळत होती मधुरा म्हणाली बाबा रे मला गाडी मिळाली पाहिजे हा पाऊस सुधरु देत नाही तुम्ही देवासारखे सापडले बरं झालं

काही काळजी करू नका ताई मी बरोबर नेतो. माझं घर तिकडेच आहे. ऑटो ने वेग घेतला त्याच बरोबर वाऱ्याचा आणि पावसाचा वेग पण वाढला आणि अचानक वाऱ्याच्या जोराने ऑटो डावीकडे ओढली गेली आणि रस्त्याच्या खाली उतरली.

मधुरा घाबरून ओरडली अरे बाबा काय झालं

ऑटो वाल्याने जोरात ब्रेक लावला होता म्हणून ऑटो थांबली पुन्हा त्याने ऑटो रस्त्यावर आणली. पाऊस खूपच जोरात होता दोन फुटाचा पलीकडचं काहीच दिसत नव्हतं मधुराला वाटलं आपण चुक तर नाही ना केली थांबायला पाहिजे होतं का पण आता काही इलाज नव्हता कारण पुढचे चार दिवस तीनशे ते चारशे वेटिंग होतं मधुरा एकटीच असल्याने तिला तिकीट मिळालं होतं

पाऊस वादळी होता अचानक वाऱ्यामुळे पाऊस आत शिरला ऑटोवाला खूपच भिजला होता मधुराला पण पावसाचा तडाखा जाणवला तेवढ्यात मोठ्या गडगडाटासह वीज लखलखली आणि एक प्रकाश झोत ऑटोच्या समोर पर्यंत येऊन झपकन वर निघून गेला मधुरा चे डोळे दिपून गेले होते हात पाय थरथर कापत होते थोडी ऑटो पुढे असती तर काय झालं असतं या कल्पनेनेच तिला दरदरून घाम फुटला

ऑटोवाला म्हणाला ताई आपलं भाग्य चांगलं कुठलंतरी पुण्य आडव आलं आणि आपण बचावलो.मधुरा च्या तोंडून तर शब्दही फुटत नव्हता .

ऑटो वाल्याने पुन्हा ऑटो सुरू केली. पावसामुळे आधीच समोरचं काही दिसत नव्हतं त्यात भर म्हणून रस्त्यावरची लाईट गेली सगळीकडे अंधार गुडूप झाला मधुरा आधीच घाबरून गेली होती आता तर तिला फक्त स्वतःचेच हृदयाचे ठोके ऐकू येत होते

आणि अचानक बाजूच्या झाडा मागून एक शुभ्र आकृती रस्त्यावर आलेली दिसली पांढरा शुभ्र पायजमा पांढरा कुर्ता आणि पांढरी दाढी ते बघितल्याबरोबर ऑटोवाला गर्भगळीत झाला होता त्या आकृती चे कपडे एवढ्या पावसात देखील कोरडे वाटत होते .भीतीने मधुरा चीबोबडी वळली,मधुरा नेडोळे गच्च मिटून घेतले. फक्त पावसाचा जोरदार आवाज येत होता ऑटोवाला काहीच बोलत नाही असं पाहून मधुरा ने हळूच समोर बघितलं तर तो ऑटोत नव्हताच आता मात्र मधुराची शुद्धहरपायची वेळ आली. त्या शुभ्र आकृतीच्या भोवती एक वलय जाणवलं आणि मधुराने जोरजोरात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.

मधुराला जाणवलं ऑटो सुरू झाली आहे आणि वेगाने पुढे जाते आहे. मधुरा भीतीने थरथरत होती आणि अचानक थोड्यावेळाने तिला आपल्या कपाळावर एक अभूतपूर्व स्पर्श जाणवला. मधुराने घाबरत घाबरत हळूच डोळे उघडायचा प्रयत्न केला आणि तिच्या लक्षात आलं कि ऑटो रिक्षा स्टेशन समोर उभी आहे. आणि ऑटो चालक समोर धापा टाकत विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता. मधुराने देवाला हात जोडले आणि पटकन ऑटो तून बाहेर आली.

ऑटो वाल्याने तिचं सामान बाहेर काढलं आणि तिच्या पायावर डोकं ठेवलं आज तुमच्या मुळेच वाचलो .चला गाडी लागली आहे असं म्हणून सामान घेऊन तोच झपझप निघाला.

मधुरा इकडे तिकडे त्या आकृतीला शोधत  होती मधुराने मागे वळून नमस्कार केला आणि गाडीकडे वळली.

आजही ती पावसाळी रात्र आठवली तरी मधुराला कापरं भरतं पाऊस आणि नागपूर यांचा संबंध मधुरा च्या मनात कायम थर थर निर्माण करतो

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!